कोणतेही ॲप आपण डाउनलोड करतो तेव्हा त्यासोबत त्या ॲपचे नियम सांगतात की आपल्या, कोणकोणत्या गोष्टी ते वापरू शकतात। जसे की नेटिफिकेशन, तुमचे लोकेशन, तुमचा ऑडिओ, फोनवरील कॉटॅक्टस, तुमचा ब्राऊझर, आयपी ॲड्रेस,... इ इ
अनेकदा संबंधित माहिती देणे आपण सहजी मान्य करतो। तरीही वाटलं की एखादे ॲप घातक वाटतय तर आपल्या सेटिंग्ज मधे जाऊन, ॲपस यादीतील त्या ॲपवर जाऊन आपण संबंधित परमिशन आपण डिनाय करू शकतो।
हे स्वातंत्र्य बहुतांश ॲपस देतात।
अनेकदा अनावश्यक परवानग्या आपण देत असतो।
समजा माझ्याकडे ॲमेझॉन ॲप आहे। खरेदीसाठी ते उपयोगी पडते। पण तरीही ते माझा कॅमेरा, कॉंटॅक्ट, मिडिया यांची परवानगी घेतं। खरं तर माझ्या कॉंटॅक्टसचा, कॅमेराचा, मिडियाचा खरेदीसाठी काहीच उपयोग नसतो। पण तरीही ही माहिती मिळवली जाते। का? तर यातून त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायचा असतो। माझ्या मिडियात जर ट्रेडमिलचा फोटो दिसला की लगेच त्या प्रॉडक्टच्या जाहिराती ॲमेझॉनवर मला दिसू लागतात। माझ्या कॉंटॅक्टमधल्या लोकांना ॲमेझॉनच्या विविध जाहिराती जायला लागतात।
आपण अनेकदा अनुभवलं असेल की, एखादी वस्तू मी कधीच विकत घेतली नाही। तरीही त्यांच्या विविध ऑफर्सचे एसएमएस मला यायला लागतात। का बरं?
तर अशा कोणीतरी व्यक्तीने ती वस्तू खरेदी केलेली असते, जिच्या कॉंटॅक्ट लिस्टमधे आपले नाव असते। त्या व्यक्तीने तिची कॉटॅक्ट लिस्ट ॲमेझॉनशी शेअर केलेली असते। अन त्यामुळे माझा नंबर ॲमेझॉनकडे जातो।
इथे ॲमेझॉन हे एक उदाहरण म्हणून घेतले आहे। सगळी ॲप्स समान पद्धतीने चालतात।
तेव्हा मुळात कोणतेही ॲप डाऊनलोड करताना वा नंतर लगेच सेटिंग मधे जाऊन कोणकोणत्या परवानग्या आपण दिल्या आहेत हे बघायला हवं।नको त्या गोष्टी डिनाय करायला हव्यात।
पण इतकं कोण करत बसणार? इतका वेळच नसतो। पण मग आपण मार्केटिंगच्या - बिझनेसच्या चक्रव्युहात ओढले जातो।
आता व्हॉॲ ची सध्याची पॉलिसी असं सांगते की तुमच्या फोन नं , आयपी ॲड्रेस, तुम्ही एखाद्या बिझनेस व्हॉॲ नंबरशी काय बोललात, कोणत्या माध्यमातून त्याच्याशी व्हॉॲ मार्फत पैशाचे व्यवहार केलेत, ही आणि अशी माहिती व्हॉॲ आता फेसबुक आणि इन्टाग्राम तसेच तेथील थर्ड पार्टीला विकू शकते।
समजा माझी मैत्रीण; अगदी छान ओळखीची, ड्रेस विकण्याचा बिझनेस करते। मी तिच्याकडून एक ड्रेस तिच्या व्हॉॲ बिझनेसवरून विकत घेतला। त्यासाठी जीपे केलं अन त्याचा स्क्रिन शॉट तिला पाठवला।
आमचं देवाणघेवाण सुरळीत झालं सोपं झालं। का? तर व्हॉॲमुळे।
पण आता गंमत पहा। मैत्रिणीचे बिझनेस व्हॉॲ असल्याने तिच्या नंबरवरचे सगळे आता व्हॉॲकडे रितसर परवानगीने आहे। तुमचा नं, तुमचा आयपी ॲड्रेस,त्यावरून तुमचे लोकेशन, स्क्रिन शॉटवरून तुमचे जीपे अकाऊंटही।
याशिवाय तुमचा फो नं, आयपी ॲड्रेस आणि लोकेशन इ ही माहिती तर व्हॉॲ कधीही कोणालाही विकू शकते, कायदेशीररित्या।
हे सगळं खुले आम, कायदेशीररित्या करू देण्याची परवानगी, आपणच व्हॉॲला द्यावी असा प्रयत्न सध्या चालू आहे। त्यासाठी नवीन पॉलिसी मान्य करा अथवा व्हॉ ॲ सोडा असा मनमानी कारभार चालू आहे।
काहींना ही खुप साधी बाब वाटू शकते। आजच्या जमान्यात सगळीकडेच आपली माहिती असते। कुठे कुठे थांबवणार? असे काहींना वाटू शकते। इटस ओके।
पण मला हे मान्य नाही। कोणती गोष्ट स्विकारायची, कोणती नाही याबाबतचे माझे स्वातंत्र्य होता होईल तो मी घालवू इच्छित नाही।
देश पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवरही; अनेक बाबतीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती झगडावं लागतं हे माझ्या पूर्ण स्मरणात आहे। अनुभवलं आहे। त्यामुळे ते (शक्य तितके) कोणत्याही पातळीवर गमवायला मी सध्या तरी तयार नाही।
ही छोटी लढाई आहे। पण मला सुखाने झोप येण्यासाठी का होईना मला ती लढायची आहे 😊
यात कोणाचेही, कशाचेही मूल्यमापन मला करायचे नाही (जजमेंटल व्हायचे नाही) प्रत्येकाची लढाई वेगळी, प्रत्येकाची स्वस्थतेची गरज वेगळी अन प्रत्येकाची झोपेची गरज वेगळी!🤗
No comments:
Post a Comment