एकही अडचण न येता पोहोचले इथे. उगाचच घाबरत होते. सगळं एकदम स्मुथली पार पडलं. अमेरिकन्सचं बोलणंही नीट समजत होतं
विमानात मी जास्तीकरून झोपूनच घेतलं विमानात मी स्वेटर घातलाच नाही😃
एक स्कार्फ होता तो पुरला उतरल्यावर शिकागेत एअरपोर्ट बाहेरमात्र प्रचंड गार वारं होतं
तेव्हा स्वेटर घालावा लागला. मुळात मला कमी थंडी वाजते. सो पुरलं मला
विमानात वाटेलत्या वेळी खायला देतात🤦.इथे पोहोचायच्या जस्ट आधी जेवण सर्व्ह केलं. मी फक्त ब्रेड अन त्यात भाजी खुपसून खाल्ली. कारण सकाळचे पावणे आठ वाजलेले😂😂😂
भात, राजमा, मिक्स भाजी, दोन बुंदीचे लाडू विथ रबडी🙄, ब्रेड, बटर, कॉफी..... रामा इतकं कोण खातं सकाळी 7 ला???
पिक्चर एकही बघितला नाही😆 सगळे बघितलेले ऑर फीरच नवीन
विंग्रजी एक बघायला सुरुवात केली पण मग कंटाळा आला मग बंदच करून टाकलं. न झोपले मस्त
विमान प्रवास मात्र छान झाला. मधे दोनदा जरा ढग, हवेच्या पोकळ्यांनी हलवलं, पण इट्स ओके
पायाचे मधूनमधून केलेले व्यायाम आणि तालणं यामुळे पाय एकदम ठिक राहिले
बुटं मात्र अजिबात काढली नाहीत. उशा, शाल दिलेली विमानात सो कंफर्टेबल होतं सगळं. मला नवऱ्या ने समोर भरपूर लेग स्पेसवाली सीट घेऊन दिलेली. सो सगळं छान पार पडलं
मी मॅक्स मॅपच बघितला. कोणते देश, अरे वा इथला हा इतिहास वगैरे विचार करत आले.
शिकागो जवळ आलं तसं विमानातून बाहेर थोडा उजेड दिसू लागला. बघितलं तर आधी वाटलं समुद्र दिसतोय. पम मग लाटा हलत का नाहीत असा गांवंढळ प्रश्न मनात आला🤦. मग लक्षात आलं अरे हा ढगांचा समुद्र आहे
कसले ढग! ते बंपिंग लॉन असतं न तसे ढग. गच्च भरलेले चिकटून चिकटून पुंजकेच्या पुंजके
आणि मग समोरच्या क्षितीजावर एक लकेर उठली अंधूकशी किनार दिसू लागली
मग तिथे अक्षरश: इंद्रधनुष्य उगवलं. खाली लाल मग नारिंगी,पिवळा, हिरवा, निळा अन वर गडद्द जांभळा! वर खूप स्वच्छ हवा असल्याने असेल पण खरच असा सुर्योदय मी कधीच बघितला नव्हता. इंद्रधनुष्य फक्त पावसात आकाशात बघितलेलं. पण असं क्षितिजाशी? फारच अफलातून होतं ते दृष्य.
मोबाईलच्या कॅमेरात 10% ही नाही पकडता आलं ते
आणि मग थोड्या वेळाने ढग मधे आले. आता मधेच एक किनार झळझळतीत पिवळा अन वर खाली काळं. जणुकाही आगीची आडवी ओळ सळसळत ढगातून दात होती
ढगांमागून पिवळा उजेड लकलखत होता
मधेच एक बारीकसा रेघेसारखा पण पसरट ढग झरझर पळत गेला. फोटोत नाही पकडता आला
मग पुन्हा ढगांची, पांढऱ्या शुभ्र ढगांची दुलई खाली दिसू लागली. मधेच ती विरळ होई. मग खालचा अमेरिका हळूच दर्शन देई. आखिवरेखीव शहर! सरळ, काटकोनातले रस्ते, त्यात नीट आखून काढल्ली घरं, त्यांच्या ओळी आडव्या उभ्या. सरळसोट रस्ते, पळणाऱ्या इटुकपिटुक गाड्या
मधेच सगळं अदृष्य होई. पुन्हा ढग ढग आणि ढग. मग शिकागो जवळ आलं तशी विमान अजून खाली उतरलं आता गाड्या त्यांचे रंग दिसू लागले, मी लगेच निखुची गाडी शोधू लागले😆
नंतर नवऱ्याने सांगितलं. माझं विमान आणि निखुची गाडी इतकं सिंक्रोनाईजली चाललेलं! आमच्या विमानाला शिकागोला पोचायला एकतास 10 मिनिटं होती अन निखिलची गाडी पोचायला एक तास 11 मिनिटं होती🙃 तंत्रज्ञानाची कमाल! निखिलचं कोलंबस टू शिकागो लाईव्ह लोकेशन आणि माझ्या विमानाचे लाईव्ह लोकेशन नवरा पुण्यात बघत होता
मग विमान अजून खाली आलं,अन जमिनीवर आलं. शिकागो विमान तळ, किती प्रचंड मोठा आहे. दिल्ली पेक्षाही कितीतरी
तिथली सिस्टिम एकदम मस्त. विमानातून बाहेर आल्याबरोबर एक अमेरिकन मुलगी सगळ्या भारतियांना ओळखून " एका मागोमाग एक, उजवीकडून चला" अशी प्रेमळ धमकावणी सतत करत हेती😆😆😆
मग कस्टम्सची रांग. पण तेव्हा आमचं एकच विमान आलं होतं, सो तिथले 5-6 काऊंटर उघडले गेले. अन पटापट आमचे कस्टम्स झाले
शिकागोत कस्टम्स वगैरे एकदम सोप्प. तिथल्या अधिकाऱ्याने 3-4 च प्रश्न विचारले. किती दिवस रहाणार विचारलं. आणि शिक्का मारून त्यावर 25 नोव्हेंबर
2018 असं लिहिलं सही करून😂😂😂अता वर्षभर राहू की काय इथे🤦🏻
बॅगा नीट आल्या. त्या काही त्यांनी तपासून बघितल्या नाहीत. डायरेक्ट बाहेर आले तर निखु समोरून धावत आला🤗🤗🤗
मग त्याच्या निलपरीतून शिकागो टू कोलंबस. मस्त गाडी, एकदम कंफर्टेबल! कसला मस्त प्रवास😍😍😍
काय इथली घरं, लॉन्स, शेतं, शहरं( मिनिऑपोलिस थोडंसं बघितलं) छोटी गावं, सुंदर सुंदर बंगले, बागा, हॉलोविनचे घराबाहेर ठेवलेले भोपळे, आहाहा.....
येताना मधे रेस्टरुमसाठी थांबलो. इतकं चकाचक, स्वच्छ. मी विचारलं पैसे किती द्यायचे. तर निखिल म्हणाला आपण टोल भरतो की रोडचे अन टॅक्स. त्यातूनच हे मेन्टेन करतात. मी😳😱
कसली मस्त होती ती बिल्डिंग. एकमजली, एेसपैस, पाणी, स्वच्छता, बाहेर लॉन
सरकारी व्यवस्था इतकी छान असू शकते हे आपल्या लक्षातही येत नाही😂😂