Showing posts with label प्रकाशचित्र. Show all posts
Showing posts with label प्रकाशचित्र. Show all posts

Saturday, April 5, 2014

नवे कोडे

या आठवड्यात पुन्हा एका बुलाबुलाच्या जोडीने घरटे बांधायला आमचे झुंबर निवडलेय.



या वेळेस आहेत तुर्रेबाज बुलबुल .

घरटे आता होत आलेय.


बघू या वेळेसचे हे कोडे सुटते की मागच्या वेळ पेक्षा ( एक न सुटलेले कोडे )  गहिरे होतेय ....


Thursday, March 13, 2014

माझ्या बांधवगडच्या व्याघ्रदर्शनाचे पुस्तक रूप इथे बघायला मिळेल
बांधवगडचे व्याघ्रदर्शन

Tuesday, November 12, 2013

स्वयंभू शंभू

मी काही आस्तिक नाही पण तरीही निसर्गातला हा स्वयंभू शंभू मनाला भावून गेला :)


Wednesday, August 31, 2011

"वन बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे"

सध्या माझी बाग छान फुलतेय.


सोनटक्याचा एक सीझन येऊन गेला, दुसरा उंबरठ्यावर उभा आहे






मधुमालती मस्त फुलून गेली.









लिली बहरून गेली.

















रातराणीही सुवासून गेली.



















साध्या बहरलीय ती मुकी जास्वंद !



लाल गुलाब ४-४, ५-५ फुलांनी लगडलाय.






अन कळ्यांनी वाकलाय कुंद.













रंगाबिरंगी पानंही सजलीत.


परवा इंद्रधनुष्यानेही कमान केली माझ्या बागेवर.


अन मग येऊ लागले काही नवखे लोक. फुलपाखरं, छोट्या मधमाशा, किडे, चिमण्या, बुलबुल अन चक्क सनबर्डही :)








काल दोन-तीनदा एक बुलबुलाचे दांपत्य अन एक सनबर्डचे दांपत्य पाहणी करून गेले.







मग मला कंबर कसायलाच लागली. सकाळी सगळे आवरले अन मग लागले कामाला. अन त्यातून तयार झाला हा वन बीएचके फ्लॅट :)




इस्त्रीचे एक खोके, जुन्या वह्यांची कव्हरं, काही चिकटपट्या अन वायरीचे तुकडे, अन थोडे कष्ट अन थोड्या आयडिया. बस झाले.




बघा कोण कोण इंट्रेस्टेड आहेत? आताच दोघे बुलबुल प्राथमिक पाहणी करून गेले. कॅमेरा रेडी नव्हता, नाही तर सप्रमाण सिद्ध केलं असतं ;) आता नवे जोडपे राहायला आले तर टाकेनच त्यांचे फोटो :)

Wednesday, June 1, 2011

एकमेका सहाय्य करू.../ जंगलचा कायदा !
















हात मेल्या तुला काही लाज......

निवांत पहुडलेली ही आम्ही गेल्यावर जरा काँशसच झाली होती.




तशात तो आला अन थेट तिच्या जवळ गेला, अन अगदी लाडात आला
हिला आला राग. आधीच सारी लोकं बघाताहेत, अन त्याने इतक्या लोकांसमोर असे चाळे करावेत...




हात मेल्या तुला काही लाज ?




अन हा अजून एक फटका




हुरमुसलेला तो




पुन्हा मनमिळवणी करण्याचा एक असफल प्रयत्न




अन मग लोकांवर रागावलेला तो. आमच्या एकांतात ढवला ढवळ करताय? चला पळा सगळे....

Tuesday, June 8, 2010

सुर्याला गिळणारा पक्षी

आपल्या कोठल्यातरी गोष्टीत लहानपणी वाचल्याचं आठवतय, सुर्याला गिळणारा पक्षी... ! नाही, नाही हनुमान किंवा मुक्ताईची 'मुंगी ...' नाही. कोणत्यातरी पक्षाची गोष्ट होती ती. परवा ताम्हणी घाटात गाडीतून जाताना हा ढग दिसला अन मला ती गोष्ट्च आठवली. तुम्हालाही वाटतय का, की गिळणार तो महाकाय पक्षी सुर्याला ? चालत्या गाडीतून टिपलाय त्यामुळे खिडकीची काचही आलीय, त्याबद्दल क्षमस्व !