Showing posts with label विणकाम. Show all posts
Showing posts with label विणकाम. Show all posts

Tuesday, December 24, 2013

"शिकाशिकावा" ऑनलाईन विणकाम : शंकासमाधान

"शिकाशिकावा" या ऑनलाईन ब्लॉग मध्ये कसे शिकवले जाते, ते शिकण्यासाठी आधी काय यावे लागते, या ब्लॉग मध्ये सहभागी कसे व्हावे, त्यासाठी पूर्वतयारी काय, आम्हाला येईल का, या आणि अशा अनेक शंका अनेकांच्या मनात आहेत असे दिसते. कारण मुळात ही ऑन लाईन शिकवण्या-शिकण्याची पद्धत विणकामासाठी अजून फार रुळलेली नाही. हे सर्व कसे चालते हे नीट समजावे यासाठीहे शंकासमाधान!

"शिकाशिकावा"  हा ब्लॉग कोणासाठी आहे ? 
हा ब्लॉग रिस्ट्रीक्टेड  आहे. म्हणजे तो फक्त सदस्यांसाठीच खुला आहे; सार्वजनिक नाही.

या ब्लॉगचे सदस्यत्व कसे घेता येईल ? 
सदस्यत्वासाठी तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल; तसेच या ब्लॉगची फि ( त्याचे तपशील आपण इमेल पाठवलेत की कळतील ) भरावी लागेल त्यासाठी आधी मला एक इ मेल पाठवावी लागेल. उजवीकडील contacht me  यात आपली माहिती भरा आणि पाठवा, मला इ मेल पोहचेल.

या ब्लॉगचे सदस्यत्व कोणाला घेता येईल ?
ज्यांना विणकाम शिकण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे नेट अॅक्सेस आहे, ज्यांना आठवड्यातून किमान २ तास विणकामासाठी काढता येणार आहेत आणि सर्वात महत्वाचे ज्यांच्याकडे थोडा पेशन्स आहे त्या कोणालाही या ब्लॉगचे सदस्यत्व घेता येईल.

या ब्लॉग द्वारे कोणाला विणकाम शिकणे जमू शकेल ?
वरील तीन गोष्टी असलेल्या कोणालाही विणकाम जमू शकेल. अगदी या पूर्वी तुम्ही कोणतीही सुई हातात घेतली नसलीत तरीही तुम्हाला विणकाम शिकवण्याची जबाबदारी माझी :)

या ब्लॉगचे कामकाज कसे चालते? 
आपण एकदा या ब्लॉगचे सदस्यत्व घ्यायचे ठरवलेत आणि मला इ मेल पाठवलीत की मी बाकीचे तपशील आपणास कळावे. त्यानुसार तुमची माहिती तुम्ही मला पाठवली आणि फि माझ्या खात्यात जमा केलीत की लगेचच मी आपल्याला सदस्य करून घेते. आणि आपल्याला या ब्लॉगमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट पाठवते. ही रिक्वेस्ट तुम्ही मान्य केलीत की तुम्हाला या ब्लॉगचा अॅक्सेस मिळतो. आणि मग तो महिनाभर तुम्हाला हवे तेव्हा, हव्या तितक्याम्दा, हवा तितका वेळ हा ब्लॉग तुम्ही अभ्यासू, पाहू शकता.

महिना संपला आणि तुमची  पुढची फि जमा झाली नाही की आपोआपच तुमचे सदस्यत्व संपते आणि तुमचा अॅक्सेस बंद होतो. जर तुम्ही पुढील महिन्याची फि जमा केलीत तर हा अॅक्सेस चालू राहतो. त्यामुळे तुम्हाला हवा तेव्हढा वेळ तुम्ही सदस्य राहू शकता.

या शिवाय आठवड्यातील कोणत्याही चार दिवशी प्रत्येकी अर्धा तास ( एकूण दोन तास ) खास तुमच्यासाठी मी ऑन लाईन उपलब्ध असते. त्याचे दिवस आणि वेळा निश्चित केल्या जातात. तसेच काही इमर्जन्सी आली तरीही मी ऑन लाईन असते. याहू चाट, जी टॉक, स्काईप, व्होतास अप, इ मेल वा फोन या द्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.

विणकाम ऑनलाईन कसे शिकणार ? 
हे सुरुवातीला खूप अवघड वाटते. पण गेल्या वर्षभराच्या अनुभवावरून सांगते, हो हे विणकाम ऑन लाईन शिकता येते. माझ्या अनेक विद्यार्थिनीनी हे सिद्ध केलंय  :)

या ब्लॉगवर मी अगदी बेसिक गोष्टींपासून शिकवले आहे. अतिशय सोपी, भाषा, अनेक चित्र, आकृत्या, व्हिदिओ यांच्या मार्फत मी जास्तीत जास्त सोपे करून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

डीस्टन्स  लर्निंग मध्ये कसे शिकवतात याचा माझा १५ वर्षांचा अनुभव इथे कारणी लागला आहे. तसेच चित्रकलेची , फोटोग्राफी, व्हीडीओ, एडिटिंग, एनिमेशन या सर्व गोष्टींचा मला हे सर्व शिकवताना उपयोग होतो.
आज पर्यंत एकाही विद्यार्थिनीने समजत नाहीये अशी अडचण मांडली नाही , हे आवर्जून सांगावे वाटते.

या साठी पूर्वतयारी काय लागेल ?
पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी तुमच्या हाताशी असाव्या लागतील.
क्रोशा शिकावयाचे असेल तर क्रोशाची सुई : ३.५० मि.मी. वा घरी जी असेल ती. आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर.
जर दोन सुयांवरचे विणकाम शिकायचे असेल तर दहा नंबरच्या दोन सुया आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर. हे सर्व सामान तुम्हाला कोणत्याही  एम्ब्रॉयडरी च्या दुकानात मिळते. सुरुवातीला बस इतकेच लागेल. नंतर लागणा-या सुया, लोकर तुम्हाला ब्लोगवर आल्यावर ठरवता येतील.

हे शिकल्या नंतर  पुढे काय ? 
या ब्लोगावारती प्राथमिक पासून प्रगत पर्यंतचे विणकाम शिकवले आहे. ह्या ब्लॉगवरील सर्व गोष्टी आत्मसात केल्यानंतर खरे तर तुम्ही कोणतेही विणकाम आपले आपण करू शकाल; या पदापर्यंत पोहोचाल. तरीही कधी कधी काही डिझाइन्स, पॅटर्न तुम्हाला येत नाही असे वाटले. तर त्यासाठी  www.artarati.blogspot.com हा ब्लॉग आहे. तिथे मी नव नवीन  डिझाइन्स, पॅटर्न  देत राहीन. आपल्याला नवे काही हवे असेल तर तेही तिथे टाकेन. त्यासाठी माझ्याशी संपर्क साधा.

थोडे फार आधीच येत असल्यास ? 
www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल.
परंतु विणकाम थोडे फार आधी येत असले तरी माझा सल्ला असा राहील की किमान एक महिनातरी "शिकाशिकावा" या ब्लॉगचे सदस्य व्हा. त्यामुळे माझी शिकवण्याची पद्धत आणि किमान काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समाजातील, आपली वेव्ह लेग्थ जुळेल. त्या नंतर  www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल. हे दोन्ही तुम्ही एकाच वेळीही करू शकाल.

सर्वात महत्वाचे : 
या ब्लॉग वरती विणकामाचे सर्वसाधारण तंत्र शिकवण्याचा प्रयत्न मी करते आहे . परंतु हे लक्षात ठेवा की ही शेवटी एक कला आहे, त्या मुळे एखादी कलाकृती एकाने केली आहे तशीच अगदी दुस-याला जमेल असे नाही. तसेच एखादा पेटर्ण , एखादे डिझाईन शिकवता येईल परंतु प्रत्येक पेटर्ण वा प्रत्येक डिझाईन हे शिकवता येण्यासारखे असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमते नुसार, कौशल्यानुसार, कलात्मकते नुसार प्रत्य्रेकाची कलाकृती तयार होत असते.

Tuesday, October 22, 2013

शांकलीची गुरुदक्षिणा

शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी स्मित

घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.

हे सारे अपारंपारिक अशा ऑन लाईन शिकण्यातून हे विशेष.. अशा पद्धतीने शिकणे खरोखरीच अतिशय अवघड प्रकार. शिकवण्यासाठी लिहिलेले, दाखवलेले नीट अभ्यासणे, त्यावर प्रॅक्टिस करणे, काही शंका असतील तर लगेच स्ंपर्क साधून अतिशय ऋजूतेने शंकानिरसन करून घेणे; सांगितलेले, सांगितलेल्या पद्धतीने अन तेव्हढ्या वेळा करणे हे सगळेच या पद्धतीत अतिशय आवश्यक असते. हे सारे तिने केलेय. आता तर ती दोन सुयांवरचे विणकाम करते आहे.

इतकी छान गुरुदक्षिणा देणारी विद्यार्थिनी सगळ्यांनाच लाभो स्मित

शांकलीने केलेला बारीक दो-याचा अतिशय नाजूक अन सुबक टेबल टॉप :

IMG_4497[1] copy.jpg

Monday, September 9, 2013

" सकल कलांचा तू अधिनायक! "

गणपतीचे किती समर्पक वर्णन ! या कलांच्या अभिनायकाला त्याच्याच रुपात साकार करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न .

८ ऑगस्ट, "मायबोली"वरच्या साती बरोबर व्हॉट्सप वर गप्पा मारत होते, तेव्हा तिने प्रेमळ आज्ञा केली. "मायबोली गणेशोत्सवासाठी, गणपती कर ना क्रोशाने." बापरे, मी घाबरलेच ! हे कसं शक्य होतं. आता पर्यंत मी कधीच अशा स्वरुपाचे काही केले नव्हते. वेगळेपणा म्हणून कपबशी, बूट, हातमोजे केले होते. पण गणपती अशक्यच होता. तिला तसे सांगितल्यावर तिने थोडी सूट दिली, म्हणाली मग "मोदक कर, उंदीर कर." हे माझ्या थोड्या आवाक्यातले होते.
 
मग काय लगेच मिशन मोदक सुरू केले. पहिली अडचण आली ती मोदकाला उभे करण्याची. पण मध्यंतरी एक बॅग केली होती, त्याला बेस करताना एक जुनी वीण वापरली होता. कपाच्या बेस साठीही ती खूप उपयोगाला आली होती - बिस्किट वीण. तिचा वापर केला अन मग मोदक न पडता बसू लागला.
मोदकाच्या पाकळ्या उठावदार होणे ही मोदकाची खरी ओळख. त्या क्रोशात करताना मात्र सोप्या गेल्या. माझ्या ख-या मोदकापेक्षा हा क्रोशाचा मोदक जास्ती रेखीव झाला.
मग त्यावर गाईचे रवाळ तूपही विणले.


हे मोदक मला तर मोदक वाटत होते पण इतरांना ते कसे वाटतात याची टेस्ट घेणे भाग होते. तशात १५ ऑगस्ट जवळच होता मग तीन रंगात मोदक केले. केशरी, पांढरा, हिरवा. पांढ-या मोदकावरती निळ्यारंगाचे तूप ओतले, आपलं विणले. अन १५ ऑगस्टला माझा तिरंगा झळकला.



 माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हे मोदक आवडले. मला हुश्श्य झाले..

आता उंदरावर प्रयोग करायचा होता. हे जरा कौशल्याचे होते. मग नेट वर थोडी शोधाशोध केली. तसा कॉम्प्युटर अन माऊसचा फार जवळचा संबंध असल्याने नेटवर बरेच उंदीर सापडले. काही चक्क क्रोशाचेही होते. पण एकात एक आवडत होते, दुस-यात दुसरे,... असे झाले.
मग त्याचे तंत्र माहिती करून घेतले अन स्वतःच नवीन डिझाईन केले. अन विणायला घेतले. तयार उंदीरमामाच आहे जेमेतेम २ इंचाचा. त्याचे इवलुसे तोंड, कान अन डोळे करताना माझी बोटे मला फारच जाड वाटू लागली. त्यातून त्याचा डार्क तपकिरी रंग मला रात्री काम करू देईना. शेवटी १८ ऑगस्टला हा उंदीरमामा माझ्या डोक्याच्या बिळातून हाताच्या मार्गाने सुईचे टोक पकडून बाहेर पडला अखेरीस :)

  त्याचे लालचुटुक डोळे मलाच भूरळ घालत होते. 


मोदक जमले, उंदीरमामाही तयार झाला. आता साती मागे लागली, "अजून काही कर, बाप्पा मोरया!" वंदना, अंजली, अर्चना, शोभना, निखिल सगळे म्हणू लागले "कर ग जमेल तुला गणपती." पण मला माहिती होते, हे शिवधनुष्य आहे. नीट नाही जमले तर? मांडी घातलेले पाय, वेगेवेगळ्या दिशेला असणारे हात आणि सर्वात अवघड सोंड. हे काही सोपे नव्हते. त्यातून प्रत्यक्षात मातीचा गणपती केलेला असल्याने हात, पाय, सोंड यांना आकार देणे किती क्लिष्ट आहे याची जाणीव होती. त्यातून क्रोशा हे विणकाम सहसा सरळ रेषेत- दोन डायमेंशनचे. तीन डायमेन्शन्स मध्ये क्रोशा करणे फक्त छोट्या आकारात ( Amigurumi ) केलेले नेटवर पाहिले होते. पण गणपती थोडा मोठाच करावा असा विचार होता. नेटवरही शोधाशोध केली. पण क्रोशाचा गणपती काही सापडला नाही. मग स्वतःचे डोके चालवायचे ठरवले. प्रयत्न तर करू, मग बघू, नाही जमले तर नाही करायचा. पण एक प्रयत्न करायचाच असे ठरवले.

अन मग २० ऑगस्टला श्री गणेशा केला. जे अवघड आहे ते आधी करायचे ठरवले. जर तोंड आणि सोंड जमली तरच पुढे जायचे ठरवले. तोंड करणे तसे सोपे होते. दुस-या दिवशी सोंड करायला घेतली. अन २-३ दा उसवूनही मनाजोगते वळण मिळेना. शेवटी हे आपल्या आवाक्यातले नाही म्हणून ठेऊन दिले. तिसरा दिवस उजाडला. दुपारी लेकाने विचारले, "काय ग, नुसती का बसली आहेस? कर ना गणपती." मग उठले. पुन्हा प्रयत्न केला. अन या वेळेस कोडे उलगडले. सोंड वळू लागली. सुरुवातीला थोडी जाड झाली पण मग तसेच पुढे करत गेले. शेवटही जमला. माझी मीच खुष झाले. वर बघितले तर, लेक हसून बघत होता.
 
मग काय अजून उत्साहाने कामाला लागले. सोंड विणतानाच हात, पाय कसे वळवायचे याचा अंदाज आला होता. हळूहळू गणपती आकार घेऊ लागला.

इटुकले महिरपीच्या आकारातले कान तयार झाले.
मुकुट सजला.
हातातले, गळ्यातले अलंकार घडले.
विणलेले रेशमी उपरणे पांघरले.
रेखीव डोळे रेखले.
अन मग २१ ऑगस्ट्ला बाप्पा मस्त रेलून बसले.
मग त्यांच्या डाव्या हातावरती मोदक ठेवला.
पायाशी गुलाबाचे फूल वाहिले.
सोंडेमध्ये दुर्वा ठेवल्या.
अन मग लांब उभे राहून बघितले. अरे वा जमलाय की Description: स्मितदोन मिनिटं मीही बघत बसले. खूप खूप आनंद झाला. लेक, नवरा दोघेही खूष झाले.
मग या कलेच्या अधिनायकचा फोटो काढून साती, सुधा, अंजली, वंदनाला पाठवले. सातीने अ‍ॅप्रुव्हल दिले.


अंजली, वंदना खूष झाल्या.
सुधाने माथ्यावरचा तिलक राहिल्याचे सुचवले. लगेच लालचुटुक गंध रेखले.


अंजलीला विचारल्यावर तिने उजव्या हाताचा अंगठा बोटांना जोडून घ्यायला सुचवले. खरच की नीट बघितल्यावर कळले, बाप्पा आशिर्वाद द्यायच्या ऐवजी मला फटका देत होता की :) मग तीही दुरुस्ती केली.
सातीने सुचवल्याप्रमाणे अजून मोदक केले. 



खाली घालायला पांढरा स्वच्छ रुमाल टाकला.
बापांना बसायला हिरवेगार आसन केले.
मागे चक्र तयार केले.
मोदक ठेवायला छोटी गोल ताटली केली.
अन मग सातीने सुचवल्याप्रमाणे या सर्व विणकामाची नीट रचना केली अन फोटो काढले.


मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीसाठी मी क्रोशाने विणलेले लोकरीचे छोटे तबला डग्गा तयार केले होते. ते तिला दिल्यामुळे त्यांच्यासह मला गणपतीचा फोटो काढता आला नाही. पण तबल्याडग्ग्याचा फोटो माझ्याकडे होता. मग माझे फोटोशॉपचे कौशल्य वापरून ते तबला डग्गा गणपती समोर ठेवले. अन हा कलाकार गणपतीही तयार झाला.  


या सर्व गोष्टी ९९.९९९ टक्के क्रोशाने अन लोकरीने केल्या आहेत. ०.००१ टक्का आहे तो भरतकामाच्या सुईचा. उजव्या हाताचा अंगठा बोटांना जोडणे अन रेशमी उपरणे खांद्यावर टाचण्यासाठी फक्त तिचा वापर केला. बाकी सर्व गोष्टी क्रोशाच्या सुईनेच केल्या आहेत.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. माया सर्व मैत्रिणी अन विद्यार्थिनी, लेक अन नवरा यांच्या प्रोत्साहनातूनच हे धाडस माझ्याच्याने केले गेले. या सर्वांच्या ऋणातच राहणे पसंत आहे मला Description: स्मित
बाप्पा मोरया !






_________________________

Sunday, September 8, 2013

किट्टी

शुभांगीने या वर्षी गणपतीला कार्टून्सची थीम ठेवलीय. मग काय एखादे कार्टून केलेच पाहिजे ना? म्हणून ही मनीमाऊ केली : किट्टी. आहे इटकुली जेमतेम २.५ इंचाची



Thursday, August 8, 2013

नवा डिझायनर

माझ्या "शिकाशिकावा" या ब्लॉग वरती एक नवा डिझायनर उद्याला येतोय :)
वंदना आता किती एक्स्पर्ट झाली आहे विणकामात तुम्हाला माहितीच आहे. आता तर तिच्यात  "अपने बलाबुते पार" विणायची क्षमता पण आलीय :) मध्यंतरी तिला नेट वरती एक फ्रॉक फार आवडला. तो करता येईल का असे मला तिने विचारले. खरे तर त्या साईटवर कसे करायचे हे थोडक्यात लिहिले होते. म्हणून मी तिला त्यावरून करायला सुचवले. अर्हात ते सारे इंग्रजीत होते अन आपल्या ब्लॉगच्या मानाने खुपच त्रोटक होते. पण वंदना ची कमाल तिने अगदी बरोब्बर केले. शाब्बास वंदना :)

सारा फ्रॉक झाला. पण गळ्याला तिला जरा जास्तच ओके बोके वाटत होते. मग मी तिला गळ्याजवळ खांब घाल सांगितले. अन तिने ते घालताना मस्त डिझाईन बनवले, आपल्याच मनाने :) बघा तयार होतोय ना डिझायनर?


Sunday, August 4, 2013

सुयांवरचे विणकाम : थोडा इतिहास

असे मानले जाते की सुयाम्च्या विणकामाचा शोध ढोल, नगारा तयार करण्यासाठी लागला असावा. नगा-यावरती जे कातडे असते ते  खालच्या भांड्याला ताणून लावल्यावर ते नुसते बांधून सुटत असावे, म्हणून मग ते शिवण्याचा प्रयत्न झाला असावा. त्यासाठी हुकसारखे काही हत्यार वापरले  असावे. या हुक च्या मदतीने  कातड्या तून पहिली साखळी घातली गेली असावी. हाच पहिला क्रोशा असावा.

सुयां वरचे विणकाम याचे मूळ अजून सापडलेले नाही. निश्चित स्त्रोत माहिती नाही. अगदी शोध घ्यायचा तर इ. स्. पू ५००० पर्यंत आपल्याला मागे जाता येते. लीला डी चाव्ह्स (Lila de Chaves)  या इतिहासकार आणि टेक्साटाल तज्ज्ञ यांच्या मतानुसार ग्रीस मध्ये गाठीं शिवाय एकमेकांत गुंफलेल्या कापडांच्या नोंदी आहेत. हे एका सुईवरचे विणकाम असण्याची दाट शक्यता आहे.

इ.स्. पू १५०० मध्ये हातांच्या बोटांनी दोरे एकमेकांत अडकवत विणण्याची कला मानवाने प्राप्त केली असल्याचे आढळते. बोटांच्या आधारे दो-याच्या वेणीसादृष्य विणकाम केलेले आढळते. 

इ. स्. २५६ मधील तीन विणलेले कापडाचे तुकडे सिरीयन शहरात – दुरा इथे सापडले. हे विणकाम हातानेच विणलेले, अर्थात सुयाम्वर – एका वा दोन असावे.

प्राचीन काळात भारत, तुर्कस्तान, अरबस्तान, चीन, उत्तर व दक्षिण अमेरिका अशा विविध ठिकाणी विणकाम केले जात असावे. 

अलीकडच्या काळात पहिला उल्लेख सापडतो तो १३९० मधला. प्रसिद्ध जर्मन चित्रकार  बरट्राम (Bertram) यांनी “ निटींग मेडोना “ हे चित्र काढले आहे. यात विणकाम करत असल्याचे चित्र त्यांनी रेखाटले आहे.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला चीन, भारत, अरबस्तान, येथून क्रोशा चे विणकाम पर्शियात आले. अन अठराव्या शतकाच्या शेवटी हे विणकाम युरोप मध्ये पोहोचले.

१८०० मध्ये इटालियन नन्स हे विणकाम करत. त्याच मुळे या विणकामाला “नन्स वर्क “ म्हटले गेले.  

प्रबोधन काळात युरोप मध्ये अनेक जुन्या कलांचा नव्याने पुनरुथ्थान झाले. त्यातील एक क्रोशा. त्या काळातील स्त्रियांनी या कलेला पुन्हा जिवंत केले, वाढवले.

भारतात विसाव्या शतकात, नव्याने क्रोशा आणला तो स्कॉटलंड येथील मॅक्रे (  Macrae )  या दांपत्याने.


A short history of knitting



It is assume that while making of drams, man invented the art of knitting. To made drum, one should spread the skin on large vessel and tied it. When this tied skin became loose, man try to tie it with some type of hook and thread. This was the first chain of crochet.

We did not know the exact origin of knitting.

But if we try our best, we will go back, up to 5000BC. Lila de Chaves, a well-known historian as well as textile expert proved that in Greece there was some knitting.

At begging, human used fingers to knitting.

In the village Dura, in Syria, three knitted pieces were found dated 256 AD. These were first ever evidence we got.

From ancient era knitting was done in India, Turkey, Arabia, China, and North & South America.

In medieval era first document we found about knitting was in 1390AD. Famous German Artist Bertram painted the picture named “Knitting Madonna “.

In eighteen century Crochet knitting traveled from India, Turkey, Arabia and China to Persia. And at the end of this century it came to Europe.

At first, nuns of Italy started this knitting, so it was called as “Nun’s work”.

In renaissance period every art was flourished. In this period women of Europe gave rebirth to crochet and enhance it.

In twentieth century Scottish couple Macrae re-introduced crochet to India.       


Thursday, August 1, 2013

Monday, July 22, 2013

नवीन अनिमेशन Passionate Abt Crochet

फेसबुक वरील एक ग्रुप Passionate Abt Crochet's ने एक स्पर्धा ठेवली आहे . त्या साठी तयार केलेला व्हिडीओ


Tuesday, June 25, 2013

माझ्या विणाकामाच्या कलाकृतींचा नवा ब्लॉग

माझा " आर्टआरती " हा ब्लॉग आज सुरु करतेय. माझ्या विणकामांच्या विविध कलाकृती येथे एकत्रित पणे टाकेन. अशा आहे हाही ब्लॉग तुम्हाला आवडेल.

तसेच त्यांच्या संभाव्य किंमतीही तिथे आहेत. ज्यांना या करून हव्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. 

Thursday, June 20, 2013

अंजलीने विणलेला अननसाचा फ्रॉक

हा माझी "शिकाशिकावा" ब्लॉग वरच्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीने विणलेला अननसाच्या डिझाईनचा फ्रॉक


Tuesday, June 4, 2013

अर्चनाचा पोंचू

अर्चनाला मी पूर्वी केलेला पोंचू आवडला. तिने ऑर्डर दिली आणि मी विणला.

हा  पूर्ण उलगडून

हा  बोट नेक घातल्यावर दिसणारा


हा व्ही नेक घातल्यावर दिसणारा



Saturday, May 25, 2013

अंजलीने केलेला स्कर्ट

नातीसाठी ( भाचीच्या लेकीसाठी ) अंजलीने, माझ्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीने केलेला हा भरपूर घेराचा लोकरीचा स्कर्ट


Friday, May 24, 2013

क्रोशाची फुले

नेट वर बघत असताना एका फ्रेंच साईट वर क्रोशाने केलेली फुले बघितली. फारच सुंदर होती. मलाही मोह आवरला नाही. प्रयोग करून बघितला. खूप नाही जमली, पण प्रयत्न केला तर अजून जमू शकतील असे वाटतेय. बघुयात :)


सध्या हा पहिला प्रयोग :





Sunday, May 19, 2013

वंदनाने केलेला पोंचू

वंदना ला नेट वर हा पोचू दिसला. तिला तो खूप आवडला. तिच्या आधीच्या विणकामाचे बक्षिस म्हणून मग   मी त्याचे डिझाईन बसवले अन तिला प्रेझेंट म्हणून नकाशा काढून पाठवला आणि पहिल्या फक्त पहिल्या ८ ओळी तिला लिहून कळवल्या. नंतर बाकीचा पोंचू तिने नकाशा बघून पूर्ण केला. खरे तर हा पोंचू खूप अवघड. त्यातून अननसाचे डिझाईन. पण वंदनाने अतिशय सुबकपणे, सफाईदार विणला. शाब्बास वंदना :)

बघा ना, कित्ती मस्त झालाय ना? :)




 माझ्या ब्लॉगचे चीज झाले असे मला वाटतेय, थांकु वंदना :)

Monday, April 29, 2013

किडुक - मिडुक ब्लॉगस्पॉट डॉट कॉम

मित्र मैत्रिणींनो, तुमच्या मुलींसाठी हा नवा ब्लॉग उघडलाय बरं :) : http://kiduk-miduk.blogspot.in/ त्यांना सुट्टीत करता येईल अशा गोष्टी टाकतेय तिथे. सोप्या अन छोटुकल्या, अन हो त्यांना आवडतील अशा. हा ब्लॉग सर्वांसाठी खुला आहे. तुमच्या मित्र मैत्रिणींनाही सांगा बरं का :)


Monday, April 8, 2013

विणकामाचे काही नवीन पॅटर्न्स

नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो

हा  दोन सुयां वर, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे


 हा क्रोशाने विणलेला एक बेबी सेट. यातला स्वेटर फ्रॉक पद्धतीचा.



हा  मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंची जरा नव्या पद्धतीने :) याला मी  नाव दिलं "कॅपकेप"
डावीकडे  गुंडाळल्यावर आणि उजवी कडे पूर्ण उलगडल्यावर



आणि हे दोन फ्रॉक स्टाईल स्वेटर.