Showing posts with label शिकाशिकावा ब्लॉग. Show all posts
Showing posts with label शिकाशिकावा ब्लॉग. Show all posts

Tuesday, December 24, 2013

"शिकाशिकावा" ऑनलाईन विणकाम : शंकासमाधान

"शिकाशिकावा" या ऑनलाईन ब्लॉग मध्ये कसे शिकवले जाते, ते शिकण्यासाठी आधी काय यावे लागते, या ब्लॉग मध्ये सहभागी कसे व्हावे, त्यासाठी पूर्वतयारी काय, आम्हाला येईल का, या आणि अशा अनेक शंका अनेकांच्या मनात आहेत असे दिसते. कारण मुळात ही ऑन लाईन शिकवण्या-शिकण्याची पद्धत विणकामासाठी अजून फार रुळलेली नाही. हे सर्व कसे चालते हे नीट समजावे यासाठीहे शंकासमाधान!

"शिकाशिकावा"  हा ब्लॉग कोणासाठी आहे ? 
हा ब्लॉग रिस्ट्रीक्टेड  आहे. म्हणजे तो फक्त सदस्यांसाठीच खुला आहे; सार्वजनिक नाही.

या ब्लॉगचे सदस्यत्व कसे घेता येईल ? 
सदस्यत्वासाठी तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल; तसेच या ब्लॉगची फि ( त्याचे तपशील आपण इमेल पाठवलेत की कळतील ) भरावी लागेल त्यासाठी आधी मला एक इ मेल पाठवावी लागेल. उजवीकडील contacht me  यात आपली माहिती भरा आणि पाठवा, मला इ मेल पोहचेल.

या ब्लॉगचे सदस्यत्व कोणाला घेता येईल ?
ज्यांना विणकाम शिकण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे नेट अॅक्सेस आहे, ज्यांना आठवड्यातून किमान २ तास विणकामासाठी काढता येणार आहेत आणि सर्वात महत्वाचे ज्यांच्याकडे थोडा पेशन्स आहे त्या कोणालाही या ब्लॉगचे सदस्यत्व घेता येईल.

या ब्लॉग द्वारे कोणाला विणकाम शिकणे जमू शकेल ?
वरील तीन गोष्टी असलेल्या कोणालाही विणकाम जमू शकेल. अगदी या पूर्वी तुम्ही कोणतीही सुई हातात घेतली नसलीत तरीही तुम्हाला विणकाम शिकवण्याची जबाबदारी माझी :)

या ब्लॉगचे कामकाज कसे चालते? 
आपण एकदा या ब्लॉगचे सदस्यत्व घ्यायचे ठरवलेत आणि मला इ मेल पाठवलीत की मी बाकीचे तपशील आपणास कळावे. त्यानुसार तुमची माहिती तुम्ही मला पाठवली आणि फि माझ्या खात्यात जमा केलीत की लगेचच मी आपल्याला सदस्य करून घेते. आणि आपल्याला या ब्लॉगमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट पाठवते. ही रिक्वेस्ट तुम्ही मान्य केलीत की तुम्हाला या ब्लॉगचा अॅक्सेस मिळतो. आणि मग तो महिनाभर तुम्हाला हवे तेव्हा, हव्या तितक्याम्दा, हवा तितका वेळ हा ब्लॉग तुम्ही अभ्यासू, पाहू शकता.

महिना संपला आणि तुमची  पुढची फि जमा झाली नाही की आपोआपच तुमचे सदस्यत्व संपते आणि तुमचा अॅक्सेस बंद होतो. जर तुम्ही पुढील महिन्याची फि जमा केलीत तर हा अॅक्सेस चालू राहतो. त्यामुळे तुम्हाला हवा तेव्हढा वेळ तुम्ही सदस्य राहू शकता.

या शिवाय आठवड्यातील कोणत्याही चार दिवशी प्रत्येकी अर्धा तास ( एकूण दोन तास ) खास तुमच्यासाठी मी ऑन लाईन उपलब्ध असते. त्याचे दिवस आणि वेळा निश्चित केल्या जातात. तसेच काही इमर्जन्सी आली तरीही मी ऑन लाईन असते. याहू चाट, जी टॉक, स्काईप, व्होतास अप, इ मेल वा फोन या द्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.

विणकाम ऑनलाईन कसे शिकणार ? 
हे सुरुवातीला खूप अवघड वाटते. पण गेल्या वर्षभराच्या अनुभवावरून सांगते, हो हे विणकाम ऑन लाईन शिकता येते. माझ्या अनेक विद्यार्थिनीनी हे सिद्ध केलंय  :)

या ब्लॉगवर मी अगदी बेसिक गोष्टींपासून शिकवले आहे. अतिशय सोपी, भाषा, अनेक चित्र, आकृत्या, व्हिदिओ यांच्या मार्फत मी जास्तीत जास्त सोपे करून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

डीस्टन्स  लर्निंग मध्ये कसे शिकवतात याचा माझा १५ वर्षांचा अनुभव इथे कारणी लागला आहे. तसेच चित्रकलेची , फोटोग्राफी, व्हीडीओ, एडिटिंग, एनिमेशन या सर्व गोष्टींचा मला हे सर्व शिकवताना उपयोग होतो.
आज पर्यंत एकाही विद्यार्थिनीने समजत नाहीये अशी अडचण मांडली नाही , हे आवर्जून सांगावे वाटते.

या साठी पूर्वतयारी काय लागेल ?
पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी तुमच्या हाताशी असाव्या लागतील.
क्रोशा शिकावयाचे असेल तर क्रोशाची सुई : ३.५० मि.मी. वा घरी जी असेल ती. आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर.
जर दोन सुयांवरचे विणकाम शिकायचे असेल तर दहा नंबरच्या दोन सुया आणि कोणतीही सर्वसामान्य लोकर. हे सर्व सामान तुम्हाला कोणत्याही  एम्ब्रॉयडरी च्या दुकानात मिळते. सुरुवातीला बस इतकेच लागेल. नंतर लागणा-या सुया, लोकर तुम्हाला ब्लोगवर आल्यावर ठरवता येतील.

हे शिकल्या नंतर  पुढे काय ? 
या ब्लोगावारती प्राथमिक पासून प्रगत पर्यंतचे विणकाम शिकवले आहे. ह्या ब्लॉगवरील सर्व गोष्टी आत्मसात केल्यानंतर खरे तर तुम्ही कोणतेही विणकाम आपले आपण करू शकाल; या पदापर्यंत पोहोचाल. तरीही कधी कधी काही डिझाइन्स, पॅटर्न तुम्हाला येत नाही असे वाटले. तर त्यासाठी  www.artarati.blogspot.com हा ब्लॉग आहे. तिथे मी नव नवीन  डिझाइन्स, पॅटर्न  देत राहीन. आपल्याला नवे काही हवे असेल तर तेही तिथे टाकेन. त्यासाठी माझ्याशी संपर्क साधा.

थोडे फार आधीच येत असल्यास ? 
www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल.
परंतु विणकाम थोडे फार आधी येत असले तरी माझा सल्ला असा राहील की किमान एक महिनातरी "शिकाशिकावा" या ब्लॉगचे सदस्य व्हा. त्यामुळे माझी शिकवण्याची पद्धत आणि किमान काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समाजातील, आपली वेव्ह लेग्थ जुळेल. त्या नंतर  www.artarati.blogspot.com या ब्लॉग वरील  डिझाइन्स, पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकाल. हे दोन्ही तुम्ही एकाच वेळीही करू शकाल.

सर्वात महत्वाचे : 
या ब्लॉग वरती विणकामाचे सर्वसाधारण तंत्र शिकवण्याचा प्रयत्न मी करते आहे . परंतु हे लक्षात ठेवा की ही शेवटी एक कला आहे, त्या मुळे एखादी कलाकृती एकाने केली आहे तशीच अगदी दुस-याला जमेल असे नाही. तसेच एखादा पेटर्ण , एखादे डिझाईन शिकवता येईल परंतु प्रत्येक पेटर्ण वा प्रत्येक डिझाईन हे शिकवता येण्यासारखे असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमते नुसार, कौशल्यानुसार, कलात्मकते नुसार प्रत्य्रेकाची कलाकृती तयार होत असते.

Wednesday, October 23, 2013

माझ्या "शिकाशिकावा" या ऑनलाईन विणकाम शिकवणीच्या ब्लॉग वरील विद्यार्थीनींच्या काही कलाकृती

हा  प्राजक्ताने विणलेला फ्रॉक



 हा मीनलने दोन सुयांवर  विणलेला हाफ स्वेटर




हा अंजलीने विणलेला नाजूक फुलांचा फ्रॉक



अंजलीने विणलेला हा अजून एक फ्रॉक




अंजलीने  विणलेला हा मुख-यांचा फ्रॉक




हा  मिथिलाने केलेला पहिला फ्रॉक



अंजलीने  विणलेला हा "दहीभाताचा" फ्रॉक




अंजलीने विणलेली तबल्या डग्ग्याची कव्हर्स


रजनीने  केलेला अननसाचा गोल रुमाल



अमृताने  केलेले हे पहिले जाकिट




 अंजलीने तबल्यासाठी तयार केलेले कव्हर




हा  रजनीने केलेला फ्रॉक



Tuesday, October 22, 2013

शांकलीची गुरुदक्षिणा

शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी स्मित

घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.

हे सारे अपारंपारिक अशा ऑन लाईन शिकण्यातून हे विशेष.. अशा पद्धतीने शिकणे खरोखरीच अतिशय अवघड प्रकार. शिकवण्यासाठी लिहिलेले, दाखवलेले नीट अभ्यासणे, त्यावर प्रॅक्टिस करणे, काही शंका असतील तर लगेच स्ंपर्क साधून अतिशय ऋजूतेने शंकानिरसन करून घेणे; सांगितलेले, सांगितलेल्या पद्धतीने अन तेव्हढ्या वेळा करणे हे सगळेच या पद्धतीत अतिशय आवश्यक असते. हे सारे तिने केलेय. आता तर ती दोन सुयांवरचे विणकाम करते आहे.

इतकी छान गुरुदक्षिणा देणारी विद्यार्थिनी सगळ्यांनाच लाभो स्मित

शांकलीने केलेला बारीक दो-याचा अतिशय नाजूक अन सुबक टेबल टॉप :

IMG_4497[1] copy.jpg

Thursday, August 8, 2013

नवा डिझायनर

माझ्या "शिकाशिकावा" या ब्लॉग वरती एक नवा डिझायनर उद्याला येतोय :)
वंदना आता किती एक्स्पर्ट झाली आहे विणकामात तुम्हाला माहितीच आहे. आता तर तिच्यात  "अपने बलाबुते पार" विणायची क्षमता पण आलीय :) मध्यंतरी तिला नेट वरती एक फ्रॉक फार आवडला. तो करता येईल का असे मला तिने विचारले. खरे तर त्या साईटवर कसे करायचे हे थोडक्यात लिहिले होते. म्हणून मी तिला त्यावरून करायला सुचवले. अर्हात ते सारे इंग्रजीत होते अन आपल्या ब्लॉगच्या मानाने खुपच त्रोटक होते. पण वंदना ची कमाल तिने अगदी बरोब्बर केले. शाब्बास वंदना :)

सारा फ्रॉक झाला. पण गळ्याला तिला जरा जास्तच ओके बोके वाटत होते. मग मी तिला गळ्याजवळ खांब घाल सांगितले. अन तिने ते घालताना मस्त डिझाईन बनवले, आपल्याच मनाने :) बघा तयार होतोय ना डिझायनर?


Thursday, June 20, 2013

अंजलीने विणलेला अननसाचा फ्रॉक

हा माझी "शिकाशिकावा" ब्लॉग वरच्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीने विणलेला अननसाच्या डिझाईनचा फ्रॉक


Saturday, May 25, 2013

अंजलीने केलेला स्कर्ट

नातीसाठी ( भाचीच्या लेकीसाठी ) अंजलीने, माझ्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीने केलेला हा भरपूर घेराचा लोकरीचा स्कर्ट


Sunday, May 19, 2013

वंदनाने केलेला पोंचू

वंदना ला नेट वर हा पोचू दिसला. तिला तो खूप आवडला. तिच्या आधीच्या विणकामाचे बक्षिस म्हणून मग   मी त्याचे डिझाईन बसवले अन तिला प्रेझेंट म्हणून नकाशा काढून पाठवला आणि पहिल्या फक्त पहिल्या ८ ओळी तिला लिहून कळवल्या. नंतर बाकीचा पोंचू तिने नकाशा बघून पूर्ण केला. खरे तर हा पोंचू खूप अवघड. त्यातून अननसाचे डिझाईन. पण वंदनाने अतिशय सुबकपणे, सफाईदार विणला. शाब्बास वंदना :)

बघा ना, कित्ती मस्त झालाय ना? :)




 माझ्या ब्लॉगचे चीज झाले असे मला वाटतेय, थांकु वंदना :)

Thursday, March 14, 2013

माझ्या विद्यार्थिनीचा माझ्या ब्लँकेटला झब्बू

मी बिस्कीट विणीचे ब्लँकेट  विणले होते; त्याला माझ्या विद्यार्थिनीने; वंदनाने झब्बू दिला तो हा असा :)


हा त्याचा क्लोज अप

  शाब्बास वंदना :)

Friday, March 1, 2013

खूप आनंदाचा दिवस !

आज माझा खूप आनंदाचा दिवस !

आज एक मोठे विणकाम माझ्या विद्यार्थिनीने पूर्ण केली. वंदनाने आज शिंपल्याचा फ्रॉक पूर्ण केला.

डीस्टन्स मोडने कला शिकवता- शिकता येतं हे आज सिद्ध झालं. धन्यवाद वंदना :) आणि खूप खूप अभिनंदन.

हा पहा तिनं विणलेला फ्रॉक

Thursday, February 21, 2013

माझ्या विद्यार्थिनींच्या कलाकृती

माझ्या " शिका शिकवा" या ब्लॉग मधल्या विद्यार्थिनींच्या या कलाकृती :

हा वंदना विणत असलेला फ्रॉक, आता चांगला आकार घेऊ लागलाय.


हा उमा विणत असलेला फ्रॉक.


Friday, January 25, 2013

"शिकाशिकवा" मधील विद्यार्थिनींच्या पहिल्या कलाकृती

वंदनाने विणलेली  पर्स 

आईची कलाकृती, लेकीचे बक्षिस
लेकीने जेवण पूर्ण जेवल्याबद्दल वंदनाने ही पर्स तिला बक्षिस दिली  :)
________________________

स्वातीने विणलेली चांदणीची डॉली 

_______________________
 वंदनाने विणलेली चांदणीची डॉली 


Monday, January 21, 2013

"शिकाशिकवा" मधील विद्यार्थिनीचे पहिले प्रयत्न

"शिकाशिकवा" या माझ्या विशेष ब्लॉग वरील माझी विद्यार्थिनीनी केलेले हे पहिले प्रयत्न.

दूरस्थ पद्धतीने  ( डिस्टन्स मोडने ) हे शिकणे खरोखर अवघड आहे. कोणतीही कला अशी एकलव्याच्या पद्धतीने शिकणा-या माझ्या या सगळ्या विद्यार्थिनीं चे मला खूप कौतुक वाटते.

हे वंदनाने विणलेले



आणि हे अश्विनीने विणलेले


आणि ही स्वातीने विणलेल्या सुलट सुयांची पट्टी


Tuesday, January 15, 2013

"शिकाशिकावा" आता फक्त सदस्यांसाठी

आज पासून माझा विणकाम आणि भरतकामाचा शिकवण्यासाठीचा ब्लॉग : www.shikavashikavi.blogspot.com हा आता फक्त सदस्यांसाठी सुरु  झाला आहे. तिथे  रोज काही ना काही नवीन शिकवण्याचा माझा प्रयत्न राहील.

आज पासून लगेचच काहींनी शिकायला सुरुवातही केलीय. मला आणि त्यांनाही खूप मजा येतेय.
सध्या माझी त्याच ब्लॉगची लगीनघाई असल्याने बाकीच्या ब्लॉगवर थोडी सुस्त असेन मी :)

अजूनही काहींना या सहभागी व्हायचे असेल त्यांनी उजवीकडच्या "Contact me" यामध्ये आपली माहिती भरून पाठवावी. त्या सदस्यांना फेब्रुवारी २०१३ साठी सदस्यत्व देण्याचा मी प्रयत्न करेन, धन्यवाद !

Friday, January 11, 2013

मुदत वाढ

शिकाशिकवा ब्लॉगची ही सुरुवातच असल्याने जानेवारी २०१३ साठीचे सदस्यत्व घेण्याची मुदत १४ जानेवारी पर्यंत वाढवली आहे.
त्यानंतर, १५ तारखेपासून हा ब्लॉग केवळ सदस्य झालेल्यांसाठीच चालू राहील :)
ज्यांना ह्या ब्लॉगचे सदस्यत्व फेब्रुवारी २०१३ वा नंतर घ्यायचे आहे त्यांनी कृपया
उजवी कडच्या " Contact Me " इथे आपली माहिती लिहून पाठवावी. 

Saturday, December 29, 2012

"शिकाशिकवा" एक नवा प्रयोग, संकल्पना आणि स्वरुप

 "शिकाशिकवा": www.shikashikava.blogspot.com हा माझा, एक नवा प्रयोग.
"शिकाशिकवा" या ब्लॉगमध्ये सुरुवातीला मी दोन सुयांवरचे विणकाम ( उदा. लोकरीचे विणकाम), एका सुईचे विणकाम ( क्रोशा), आणि भरतकाम या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करणार आहे. ही सुरुवात अगदी बेसिक गोष्टींपासून करणार आहे.काही माहिती लेखी स्वरुपात, काही चित्रांमधून, काही फोटोंतून तर काही व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
शक्यता आहे की काहींना ही बेसिक माहिती आधीपासून माहिती असेल परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की बेसिकपासून शिकत गेले की चांगले पक्के होते. उत्साहाने मोठा स्वेटर घेतला, मग कालांतराने कंटाळा आला, अवघड वाटायला लागले अशा कारणांनी ती गोष्ट सुटून जाते. त्या ऐवजी छोट्या छोट्या गोष्टी जमू लागल्या की आनंद होतो, उत्साह वाढतो. सवयीने हळुहळू मोठ्या गोष्टीही सहज जमू लागतात. त्यामुळे छोट्या गोष्टींपासून सुरूवात करू, बघू काय काय जमतय आपल्याला :)


साधारण १५ जानेवारी २०१३ पासून ह्या ब्लॉगद्वारे विणकाम - दोन सुयांवरचे, एका सुईचे आणि भरतकाम " शिकवण्याचा क्लास " सुरू होईल. या क्लासच्या- ब्लॉगच्या सदस्यत्वाची प्रक्रिया १ जानेवारी २०१३ पासून सुरू होतेय.

वेगवेगळे टाके, डिझाईन्स, प्रकार आणि नमुने यात शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिकणा-यांना आपली कला इथे टाकण्याचीही सोय राहील.

१५ जानेवारी २०१३ पासून प्रत्यक्ष शिकवण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे शिकवणे सुरू झाले की हा ब्लॉग केवळ "सदस्यां"साठीच खुला राहील, याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे ज्यांना या ब्लॉगचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृपया मला इ-मेल करावी (उजवी कडचे "Contact Me" हे गॅजेट पहा.)
"सदस्यत्व"साठीचे तपशीलवार उत्तर मी त्यांना पाठवेन.


 "शिकाशिकवा" ब्लॉग : संकल्पना आणि स्वरुप 


आता हा ब्लॉग कसा काम करेल हे बघू.
सर्व  प्रथम हा ब्लॉग सशुल्क असेल हे नोंदवते.
या ब्लॉगवर मी हळूहळू काही गोष्टी टाकत जाईन. त्याची माहिती तुम्ही हा ब्लॉग वाचून, पाहून घेत जाल. त्या त्या गोष्टी करताना काही अडचण आली की तुम्ही त्या मला याच ब्लॉगवर विचारा. मी त्या त्या गोष्टी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करेन.

कधी तुमच्या अडचणी तुम्ही लिहून सांगू शकाल. परंतु हे नेहमीच शक्य नाही. शेवटी ही कला असल्याने प्रत्यक्ष तुमचे कामही पहावे लागेल. तुम्हालाही तुमचे काम दाखवावेसे वाटेलच ना :) तर तशीही सोय मी इथे करतेय. तुम्हाला तुमचे म्हणणे लेखी / फोटो/ चित्र/ व्हिडिओ द्वारे इथे टाकता येई. कसे ते त्या त्या वेळेस सांगेन.

तसेच ज्यांना स्काईपची सोय शक्य आहे त्यांचा आपण स्काईपवर एक गृप करू, वेळा साधारण ठरवू अन त्या वेळेस स्काईपवरही आपल्याला संवाद साधता येईल.

हे शक्य नसेल त्यांना याहू चॅट, जी टोक, व्होट्स अप  किंवा फेसबुकवरही माझ्याशी संपर्क साधता येईल. आपल्या सर्वांच्या सोईच्या काही वेळाही आपण निश्चित करू. ज्यान्वये आपल्याला चटकन अडचणी सोडवता येतील.

अर्थात तुम्हाला जेव्हा वेळ मोकळा असेल तेव्हा तुम्ही ब्लॉग बघून तुम्हाला हवे असलेले शिकू शकाल. वर जे सांगितले ते अडचणीं संदर्भात :)

Monday, December 24, 2012

शिकाशिकवा

अनेकांनी मला विचारले होतेकी विणकाम, भरतकाम  शिकवाल का? याबद्दल खुप दिवस घोळत होतं. काही करता येईल का?

त्या संदर्भात मी एक नवीन ब्लॉग तयार करते आहे. ज्यामध्ये बेसिक पासून काही नमुने, काही डिझाईन्स, काही कलाकृती शिकण्यासाठी काही लेखी सूचना, काही व्हिडिओज टाकण्याचा विचार आहे. हे सगळे ऑनलाईन स्वरूपाचे शिकवणे असेल.

ह्या ब्लॉगला भेट देण्यासाठी सदस्यत्व अनिवार्य ठेवले आहे. ज्यांना खरोखरच काही शिकायचे आहे अशांसाठीच हा ब्लॉग असेल.

साधारण १५ जानेवारी २०१३ पासून हा ब्लॉग कार्यन्वित करण्याचा मानस आहे.