Friday, January 21, 2011

"लवासा" की "ल.वा.सा."

मी कॉलेजमध्ये होते तेव्हाची गोष्ट !
आई,बाबा,ताई अन मी; आम्ही काश्मिर बघायला गेलो होतो. काश्मिरबद्दल खुप काही ऐकलं होतं, वाचलं होतं, अन मनातही त्याची काही स्वप्न होती. जम्मू, श्रीनगर, पहेलगाम, गुलमर्ग आणि डक्सूम या ठिकाणी आम्ही फिरलो होतो. अन खोटं वाटेल तुम्हाला मला नाहीच आवडलं काश्मिर ! अनेक जणं याला नावं ठेवतील... म्हणतील काश्मिर काय आई, बाबा, ताई बरोबर बघायचं का... गाढवाला गुळाची चव काय ... इ. इ.

पण नंतर मी माझा नवरा अन लेक आम्ही काश्मिरला गेलो तेव्हाही हेच झालं. खरं तर मी माझा मागचा अनुभव अगदी मनापासून दूर ठेवला होता... पण याही वेळेस नाहीच आवडलं काश्मिर !
परत आल्यावर मी जरा नीट विचार केला.... आपल्यातच काही कमतरता आहे का ? आपल्याला महाबळेश्वर आवदतं, माथेरान आवडतं, मुनार आवडतं... मग काश्मिर का नाही आवडलं ... ?
न मग काही कारणं जाणवली...

एक तर जम्मू हे आपलं म्हणायचं म्हणून काश्मिर... त्यामुळे ते नावडणं ठिक होतं.
त्यातल्या त्यात गुलमर्ग अन डक्सूम आवदलं होतं; डक्सूमतर फारच आवदलं होतं.
पण श्रीनगर अन पहेलगाम ... अजिब्बात आवदलं नव्हतं... दोन्ही वेळेस...

मुळात काश्मिर हे व्हॅलीत वसलय... हिमालयातल्या अनेक पर्वत राशींच्या कुशीत वसलय ते... पण त्याच मुळे तिथली हवा जरी थंड असली तरी एक प्रकारे तिथली हवा कोंदट आहे... जे जे काश्मिरला गेलेत त्यांनी आठवून बघाबरं छान गार हवेची झुळूक, झोत आठवतोय अंगावर आलेला ? म्हणजे जणू काही गारे गार बंद खोलीच... अर्थात गुलमर्ग याला अपवाद ! कारण ते डोंगरावर वसलय.

चारी बाजूंनी प्रचंड पर्वतांनी वेढलेल्या काश्मिर व्हॅलीत हवा येणार कोठून ? अन मग असे कोंदट काश्मिर मला नाही आवदले हे बरोबरच होते... आजही एसी खोलीत मी नाही जास्ती वेळ बसू शक्त... त्यापेक्षा मला गॅलरीत जास्त आवडेल उभं राहायला :)

अन डक्सून हे ही चारी बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे, पण तिथे मोठी मोठी झाडं आहेत अन मुख्य म्हणजे खळखळ वाहणारी नदी आहे... मला वाटतं बाकीचे काश्मिर म्हणजे बर्फाची बंद पेटी आहे... काहीसा निर्जीवपणाचा भास तिथे होतो...

असो... तर मला नाहीच आवदत काश्मिर... आता तुम्ही म्हणाल, हे काय चाललय? नाव लवासाचे अन विषय कुठल्या कुठे चाललाय ? पण हे सगळं मी सांगितलं कारण वरचे माझे लॉजिक ज्यांना पटलं निदान समजलं, त्यांनाच पटेल, समजेल मला लवासाबद्दल काय म्हणायचय ते :) असो नमनालाच मणभर तेल असं झालय नाही का ? तसा ललित लेख लिहायचा माझा हा पहिलाच प्रयत्न... त्यामुळे मला माफ कराल असं वाटतय.... कराल ना ?

आता लवासाबद्दल. इथे खुप वाचलं होतं लवासाबद्द्ल, काही फोटोही बघितले, बहिण, भाचा, मित्रमैत्रिणींकडून खुप ऐकलं, अन लेकाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही रविवारी निघालो लवासाला....
लवासाला जायचा रस्ता अतिशय सुरेख ! ड्रायव्हिंगचे स्कील पणाला लागावे अशी वळणं अन त्यांचे चढ... आजूबाजूचा निसर्ग...

नुकतीच थंडी पडायला लागली होती त्यामुळे छान वाटत होतं. पौड वरून डावीकडे वळलो अन थोड्याच वेळात वरसगावचे धरण दिसू लागले. अगदी जवळ गेल्यावर माणसाच्या या कलाकृतीत निसर्गाने आपली भर घातली होती ती अशी :

१.
From LAVASA


आम्हाला मुळात निघायलाच इशीर झाला होता त्यामुळे ऊन चांगलेच होते, त्यामुळे सगळ्या फोटोत ते जाणवतेय, पण असो. तर या इंद्रधनुष्याने खुष होऊन आम्ही पुढे निघालो...
आजू बाजूचा निसर्ग हिरवा शालू नेसून आमच्या स्वागताला सज्ज होता. पहावे त्या डोंगरावर हिरवाई नांदत होती. डोळ्यांचा थकवा पार पळाला. वरचे ऊन जाणवेनासे झाले. पहा ना तुम्ही पण

२.
From LAVASA


३.
From LAVASA


४.
From LAVASA


मनात खात्री पटली आता खरच निसर्ग सुखात आम्ही नाहून निघणार ! आता रस्ताही चांगला रुंग, नितळ अन स्वच्छ अन नीट बाक दिलेला झाला. ड्रायव्हिंग करणे सुखाचे वाटू लागले. अन तेव्हढ्यात हा दिसला... प्रथम चटकन लक्षात नाही आले.. अन लक्षात आल्यावर आम्ही चकीतच....

५.
From LAVASA


लवासाच्या श्रीमंतीबद्दल ऐकून असूनही आम्ही जरा चक्रावलोच. भारतात अशी यंत्र आहेत... कार्यरत आहेत हे मी तरी पहिल्यांदाच पहात होते. तिथल्या श्रीमंतीची ही चुणूक पहिल्या काही मीटरातच पहायला मिळाली. रस्ता झादणारं, धुणारं, बाजूचे गवत काढणारे हे यंत्र बघून मी तरी धन्य झाले बाई :)
अन मग बरीच चढाची वळणं घेत आम्ही लवासाच्या प्रवेशद्वाराशी आलो. आता लवासाची ओढ लागल होती, म्हणून न थांबता चालत्या गाडीतूनच फोटो घेतला त्याचा अन पुढे झालो.

६.
From LAVASA


वाटेत गाड्यांमधून जाणार्‍या, दमलेल्या वाटसरूंसाठी अनेक सुरेख थांबेही आहेत. अतिशय आखीव रेखीव अशा या थांब्यावर मला मात्र एकही वातसरू दिसला नाही ते सोडा. पण तिथल्या फुलझाडांच्या नीगे वरून किमान दिवसातून दोनदा माळी नक्की येत असावा तिथे हे खरं. चला १००-१२० च्या स्पीडने, काळ्या काचा केलेल्या गाडीतून जाणार्‍या, डोळ्यावर रेबेनचा गॉगल चढवून, मागे रेलून डोळे मिटून बसलेल्या वाटसरूच्या डोळ्यांना त्या फुलझाडांनी केव्हढे सुख मिळत असेल नाही !

७.
From LAVASA


८.
From LAVASA


मग उताराची बरीच वळणं घेत घेत आम्ही लवासाच्या शोधात असेच पुढे पुढे जात राहिलो. अन मग डोळ्यांना सुखावह प्रचंड जलाशय दिसला. हेच ते वरसगावने अडवलेले पाणी.

९.
From LAVASA


अन अखेर आम्हाला पहिले दर्शन झाले लवासाचे ....

१०.
From LAVASA


लांबून मेकॅनोनी तयार केलेल्या खेळण्यातल्या घरांसारखी एकसारखी रंगीबेरंगी घरं दिसू लागली. छोट्या खिडक्या, कौलारू छपरं, पिवळी-केशरी ( सॉरी हं यलो अँड ऑरेंज काँबिनेशन... ) भिंती, सगळे कसे टायनी, स्वीट, स्टाईलीश अन सोफेस्टीकेटेड.....
अन तेव्हढ्यात डावी कडे निवांतची पाटी दिसली. आधी गेलेल्यांनी फार कौतुक केलेले असल्याने अन 'आधी पोटोबा मग विठोबा' यावर आमचा नितांत विश्वास असल्याने आमची गादी वळली निवांत कडे :)
ब्रेकफास्टची वेळ संपल्याने आम्ही सँडविचेस अन कॉफीची ऑर्डर दिली अन मग मी तिथल्या टेरेसवर गेले. व्वा काय सुरेख टेकड्या होत्या आजूबाजूला... समोर ही

११.
From LAVASA


तर डावी कडे ही

१२.
From LAVASA


अन उजवी कडे ही

१३.
From LAVASA


हिरव्यागार पर्वतराजींवरून नजर अजून डावीकडे वळली

१४.
From LAVASA


आहाहा.. सुरेख गडद हिरवाई ... अन अजून डावी कडे....

१५.
From LAVASA


झालं ना तुम्हालाही धस्स.... ! हिरव्यागार निसर्गाखाली असलेली भडक्क लाल माती...... मानसाचा निसर्गावरचा रानटी- लासवट विजय !
या अजून काही विजयपताका .....
डोंगराची कुसही नाही सोडली उकरायची....

१६.
From LAVASA


एका छापाची घरं करण्यासाठी निसर्गातले वैविध्य पार घालवून लावलच पाहिजे नाही ? निसर्गाची पाळंमुळं पार पार उखडलीच पाहिजेत ना....

१७.
From LAVASA

१८.
From LAVASA


मग डोंगराची कुस असू दे, उतार असू दे नाही तर माथा... आम्हाला थांबा नाहीच म्हणू शकत ना निसर्ग.....

१९.
From LAVASA


२०.
From LAVASA


२१.
From LAVASA


डोंगराचा हा उभा चिरलेला उतार... काळजाला चीरत नाही जात ????????

२२.
From LAVASA


निसर्गाला ज्याच्या रुपात अनेक जणं पाहतात त्या देवाच्या देवळालाही एका चौकटीत बांधून ठेवलय, अगदी त्याच्या जवळच्याही झाडाला केवळ नमुना म्हणून ठेवल... हेही नसे थोडके...

२३.
From LAVASA


एकूणच कशी झाडांची कत्तल झालीय याचे एक नमुना चित्र... एव्हढ्या मोठ्या लँडस्केपमध्ये मोठी म्हणावी अशी झाडं सहज हातावर मोजता येतील इतकीच.... बघा बरं मोजून....

२४.
From LAVASA


किती झाली... १४ की १५ ???????

अजून खरं वाटत नाही ?
मग बघाच हे...
याला भूमीचे वस्त्र्हरण नाही म्हणायचे तर काय म्हणायचं.....

२५.
From LAVASA


बघा, मागचा निसर्ग अन पुढची आमची प्रगतीच्या नावाने चाललेला
षंढपणा... निलाजरेपणा....भोगासक्ती.....

२६.
From LAVASA


हा फोटो पुन्हा बघताना मला एक फार भयानक गोष्ट जाणवली... यात पुढे डावीकडे एक गाय दिसतेय...
बघितलीत बिचारी १२च्या उन्हात बसलीय, तिला सावली देणारे एकही झाड नाही सापडले... याही पेक्षा भयानक म्हणजे आम्ही जवळ जवळ तीनदा गोल गोल, आडवे, तिरके सगळ्या वाटांवरून फिरलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक फोटो घेतले होते. पण या फोटोत दिसतेय तेव्हढीच गाय आम्हाला दिसली... दुसरा कोणताही प्राणी तिथे आढळला नाही, अगदॉ खरच. अन हेही माझ्या फोटो बघताना लक्षात आलं, अन लेक, नवरा दोघांनीही आठवून बघितलं... अहं दुसरा कोणताही प्राणी आम्हाला आढळला नाही...

हे अजून एक गोजिरे रुपडे....

२७.
From LAVASA


सुंदर जलाशय, बोटींगची सोय अन अलिशान बंगले, घरं....

२८.
From LAVASA


झाडं नसलेला निर्विकार रस्ता, उंच खांब-आसपास कुत्रे नसलेले

२९.
From LAVASA


आणखीन एक उभा कापलेला डोंगरउतार....

३०.
From LAVASA


अन ही आहे तिथली शाळा...
ग्राऊंडला जागाच नाही.... बंद खिडक्या - एसीत वाढणारी ही प्रजा निसर्ग काय अनुभवणार तिथला ?
ना एकही झाड आहे.... मला तर तो आधुनिक कोंडवाडाच वाटला बाहेरून....

३१.
From LAVASA


अन हे काय आहे कलले नाही. नाव होते- MERCURE . काय होते हे कलले नाही पण रविवारी सुटीच्या दिवशी हे पाहून राग आला, मनस्ताप झाला अन वाईटही वाटले.
भारताचा राष्ट्रध्वज असा कोठेही कधीही लावता येतो? अन त्या शेजारी ऑस्ट्रेलियाचा मग फ्रन्सचा अन माहिती नाही कुठचा... हे नक्की काय होते मला कलले नाही....

३२.
From LAVASA


या अशा ठोकळेबाज, भव्य, बंदिस्त इमारती

३३.
From LAVASA

तिथली आवडलेली एकच गोष्ट... तिथल्या हॉटेलमधले हे...

३४. गोटे
From LAVASA


अन मग पाय उचलले आमचे. पुन्हा न येण्याचा वादा केला अन बाहेर पडलो...

३५.
From LAVASA


काहींना यात फारच टोकाची भूमिका मी घेतलीय असे वाटेल. पण ही भूमिका नाही, हे सगळे वातणे आहे... माझा लवासाबद्दल काहीही अभ्यास नाही. फक्त एका सामान्य माणसाची ही प्रतिक्रिया आहे. अन सामान्य आहे म्हणूनच काही प्रश्न मला पडलेत.
तिथल्या हवे साठी जर हे लोक तिथे गेलेत तर मग सगळी घरं अशी बंदिस्त- एसी वाली का ?
तिथे जाऊन जर ते एसीतच बसणार आहेत तर त्या पेक्षा आपापल्या एसी घरात बसले तर काय वाईट?
तिथे जाऊन काय करणार? ना तिथे काही पाहण्यासारखे आहे ना काही करण्या सारखे..
एवढा सगळा खर्च कशासाठी?

जाऊ दे ये हमारे बस की बात नहीं, हेच खरं....

मी आपली लवासाला नवं नव दिलंय, ल. वा. सा. " लई वाईट साईट "

त्या ल. वा. सा.म पेक्षा त्याच्या आजूबाजूचा हा निसर्ग मला तरी जास्त भावला....

३६.
From LAVASA

No comments:

Post a Comment