चैतन्य दिक्षीतने सुरु केलेल्या स्वरास्वाद या ग्रुप मुळे संगीताकडे जरा जास्त अभ्यासपूर्ण नजरेने बघायचा प्रयत्न सुरु केलाय. माझा काही खूप अभ्यास नाही. इथून तिथून मिळालेली माहिती इथे फक्त मांडायचा प्रयत्न करतेय.
आज थोडे यमन रागाबद्दल.
यमन राग रात्रीच्या पहिल्या प्रहराचा, संध्याकाळ चा राग.
भक्ती, श्रुंगार, गंभीर, गुढ असे भाव हा राग व्यक्त करू शकतो.
थाट कल्याण .
वादी ग, संवादी नि
या रागात सर्व स्वर लागतात आणि त्यातील म हा तीव्र म् असतो.
आरोह : निं रे ग म् ध नि सो
अवरोह : सो नि ध प म् ग रे सा
पकड : निं रे ग रे म् प, रे ग रे, निं रे सा
यमन गात असताना शक्यतो अवरोहात पूर्वांग गाताना सा रे ग असे न गाता; निं रे ग रे सा किंवा निं धं निं रे ग रे सा असे गायले जाते.
आरोहात प वर्ज असतो.
या रागात प रे संवाद सादर करताना प नंतर म् आणि ग यांचे कण स्वर घेऊन रे वर येतात.
तसेच पुढे म् ध नि ध प असे गायले जाते.
या रागात न्यासाचे स्वर (एखाद्या स्वरावर थांबणे ) बरेच आहेत. सा आणि प तर नेहमीच न्यासाचे असतात. ग आणि नि हे वादी संवादी असल्याने तेही न्यासासाठी आहेत. शिवाय रे, ग, म् याही स्वरांवर न्यास करता येतो. फक्त ध हा स्वर यमन मध्ये न्यासासाठी वापरला जात नाही.
याच मुळे या रागाचा आवाका मोठा आहे. तसेच कोणत्या स्वरांवर न्यास करता यावर त्याचा भाव व्यक्त होणे अवलंबून असते. त्यामुळे यमन मध्ये वर म्हटल्याप्रमा णे विविध भाव व्यक्त होऊ शकतात.

No comments:
Post a Comment