चित्रपट अनुभव1971
बासु भट्टाचार्य दिग्दर्शक निर्माता कथा
संगीत कनु रॉय
गीत गुलझार
गायलय गीता दत्त
राग खमाज वर आधारित लोकधून मधून आलेला
कहरवा ताल एक वेगळा ताल हिंदी गाण्यात कमी वापरला जातो.
कहाँ वरची कारिगरी आहाहा
चित्रित केलय तनुजा अन संजीवकुमार
तनुजा अती रोमँटिक, चुलबुली
संजीवकुमार तितकाच शांत, ब्रह्मचारी स्वभावाचा. बासुजींचं खरोखर कौतुक हे इतकं रोमँटिक गाणं या दोघांकडून करवून घेणं
यातलं अजून एक सेक्सी गाणं मेरा दिल जो मेरा होता.... त्या काळाच्या मानाने तनुजाचे बोल्ड सीन्स अगदी ;)
आता मेरी जाँ बद्दल.मॅच्युअर्ड रोमँटिक गाणं म्हणेन मी याला. छान मुरलेलं लग्न, अन तरीही धगधगती आच, तितकच आकर्षण अन तितकच समर्पितपणा, सगळं घडूनही प्रत्येक घडण्याचं तितकच ताजेपण,,तितकच आसुसलेपण. पूर्ण ओळखीतूनही सापडणारं नवं काही. जे ओळखीचच आहे, पण तरीही ताजं,नवं, उत्फुल्ल!
बाकी चित्रपट नंतर वेगवेगल्या लाटेत वर खाली होत जातो. नात्यामधले नवनवे आयाम तपासले जातात. कधी जरा संशयाने, कधी छे छे म्हणून सगळं नाकारणं, गैरसमज, राग, लोभ, विश्वासाचा तळ खरवडून वर काढणारे सगळे काही....नात्यातला सर्वात महत्वाचा घटक, विश्वास! स्वत:च्या आत वळून पहायला लावणारा, आरशातले स्वत: चेच प्रतिबिंब पुन्हा पुन्हा पडताळून बघावे वाटणे. अन त्यातून स्पष्ट, स्वच्छ होत जाणारं, अजून घट्ट होत जाणारं नातं. आपलं आपल्यालाच तपासून पहाणं. आणि मॅच्युअर्ड वाटणारं नातं, खऱ्या अर्थाने मॅच्युअर होणं. गैरसमजाला कधी समजायचं, खऱ्या अर्थाने समजायचं हे उलगडून दाखवणारा हा समंजस चित्रपट! मेरी जाँ जेव्हा खरी जाँ होते :)
No comments:
Post a Comment