दासताँ 1950 फार गाजलेला चित्रपट!
अब्दुल रशिद कारदार दिग्दर्शित
तीन भावंडं अन नव्याने आलेली एक अनाथ मुलगी. या सगळ्यांचा बालपणापासून तरुण पणा पर्यंतचा प्रवास म्हणजे दासताँ.
चित्रपटाचं संगीत आहे नौशाद यांचं.
गीत शकिल बदायुनी यांचं.
अन हे गाणं आहे तारारी, आरारी...
गायक सुरैय्या आणि रफी.
चित्रित केलय सुरैय्या अन राज कपूरवर. राजकपूरला सहसा असा आनंदी, रोमँटिक फार कमी पाहिलाय. त्याच्या रोमान्स मधे नेहमी एक समोरच्या नायिकेला तडपवण्याची झाक असते. त्याची नायिका सतत त्याच्यासाठी आसूसलेली वगैरे असते. अन प्रेमात नेहमी त्याचा वरचष्मा जाणवत रहातो. त्या काळातही काहीसा डॉमिनन्ट नायक त्याने साकारला. हे गाणं मात्र याला अपवाद आहे.
उलट सुरैय्या सगळा भाव खाऊन जाते या गाण्यात. अर्थात हे स्वाभाविक आहे, या वेळी सुरैय्या तिच्या करियरच्या सगळ्यात वरच्या पायदानावर हेती. तर राजकपूर तसा नवा होता. अशी जरा उलटी भूमिका बघताना मला तर थोडा आसूरी आनंद मिळाला ;)
एरवी राजकपूर कितीही आवडत असला तरी बायकांप्रती त्याचा अॅप्रोच मला खटकत आलाय. म्हणजे हृदयात एक कळ येते वगैरे ठिके हो, पण सतत का आपला त्याचा माज, हुर्रऽऽऽ ;)
तर ते असो. आज जरा बोलायचय ते संगीत अॅरेमजमेंट बद्दल. मलाही जरा कमीच माहिती होती. पण एका एशियन फिल्म फेस्टिव्हलमधे एक फिल्न बघितली अन डोळे लख्ख उघडले. नुसता संगीतकार नव्हे, गायक नव्हे, वादक नव्हे तर अरेंजरची किती मोठी भूमिका असते ते लख्ख कळलं.
या गाण्यात मधे मधे सतत साथ करणारं व्हॉयॆलिन वाजवल अँथनी गोन्साल्व्हिस यांनी. हेच ते महान अरेंजर. आता हे गाणं ऐका. अन मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन माझा त्यांच्यावरचा लेख जरूर वाचा. https://arati-aval.blogspot.com/2012/01/blog-post_19.html
No comments:
Post a Comment