बडी माँ हा 1945 चा चित्रपट. मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका नूरजहाँ नायिका अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर, अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.
या गीताचे संगीत कार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मुरकीमधे.
सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), एक पुरुष कलाकार ( दामुअण्णा मालवणकर).
आज या चित्रपटाची फिल्म, शक्यता आहे की फिल्म
आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.
सध्या इतकच!
-
No comments:
Post a Comment