सुनिताबाई सतत थांबवतात, विचार करायला लावतात, अवंढा गिळायला लावतात अन सरळ पुस्तक बाजुला ठेवायला लावतात ...
सामान्यत: लेखक पुस्तक खाली ठेवू देत नाहीत. इथे उलटच होतय. चार पानं वाचली नाहीत तर थांबावं वाटतं. उलटं वळून आपल्या आत काय उलघाल झाली पहावं वाटतंय.
आजीच्या आयुष्यावर लिहिल्यावर शेवटी काय लिहितात बघा हं...
" आजीच्या डोळ्यातल्या त्या पाण्यातून त्या दिवशी स्त्रीजातीचे अथांग दु:ख वाहतं होत असेल का? ही नदी शेवटी कोणत्या समुद्राला जाऊन भिडते? तिथे या जातीचे आणखी काय काय आहे?"
कसं चर्रकन ओरखडा उठला... तापलेली पळी कढीत उतरल्यावर जशी कढी उतू जाते, तसं नकळत डोळे भरून आले...
No comments:
Post a Comment