Saturday, February 11, 2023

शंभरावं स्थळ : शॉर्ट फिल्म बद्दल

शंभरावं स्थळ ही शॉर्ट फिल्म बघितली. 

कथा जरा वेगळी. प्रेझेंटेशन छान.

कामं छान केलीत सगळ्यांनी. छोट्या छोट्या गोष्टीत कष्ट घेतलेत जाणवलं. पिक्चरायझेशनही छान. कथा बांधीव, आटोपशीर.

संगीत छान, उगा भसाभस  नाही.


तसं सगळं गुडीगुडीच.

काही तरी वेगळं सांगायचय करत पारंपरिक गोष्टच वेगळ्या वेष्टनात गुंडाळून पुढे केल्यासारखं, शेवटच्या क्षणी अबाऊट टर्न करून फसवल्याचा फिल आला, जसा नायकालाही आलाय.


मग जरा फोडणी पुरतं तिचं करियरिस्ट असणं. जरा कोथिंबीर शिवरावी तशी धडाधडा नाकारलेली मुलं. मग जरा ट्विस्ट म्हणून तिला नकार.

बरं इतकी हुषार, जगात वावरणारी मुलगी. तिला एक नकार पचवता येऊ नये? 

बरं एकवेळ तेही समजून घेऊत. की असतात अशी मुलंमुली. पण मग शेवटचा ट्विस्ट?  तो कसा बरं समजून घ्यायचा?


मला तर बिच्चारा तो, अडकला. असंच फिलिंग आलं.

 या लग्नात कोणीच सुखी होणार नाही वाटलं.

तीचा निर्णय क्षणिकच आहे तर तो निभावता येणे अवघड.

तो तर या निर्णयाविरुद्धच आहे . शिवाय त्याची फसवणूक आहे तर तोही नाही सुखी व्हायचा.

दोन ही कुटुंबांचीही फरपट होईल. त्याच्या बहिणीला स्विकारणे, ती मोठी जबाबदारी स्विकारणे तिच्या बसकी बातच नाहीये.

अन मूळात अतिशय विचारी असणारा मुलगा अशी फसवणूक करून घेऊन लग्न करेल का? तिचंही असं क्षणात बदलणं नाहीच पटलं. जिला आधी तो काय म्हणतोय ते चार वेगवेगळ्या पद्धतीने सांगून पुरेसं समजलं नव्हतं. अचानक कसं समजलं म्हणे? 

अऩ अशी एका भेटीत वगैरे लग्न फायनल होणं मला तरी अशक्यच वाटतय.


सगळे  असे असले तरीही एकदा बघायला आवडली. एक फ्रेशनेस आहे, एक क्लिननेस आहे, उगा फापटपसारा नाही.

नवीन टीम आहे तर आशा करुन पुढे अजून छान काही करतील🤞🏻

No comments:

Post a Comment