मैत्रिणीच्या मुलाचं लग्न, मस्त रिसेप्शन. हेमंतातली छान गारवा असणारी संध्याकाळ अन सोबत मित्रमैत्रिणीं अन चविष्ट अगदी चटीमटीचंही खाणं, पिणं🥰 आयुष्यात अजून काय हवं? म्हणतात न, चेरी ऑन द टॉप अगदी तसच स्ट्रॉबेरी क्रिम ऑन आईसक्रिम. नंतर पुन्हा गप्पा अन शेवटी कॉफीही❤️ आहाहा!
पण हाय रे कर्मा, पिक्चर अभी बाकी था 🤦🏻♀️
जरा एका स्नेह्यांना भेटायला थांबलो अन मैत्रहात सुटला अन गजब हुई गवा.
कुठून अचानक आला कान्हा, नाही नाही लाईटचा बोर्ड . लपून छपून बसलेला अन झडपच घातली की! अन मोडली न.... बाई माझी करंगळी मोडली; पण पायाची बरं.
मग काय समोर ठाके डॉक्टर आडवा. स्पिरिट बोळा अन एक्सरेचा कागद काळा. मी ही चिडले, पण करते काय? बसले खुर्चीत, घेतली काठी. अन झाले की घरची राणी!
तर आता बा आदब, बा मुलाहिजा खुर्चीनशीन🪑 अभिषिक्त राणी👸
इथून पुढे एक म्हण अजिबात वापरणार नाही 🫢"पायाच्या करंगळीच्या नखाचीही सर नाही हो" कारण करंगळीचे महत्व पुरेपुर कळले हो😂😂😂
No comments:
Post a Comment