Sunday, September 21, 2025

चाळीशीत पाऊल टाकणाऱ्या सख्यांना...

 मुलींनो हँग इन देअर. 

चाळीशीच्या आयपास आयुष्याला एक संथपणा येतो. अनेक जबाबदाऱ्या बऱ्याचशा पूर्ण झालेल्या असतात. मुलं पुरेशी सुटी , रादर स्वावलंबी होतात. नवरा त्याच्या मध्यमवयीन गुंतवणुकीत अडकलेला असतो. अन तशात मेनॉपॉज आपली सलगी करू लागतो. एकीकडे शरीरातले हार्मोन्स वेगळा नाच करू लागतात अन दुसरीकडे मनातले न्युरॉन्स वेगळा नाच करू लागतात. या दोघांच्या तालात आपला ताल हरवू लागतो. कधी हा ताल कधी तो ताल मिळवता मिळवता आपला मूळचा तालच हरवू लागतो. एक प्रकारची अस्वस्थता येऊ लागते. त्यातून अत्यावश्यक कामं, जबाबदाऱ्या राहिलेल्या नसतात. मग आपलं मनाच्या तालावर नाचलेलं शरीरही थकतं अन शरीराच्या तालाशी जुळवून घेताना मनही जडशिळ होतं.

अन मग या सगळ्यातून एक निर्विकार निष्क्रियता आपल्या आसपास घोटाळू लागते. त्यातून आसपास मुलं नसली की बायकांचे जन्माचे निधानच हरवते. उणीपुरी २०- २२ वर्ष आपण मुलांच्या रुटीनशी बांधलेले असतो. त्यांच्या प्रायॉरिटीज शी आपला दिवस बांधलेला असतो. हे हळूहळू सुटत जाते. एकीकडे त्याचा अभिमानही असतो पण एकीकडे एक हळवेपणा घेरू लागतो. माझी जगाला असणारी गरज एकदम संपली का अशी अनामिक भावना आपल्याही नकळत मनात कुठेतरी उमटत रहाते. 

आपल्या कामाच्या ठिकाणी आपली गरज जास्त होत असते तर तिथे छान वाटतं. पण जेव्हा मोकळेपणा येतो; मी टाईम मिळतो तेव्हा त्यातं काय करायचं हे कळत नाही. मी टाईम म्हणून ठरवलेल्या अनेक गोष्टी तितक्याशा आनंद देत नाहीत. मेंदुच्या भाषेत बोलायचं तर डोपामाईन पुरेसं मिळत नाही.

हे सगळं सगळं काही काळापुरतं असतं. पण तो काळ असा काही अंगावर येतो की आपला आत्मविश्वास हलू लागतो. अशा वेळी स्वत: वर विश्वास ठेवणं हा सर्वात मोठा उपाय असतो. त्या फेजची गरज म्हणून काही काळ जरूर हे मुरझून जाणं होऊ द्यावं. पण,  पण ज्या क्षणी तुम्हाला हे घडते आहे हे जाणवेल; तेव्हा झटझटून जागे व्हा. ही फेज आहे. माझ्या शरीराची, मनाची गरज आहे, होती. ठिके. पण आता मला यातून बाहेर यायचय. माझ्यातल्या मला शोधायचय. ह्याची मनाशी खूणगाठ बांधा.

सर्वात महत्वाचं म्हणजे माणंसांत रहा. शक्य तर लहान मुलांच्यात रहा. संध्याकाळी मुलं असतील अशा ठिकाणी फिरा. एरवी संगीत, इतर कला उपयोगी पडतात मूड ठिक करायला. पण या स्टेजमधे मला त्याने अजून एकटं केलेलं. कला ही बरीचशी एकांडी असते. तर त्या ऐवजी सोशल व्हा, प्रत्यक्ष भेटा. हाहा हीही करा. नाटकं सिनेमे पहा. बागेत जा. मानाची गरज असते संवादाची, ती भागेल असं काही करा. शरीराची गरज असते न थकता व्यायाम होऊल - शरीराला झेपेल असा व्यायाम तोही सोबतीने करा.

हे मला उपयोगी पडलेले उपाय आहेत.  तुम्ही इथून सुरुवात करा. एखाद वेळेस तुम्हाला वेगळे उपीय उपयोगी पडतील. 

पण एक नक्की. या वयात संवाद - प्रत्यक्ष भेटी अन संवाद जादूसारखा उपयोगी पडतो.

इतका निबंध वाचून बोलावं भेटावं वाटलच तर या🤗घराची, मनाची दारं उघडी आहेत😃

Thursday, April 3, 2025

वेदनेचे गाणे

 सध्या द्वारकानाथ संझगिरींचे " वेदनेचे गाणे" वाचतेय. करोना काळातील विविध घटना- व्यक्ती- अनुभव यांवर आधारित छोटेखानी लेख आहेत. गळ्यात अवंढा आणणारे; अन तरीही सकारात्मक अन काही एक आशा देणारे बहुतांश लेख. 

काही मनात अजून घालमेल उभी करणारे तर काही थांबून, उलटं वळून विचार करायला लावणारे... 

त्या काळातील अनेक न जाणवलेल्या माणसांचा ही मागोवा. 

परंपरा अन संस्कृतीचा कालाचिठ्ठा उलगडत समाजमानसाचा चरचरीत डाग देऊन आपलं सामाजिक भान जागवणारे हे सगळे लेख.

जरूर वाचा.

प्रकाशन - जयहिंद, मुंबई

Friday, January 31, 2025

गोष्टी बंटी अन मनीच्या : १. फुलपाखरु




जेव्हा एखादा हुषार माणसाला स्वत:च्याच बुद्धीला न पटणारं बोलावं लागतं. तेव्हा तो अडखळत बोलतो, अं, यु नो, इट्स लुक लाईक, नाउ लुक, आय विल गिव्ह 2-3 रिजन्स असं म्हणून एखादं आचरटसारखं कारण सांगतो... किती दिवस हा बुडबुडा फुगणारे?

अंतर्गत बाबतीत एकवेळ लोकांना देशभक्ती, ग्रेट संस्कृती या सगळ्याची अफू देऊन गुंगवू शकाल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणातही हेच होऊ लागलं तर जगात हसं होईल अन गंभीर परिस्थिती उद्भवेल हे या हुषार लोकांना समजत नाही असं नाही, पण पक्ष आणि पक्षप्रमुखांचा इतका दट्या आहे की मग असं चाचरत, अतार्किक बोलत सुटावं लागतं.

आज खरं तर जागतिक राजकारणात भारत एकटा पडत चाललाय. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, चीन, रशिया, इस्राएल हे सशस्त्र मोठे देश आणि पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव या सारखे छोटे शेजारी देशांचीही मैत्री भारत गमावून बसला आहे. मग उगा पाकिस्तानशी गळाभेट करणं. ज्या रशियाला डावे डावे म्हणून अन नेहरुंना त्यांचे पित्ते म्हणून पाण्यात पाहिलं, ज्याचे कझाकिस्तानबरोबर युद्ध थांबवल्याची ग्वाही मिरवली, आज त्याच रशियाशी मैत्री जोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

एका दुसऱ्या घटनेने पूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधच नव्याने रचायचे हा अतिशय बालिशपणा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात वैचारिक भूमिका, व्यापार, अर्थकारण, शस्त्रास्त्र देवघेव आणि मोठ्या काळातला स्पॅन फार महत्वाचा असतो. 

आज अमेरिकेच्या प्रेमात अन दोन वर्षात रशियाशी मैत्री. आज कझाकिस्तानची बाजू अन वर्षभरात रशियाशी मैत्री. असं आंतरराष्ट्रीय राजकारण करू लागलात तर इतर सर्व राष्ट्र तुमचा विचार कितपत गंभीरपणे करतील याबाबत शंकाच आहे.

ज्या भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अलिप्तराष्ट्र संघटना उभारण्यात पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर या संघटनेला अनेक देशांसह बलिष्ट केले. इतके की अमेरिका रशिया शीतयुद्धाला मोठा अडसर उभा केला. आज त्या भारताचे स्थान पार घालवले आहे असं वाटू लागलय.

या साऱ्यातून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणातली आपली पत पार घालवली आहे असही खेदाने म्हणावं लागतय...


शिक्षण आणि कर्तव्यपोटी राहून गेलेली एक हळवी प्रेम कहाणी

 


19 व्या शतक भारतातील प्रबोधनाची पहाट ब्रिटिशांनी नुकतंच आपलं बसस्थान बसवलेलं ते स्थिर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्ग त्यांना गरजेच होता इतक्या मोठ्या देशावरती राज्यकारभार करायचा तर मोठा कबिला लागणार होता इंग्लंड मधून फार तर अधिकारी वर्ग अण्णा शक्य होतं पण बाकी कर्मचारी वर्ग इथेच तयार करणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी येथील पाश्चात्य शिकवे येथे 500 ते शिक्षण पद्धती द्यायला सुरुवात केली इत्यादी शिक्षण पद्धती होतीच संस्कृत, गणित, परवचे इत्यादीसाठी छोट्या छोट्या घरगुती शाळा ही होता गुरुच्या घरी राहून शिकणारे अनेक शिष्यही होते आणि व्यावसायिक स्वरूपाचे शिक्षण लोहार, कुंभार, सोनार, शेती हे असे शिक्षण वंशपरंपरेने घरातच होते
तसेच येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या दरबारी हिशोब लिहिणे काय सरकारी कागदपत्र तयार करणे हे वंशू परंपरावर चालत आले होते त्याचे शिक्षण हे जातीनिहाय होत असे इथली करत व्यवस्था चौथा येईल संदेश मोठी पद्धती होती आणि त्याचे गणित हिशोब येथील परंपरेमध्ये शिकवले जात होते आणि ते प्रामुख्याने फारसी अंगवळणाचे होते येथील जातीव्यवस्थेची पद्धत अशा सर्व ज्ञानाचे संवर्धन करत होती पण ब्रिटिशांची भाषा वेगळी सरकारी दप्तर ठेवण्याची पद्धत वेगळी हिशोबाची बद्दल आकारणी वेगळी होती
त्यामुळे ब्रिटिश काळात आता ब्रिटिश पद्धतीची भाषा भाषा त्यांची करावी असतात त्यांचे कायदे नियम त्यांचा हिशोब त्यांची गणित या सभेची आवश्यकता होती हा एका अर्थाने अभ्यासक्रमातील बदल इथे रुळवण्यासाठी ब्रिटिशांनी येथे 500 ते पद्धतीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. यातूनच येथे अनेक शाळा ब्रिटिश पद्धतीच्या शाळा सुरू झाल्या इंग्लंड आणि पर्यायाने युरोपमधील औद्योगिक क्रांती यंत्र सुधारणा नवीन विचार यांची यांचा येथे प्रभाव पडू लागला याचाच एक परिणाम म्हणजे मुलींचे शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले इतकेच नाही तर अनेक पालकांना आपल्या मुली भरपूर शिकल्या पाहिजेत असे वाटू लागले
असे सुख कुटुंब म्हणजे मूळचे कोकणात असलेले कृष्णाजी आणि रखमाबाई केळवणकर हे दांपत्य हे दोघेही स्वतः शिकलेले होते वैश्य कुटुंबात जन्म घेतलेला असू नये 860 ते 70 या काळात कृष्णाजी यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आणि अलिबाग पनवेल परिसरात ते आपला दवाखाना चालवत असत त्यानंतर आपली पत्नी रखमाबाई हिलाही ते शिकवत असत संस्कृत संत वांग्मय इतकेच नव्हे तर इंग्रजी ही त्यांनी तिला शिकवली. पुढे कृष्णाजींच्या आजारपणामुळे कुटुंबाची परिस्थिती ढकल आली तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यांची मदतीने रखमाबाईंना शाळेमध्ये शिकवायची नोकरी मिळाली. पुढे मुख्याध्यापिका म्हणून मुंबईत अंगलोजुरी शाळेमध्ये त्या काम करू लागल्या त्यानंतर कोल्हापूरच्या राणीसाहेबांना शिकवायला त्या कोल्हापूरला गेल्या नंतर तिथेच फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्या शिक्षिकाही झाल्या तर अशा या सुशिक्षित दात त्यांना आपल्या मुली तीनही चारही मुलींना शिकवण्याचे ठेवले ते संयुक्तिकच होते इतक्या लहान मुलींसाठी पुण्यात चांगल्या शाळा आहेत तर लांब राहिल्या तरी चालतील पण त्या उत्तम शिकू देत यातून त्यांनी तिन्ही मोठ्या तीन मुलींना द्वारिका कृष्णा आणि यमुना यांना पुण्याची खायला पाठवले यापैकी आज आपली नायिका आहे ती कृष्णाबाई
1886 मध्ये कृष्णाबाई आपल्या दोघी बहिणींचा सह शिकायला पुण्यात आल्या कालांतराने त्यांची चौथी बहीणही आली आणि दोन भाऊही पुण्याची शिकले. पुण्यात प्रथम शिकायला आल्यावर ती न्यायमूर्ती नांगण्यांच्या घरी या तीनही मुली राहत असत कालांतराने त्या वस्तीवर गृह मध्ये राहण्यासाठी गेल्या 1887 ते 93 या काळात हुजूर बागेमध्ये कृष्णाबाई यांचे शालेय शिक्षण झाल्यात तिथेच त्यांची मैत्रीण जनता ही देखील होती ही जनक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण
याच काळामध्ये विठ्ठलाची शिंदे यांच्या मनामध्ये ही कृष्णाबाई भरली होती आणि त्या काप तेव्हापासूनच त्यांची मैत्री छोटी लहान पण स्वरूपात सुरू झाली होती.
पुढे 1893-97 या काळामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कृष्णाबाई शिकत होत्या आणि त्याच वेळेस विठ्ठल आणि शिंदे हेही तिथे शिकत होते 1897 मध्ये पदवी शिक्षण घेतल्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये कृष्णाबाई वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या
सुमारास पुण्यामध्ये रमाबाई रानडे यांचे एक ऑपरेशन करण्याचे ठरले होते आणि त्या ऑपरेशन मध्ये सहाय्यक म्हणून कृष्णाबाई आलेल्या होत्या
1901 मध्ये डॉक्टर झाल्यानंतर त्या कोल्हापुरात प्रॅक्टिस मध्ये करण्यासाठी गेल्या परंतु लगेचच 1902 मध्ये ते प्रसूती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला एफ आर सी एस साठी गेल्या परंतु तिथे एफसीएस करण्यासाठी 24 वे पूर्ण होणे आवश्यक होतं परंतु कृष्णा वेळी मात्र 22 वर्षाच्या होत्या त्यामुळे त्यांनी आयर्लंड मधल्या प्रसूतीशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आणि त्या परत कोल्हापूरला परतल्या
तेव्हापासून अगदी मृत्यूपर्यंत कृष्णाबाई या कोल्हापुरातच राहिल्या आणि सुरुवातीला करवीर विद्यापीठामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये त्या काम करत असत आणि नंतर त्यांनी खाजगी व्यवस्था देखील केला
1902 मध्ये जेव्हा त्या इंग्लंडमध्ये होत्या तेव्हा त्या सुमारास विठ्ठल रामजी शिंदे हे देखील आपल्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये होते आणि तिथे त्यांची बऱ्यापैकी मैत्री तयार झाली होती अशी काही कागदपत्र आपल्याला सांगतात उदाहरणार्थ
प्रसिद्ध समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांची समाधी इंग्लंड मधल्या प्रिस्टंट इथे आहे या समाधीला भेट देण्यासाठी कृष्णाबाई पण गेल्या होत्या आणि विठ्ठल रामजी शिंदे सुद्धा गेले होते या दोघांची वेळ एकच होती किंवा नाही याची कल्पना नाही पण हे दोघेही तिथे गेले होते आणि त्याबद्दल त्यांचा विचार विनिमय झाला होता एवढे कळते एवढेच नव्हे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक लॉकेट कृष्णाबाईंना दिलं तर ज्या लॉकेटमध्ये राजाराम म्हणून यांचा एक केसाचे काही भाग ठेवलेला होता आणि ते लॉकेट त्यांनी कृष्णाबाईंना भेट म्हणून दिले होते पुढे कृष्णाबाईंच्या मृदा व कालावधी कृष्णाबाईंनी हे लॉकेट रॉय यांच्या संग्रहालय मध्ये ठेवले जावं अशी विनंती करणारे पत्र लिहिलेले आहे आणि ते पत्र उपलब्ध देखील आहे
विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 1873 मधला त्यांचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातलं त्याच्यानंतर इंग्लंड मधलं असं झालं आणि त्यांनी प्रामुख्याने समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं
ती पुण्यात असताना आणि नंतर मुंबईत असताना देखील आणि त्यानंतर लंडनला असताना सुद्धा त्यांचा कृष्णा बहिणीशी संपर्क सतत होता आणि त्यांची अत्यंत विशुद्ध मैत्री देखील होती परंतु विठ्ठल रामजी शिंदे यांचे लहान वयातच लग्न झालेलं होतं त्यांची बायको मात्र फारशी शिक्षणाला उत्सुक नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या दोघांच्या दांपत्य जीवनामध्ये काहीसा दुरावा होता विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनामध्ये कृष्ण ८२ लग्न करण्याचा खूप इच्छा होती त्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीच नेण्याची बोलली पण केली ही किंमत कृष्णाबाईंच्या वडिलांची भेटायला देखील ते गेले होते परंतु विठ्ठलाची श्री कृष्णाबाईंच्या वडिलांचा या विवाहला फारसा प्रतिसाद नव्हता किंबहुना विठ्ठल म्हणजे शिंदे यांचे पहिले लग्न झालेले असल्यामुळे अशा लग्नाला त्यांच्या वडिलांचा कृष्णपंच वडिलांचा विरोध होता आणि त्यामुळे ही प्रेमकथा तशीच राहिली परंतु या दोघांचा स्नेह मात्र टिकून राहिला मग ते पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल कोल्हापुरात असेल किंवा लंडनमध्ये असेल त्यांचा सतत भेटीगाठी होत्या आणि त्यांचा सतत संवाद होता हे कळते परंतु आणि कृष्णाबाईंनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता आणि याचं कारण पुन्हा एकदा त्यांचे वडील हेच होते त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं आपले चारही मुलींनी भरपूर शिकावं लग्न बंधनात विवाहात संसारामध्ये न अडकता भरपूर शिकावं अशी त्यांची इच्छा होती परंतु व मोठी एक आणि खालच्या दोघी या तिघींनी मात्र विवाह बंधन स्वीकारली होती परंतु कृष्णाबाईंनी मात्र वडिलांचा असे मत होतं ते स्वीकारलं आणि आयुष्यभर कर्तव्य आणि आपले करिअर यांच्याकडे लक्ष दिल त्याचबरोबर वडिलांच्या नंतर त्यांच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेईल कृष्णवहिनी घेतली अगदी आपल्या धाकट्या बहिणीची लग्न मोठ्या मधल्या धाकट्या भावांची शिक्षण हे याच्याकडे देखील कृष्णावणी स्वतः लक्ष दिलं या सगळ्या कर्तव्यामागे कृष्णाबाईंची प्रेमकहाणी मात्र अधुरीच राहिली अपूर्णच राहिली दोघांचे स्नेह विठ्ठल रामजी शिंदे आणि कृष्णाबाई या दोघांचा स्नेह खूप चांगला राहिला परंतु त्याची परिणती विवाह मध्ये होऊ शकली नाही या सर्वांची माहिती अरुणा ढेरे यांनी विस्मृतीक्षत्र या त्यांच्या पुस्तकांमध्ये एक मोठा लेख लिहिलाय कृष्णाबाईंवरती आणि त्याच्यामध्ये या सगळ्याची तपशीलवार माहिती आहे तसंच विठ्ठल आमचे शिंदे यांच्या विविध काही पुस्तकांमध्ये याचे उल्लेख आहेत काही कागदपत्रांमध्ये या संदर्भातली उल्लेख आपल्याला सापडतात आणि त्याच्यावरून आपल्याला ही माहिती मिळते

Monday, September 23, 2024

हिंदी आणि उर्दु भाषा

मुळात उर्दू भाषा ही निर्माण झाली तीच मुळी हिंदी या भाषेतून .  बारावी शतकामध्ये हिंदीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू झाले.  त्यात एक महत्त्वाचे लेखक म्हणजे अमीर खुसरू या अमीर खुसरोंनी हिंदीमध्ये नवीन बदल केले आणि त्यातून एक नवीन भाषा निर्माण झाली आणि ती म्हणजे उर्दू.  उर्दूमध्ये हिंदी, पर्शियन, म्हणजेच फारसी, अरेबिक अशा अनेक भाषांचा प्रभाव दिसतो.  हिंदीचे लेखन हे  देवनागरी लिपीमध्ये होते.  तर उर्दू ची लिपी नस्तालिख म्हणजेपार्शियन  पद्धतीची  होती.  आणि त्यामुळे उर्दू ही भाषा पूर्णपणे हिंदी पासून वेगळी झालेली आपल्याला दिसते;; उर्दू, हिंदी पेक्षा जास्त समृद्ध का झाली तर त्याच्यामध्ये पर्शियन  म्हणजेच फारसी या भाषेचे आणि अरेबिक भाषेचे अनेक शब्द स्वीकारले गेले आणि त्याच्यामुळे ही हिंदी पेक्षा वेगळी भाषा म्हणून निर्माण झाली

वरती म्हटल्याप्रमाणे ह्या भाषेवरती अरेबिक आणि फारसी भाषेचा प्रभाव असल्यामुळे तिथलं जे वातावरण होतं, तिथली जीवन  पद्धती होती त्याचाही प्रभाव या उर्दू भाषेवरती झाला.  अरबस्थानातील अतिशय रखरखीत पणा,  तिथलं आयुष्याचा कठोरपणा,  तिथे असणारे अनेक संकट,  तिथे असणारे सगळ्या समस्या या सगळ्यातून एक थोडीशी नकारात्मक भूमिका या उर्दू साहित्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसते.  तसंच  फारसी आणि अरेबिक याच्यामध्ये असणारी गझल किंवा शेरोशायरी ही देखील उर्दूमध्ये फार पटकन रुळली आणि त्यामुळे उर्दू ही भाषा जास्ती अरबस्थानातल्या भाषांच्या जवळ जाणारी आहे.  प्रत्यक्षात जरी ती भारतातल्या हिंदी भाषेतून निर्माण झाली असली तरी तिचा जास्ती संबंध, जास्ती सारखेपणा हा फारसी आणि अरेबिक भाषांशी  आहे.   

तसेच बाराव्या शतक ते 16 व 17 व्या शतक या काळामध्ये भारतामध्ये जी  हिंदी भाषा वापरली जात होती त्याच्यावरती हळूहळू इथले जे राज्यकर्ते  होते त्यांच्या; राज्य करण्याच्या पद्धतीचा, त्यांच्या भाषेचा प्रभाव होत पडत गेला.   इथे येणारे जे परकीय होते ते प्रामुख्याने पर्शिया, अफगाणिस्तानातले.  त्यांच्यामार्फत आलेली जी प्रशासकीय भाषा होती ती प्रशासकीय भाषा दिल्ली दरबारामध्ये स्वीकारली गेली.  आणि स्वाभाविकच ही भाषा जास्ती फारसी  असल्यामुळे  हिंदी वरती फारसी  भाषेचं जास्तीत जास्त प्रभाव निर्माण होत गेला. आणि त्यामुळे हिंदी पेक्षा उर्दू ही पूर्णपणे वेगळी भाषा होत गेली.  यामुळेच बऱ्याचदा मुस्लिम धर्माची जी भाषा ती उर्दू भाषा असा गैरसमज निर्माण झाला. प्रत्यक्षात असं नाहीये उर्दू ही हिंदीची हिंदी मधूनच निर्माण झालेली एक पूर्ण हिंदुस्तानी भाषा आहे

---

बाराव्या शतकात उर्दु ही भाषा तयार व्हायला सुरुवात झाली. खरं तर हिंदीचेच हे वेगळे रुप. त्या काळी हिंदी अन उर्दु दोन्ही लिपी शिकवल्या जात. 15-19 शतकामधे, प्रामुख्याने उत्तरेतला एलिट क्लास, ज्यांना शासकीय पदं, नोकऱ्या हव्या होत्या त्यांनी हिंदी भाषेमधे फारसी शब्द वापरायला सुरुवात केली. आपले एलिटपण, श्रेष्ठत्व दाखवण्याचा तो प्रयत्न होता. तशात सरकारी दप्तर फारसीत लिहिली जात असल्याने याला प्रोत्साहन मिळालं.

ब्रिटिश काळात हिंदी आणि उर्दु यांची अजूनच फारकत झाली. ब्रिटिश प्रशासनात उर्दुला प्राधान्य मिळाले. सरकारी पदं, नोकऱ्या साठी उर्दु येणाऱ्यांना प्राधान्य मिळालं.

यामुळे 14-19 शतकात उर्दु ही उच्च वर्णीय एलिट क्लासची तर हिंदी ही जनसामान्यांची भाषा होत गेली.

पुढे ब्रिटिशांनी अवलंबलेली फोडा आणि राज्य करा या नितीतून उर्दु आणि हिंदी ही फारकत धर्मावर आधारित केली. उर्दु ही मुसलमानांची तर हिंदी ही हिंदुंची भाषा असा समज पसरवला गेला. 

धार्मिक दुफळीत भाषाही ओढली गेली.

महाराष्ट्रातले मोडीचे उदाहरण काहीसे असे देता येईल. फक्त इथे धार्मिक दुफळी झाली नाही कारण बहुतांश सुशिक्षित लोकं हिंदुच होते. जशी मोडी सर्वसामान्यांची अन देवनागरी उच्चभ्रू, सरकारी नोकरवर्गाची होत गेली.

गंमत म्हणजे इंग्रजांनी केलेल्या भाषाफारकतीला येथील लोकांनीही हातभार लावला.  उर्दुमधे फारसी शब्दांचा वापर वाढत गेला अन त्याला प्रतिउत्तर म्हणून हिंदीमधे संस्कृत शब्दांचा वापर वाढत गेला.

अन एकच असलेली हिंदी भाषा(जिच्या फक्त दोन लिपी होत्या, त्या हळूहळू दोन वेगळ्या भाषा झाल्या. वेगवेगळ्या समुहांच्या भाषा झाल्या.

 नशीब मराठीमधे (मोडी अन देवनागरी लिपी) असून त्यांच्या दोन वेगळ्या भाषा झाल्या नाहीत


Saturday, August 24, 2024

निळे पक्षी - विंदांच्या कवितेचे रसग्रहण

निळेपणा हा मला आभाळाच्या अथांगतेशी, पाण्याच्या नितळ, शुचिर्भूततेशी, कृष्णाच्या प्रगल्भतेशी, अध्यात्माच्या सखोलतेशी निगडित वाटतो.

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही....

मग मला, निळा पक्षी हा वर म्हटल्या प्रमाणे अध्यात्माची आस असणं वाटलं. अध्यात्माची आस काही केल्या जात नाही.
त्यासाठीची सगळी धडपड चालते (प्रकाशाचे सान पंख). मग सगळीकडे अध्यात्म शोधू पहाणे चालते.  पण ते इतकं गूढ आहे की कोणत्याच पट्टीत ते काही गवसत नाही. आपल्या छोटाश्या बुद्धीने अध्यात्म ( चोचीत चंद्र पकडणं) समजून घेण्याचा न जमणारी धडपड नुसती. अन तरीही ती आस काही सुटत नाही. अन सगळंच त्या आध्यात्म्याने व्यापून रहातं.
स्वत: मधला सर्वात शुद्धपणा, सर्वात उपयोगी पडणारा विवेक (निंब) त्याच्या डोक्यावर हे अध्यात्म चढून बसते. अन मग माझा सारा तोलच डगमगतो (पृथ्वीचा तोल)
अन मग पोटात खोल, तळ नसलेला खड्डा पडतो, विचार कर करून त्या अध्यात्माचा तळ सापडतच नाही.
माझ्यातला तर्कनिष्ठपणा खूप प्रयत्न करतो.  विविध गृहितकं, चर्चा करून या अध्यात्माची कास सोडण्याचा निकराने प्रयत्न करतो. या धडपडीत काही अध्यात्माच्या आसपासचे विचार डगमगतात, पण तरीही सर्वात वरचा अध्यात्माचा विचार मात्र जसाच्या तसा अढळ रहातो, त्याचं अढळपद तसं अवघडच हलणं!
जसं अमृत कधी संपत नाही अन त्याने संपण्याची शक्यताच संपते तद्वत या अध्यात्माचा विचार संपणं होऊच शकत नाही. अन एकदा हा विचार सुरु झाला की कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केले तरी त्याचा ससेमिरा सुटत नाही, संपत नाही. पूर्ण शांत झालेल्या विवेक- बुद्धीलाही हा विचार जागं करतो, शांत बसू देत नाही.
एकदा का हा अध्यात्माचा विचार मनात फेर धरू लागला की सुटका नाही. कोणत्याही घटनेमागे, कोणत्याही विचारांतून शेवट अध्यात्माकडेच जाणं होतं. अन कितीही अवघड असला, अशक्यप्राप्य वाटला तरी ते अध्यात्म समजून घेण्याचा जिवापाड प्रयत्न करत रहाणं एव्हढच हाती उरतं.
तर अशी अध्यात्माची एकदा जाणीव झाली की ते अध्यात्म काही केल्या सुटू शकत नाही.
-