Wednesday, November 14, 2012

चँपियन्स चित्रपटातील मछिंद्रशी गप्पा

आज बालदिन ! त्या निमित्ताने या दोन बाल कलाकाराच्या मुलाखती!

चँपियन्स च्या निमित्ताने मछिंद्रशी बोलायची संधी मिळाली, त्याचा हा वृतांत.

पहिल्यांदा मछिंद्रचे, या चित्रपटात काम केल्याबद्दल आणि बक्षिसं मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं, तेव्हा काहीसा लाजला तो. मछिंद्र, बालमोहन विद्यामंदिर मध्ये नववीत शिकतोय.
चित्रपटात काम करताना त्याला खूप चांगलं वाटतंल.भीती वाटली का हे विचारल्यावर मस्त हसत, भिती तर काही नाही वाटली,उलट मजा आली चित्रपटात काम करायला असं त्याने सांगितलं. याचं कारण शाळेत गणपती उत्सवात, नाटकांत, काम केलं होतं.

नारकर काका-काकू, मोरे काका ह्यांच्याबरोबर काम करताना तुला कसं वाटलं?
मला त्याला खूप चांगलं वाटलं. आणि एव्हढ्या महान कलाकारांबरोबर त्याला काम करायला मिळालं याचा खुप आनंदही त्याला झाला होता.

या चित्रपटात अ‍ॅक्टिंग कसं केलस हे विचारल्यावर अतिशय प्रांजळपणे म्हणाला की, " तेव्हा मला काही कळत नव्हतं ना बालमजुरी वगरै." रमेश मोरे काकांनी त्याला हे सगळं समजावलं. संपूर्ण गोष्ट त्याला सांगितली. आणि जिथे काही चुकेल तेव्हा ते समजावून सांगत, हे ही सांगितलं.

अ‍ॅक्टींग करणं अवघड असतं पण रडणं काही अवघड नसतं असं तो म्हणाला. मोठ मोठ्या कलाकारांना रडण्याचा अभिनय करणं जड जातं अन हा धिटुकला म्हणत होता रडणं सोपं असतं म्हणून, नक्कीच मोठेपणी मोठा कलाकार होणार हा मुलगा!

तो राहतो तिथे, धारावीत, त्याचे काही मित्रंही सकाळी कामं करतात आणि रात्री रात्रशाळेत जातात; त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी लहान मुलं काम करतात हे त्याला माहिती होतं.
त्याच्या घरी त्याला मोठी अन छोटी बहिण आहे, भाऊ नाही. त्यामुळे चित्रपटातील दादा, शंतनु त्याला फार आवडला. शंतनुबरोबर काम करायला त्याला चांगलं वाटलं. त्यांनी खूप धमाल केली सेटवर. दोघं ड्रेसींग रूम मध्ये WWF खेळायचे, भरपूर मस्ती करायचे.

मोठी मोठी बक्षीसं घेताना त्याला खूप चांगलं वाटलं. त्याला वाटलं नव्हतं की "चॅम्पियन्स्" चित्रपट केला तर त्याला अशी मोठी मोठी बक्षीसं मिळतील .

मोठेपणी मछिंद्र आर्टिस्ट च होणार आहे, नाहीतर पायलट. त्यासाठी खुप शिकावं लागेल याची त्याला जाणीव आहे. त्याला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या.

मग त्याच्या आईशी बोलले, त्यांचेही अभिनंदन केले. त्यांनाही हा "चॅम्पियन्स्" चित्रपटाचा अनुभव खूप छान वाटला.

मछिंद्रला चित्रपट, कॅमेरा, लाईट्स ह्या सगळ्या गोष्टी खुप खुप आवडल्या असे त्यांनी सांगितले. तसेच या हा चित्रपटामुळे मछिंद्र मध्ये काही बदल झालेले त्यांना जाणवले. अभ्यास करणं, शाळेला जाणं हे तो आता जास्त मनापासून करतोय असं त्यांनी सांगितलं.
मायबोलीच्या वतीने, मछिंद्र आणि संपूर्ण गडकर परिवाराचे खुप खुप अभिनंदन आणि खुप सा-या शुभेच्छा !

1 comment:

  1. या दोन्ही मुलाखती घेण्यासाठी माझी मैत्रीण स्वाती नाचनोलकर हिची खुप मदत झाली :-)

    ReplyDelete