Monday, September 23, 2024

हिंदी आणि उर्दु भाषा

मुळात उर्दू भाषा ही निर्माण झाली तीच मुळी हिंदी या भाषेतून .  बारावी शतकामध्ये हिंदीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू झाले.  त्यात एक महत्त्वाचे लेखक म्हणजे अमीर खुसरू या अमीर खुसरोंनी हिंदीमध्ये नवीन बदल केले आणि त्यातून एक नवीन भाषा निर्माण झाली आणि ती म्हणजे उर्दू.  उर्दूमध्ये हिंदी, पर्शियन, म्हणजेच फारसी, अरेबिक अशा अनेक भाषांचा प्रभाव दिसतो.  हिंदीचे लेखन हे  देवनागरी लिपीमध्ये होते.  तर उर्दू ची लिपी नस्तालिख म्हणजेपार्शियन  पद्धतीची  होती.  आणि त्यामुळे उर्दू ही भाषा पूर्णपणे हिंदी पासून वेगळी झालेली आपल्याला दिसते;; उर्दू, हिंदी पेक्षा जास्त समृद्ध का झाली तर त्याच्यामध्ये पर्शियन  म्हणजेच फारसी या भाषेचे आणि अरेबिक भाषेचे अनेक शब्द स्वीकारले गेले आणि त्याच्यामुळे ही हिंदी पेक्षा वेगळी भाषा म्हणून निर्माण झाली

वरती म्हटल्याप्रमाणे ह्या भाषेवरती अरेबिक आणि फारसी भाषेचा प्रभाव असल्यामुळे तिथलं जे वातावरण होतं, तिथली जीवन  पद्धती होती त्याचाही प्रभाव या उर्दू भाषेवरती झाला.  अरबस्थानातील अतिशय रखरखीत पणा,  तिथलं आयुष्याचा कठोरपणा,  तिथे असणारे अनेक संकट,  तिथे असणारे सगळ्या समस्या या सगळ्यातून एक थोडीशी नकारात्मक भूमिका या उर्दू साहित्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसते.  तसंच  फारसी आणि अरेबिक याच्यामध्ये असणारी गझल किंवा शेरोशायरी ही देखील उर्दूमध्ये फार पटकन रुळली आणि त्यामुळे उर्दू ही भाषा जास्ती अरबस्थानातल्या भाषांच्या जवळ जाणारी आहे.  प्रत्यक्षात जरी ती भारतातल्या हिंदी भाषेतून निर्माण झाली असली तरी तिचा जास्ती संबंध, जास्ती सारखेपणा हा फारसी आणि अरेबिक भाषांशी  आहे.   

तसेच बाराव्या शतक ते 16 व 17 व्या शतक या काळामध्ये भारतामध्ये जी  हिंदी भाषा वापरली जात होती त्याच्यावरती हळूहळू इथले जे राज्यकर्ते  होते त्यांच्या; राज्य करण्याच्या पद्धतीचा, त्यांच्या भाषेचा प्रभाव होत पडत गेला.   इथे येणारे जे परकीय होते ते प्रामुख्याने पर्शिया, अफगाणिस्तानातले.  त्यांच्यामार्फत आलेली जी प्रशासकीय भाषा होती ती प्रशासकीय भाषा दिल्ली दरबारामध्ये स्वीकारली गेली.  आणि स्वाभाविकच ही भाषा जास्ती फारसी  असल्यामुळे  हिंदी वरती फारसी  भाषेचं जास्तीत जास्त प्रभाव निर्माण होत गेला. आणि त्यामुळे हिंदी पेक्षा उर्दू ही पूर्णपणे वेगळी भाषा होत गेली.  यामुळेच बऱ्याचदा मुस्लिम धर्माची जी भाषा ती उर्दू भाषा असा गैरसमज निर्माण झाला. प्रत्यक्षात असं नाहीये उर्दू ही हिंदीची हिंदी मधूनच निर्माण झालेली एक पूर्ण हिंदुस्तानी भाषा आहे

---

बाराव्या शतकात उर्दु ही भाषा तयार व्हायला सुरुवात झाली. खरं तर हिंदीचेच हे वेगळे रुप. त्या काळी हिंदी अन उर्दु दोन्ही लिपी शिकवल्या जात. 15-19 शतकामधे, प्रामुख्याने उत्तरेतला एलिट क्लास, ज्यांना शासकीय पदं, नोकऱ्या हव्या होत्या त्यांनी हिंदी भाषेमधे फारसी शब्द वापरायला सुरुवात केली. आपले एलिटपण, श्रेष्ठत्व दाखवण्याचा तो प्रयत्न होता. तशात सरकारी दप्तर फारसीत लिहिली जात असल्याने याला प्रोत्साहन मिळालं.

ब्रिटिश काळात हिंदी आणि उर्दु यांची अजूनच फारकत झाली. ब्रिटिश प्रशासनात उर्दुला प्राधान्य मिळाले. सरकारी पदं, नोकऱ्या साठी उर्दु येणाऱ्यांना प्राधान्य मिळालं.

यामुळे 14-19 शतकात उर्दु ही उच्च वर्णीय एलिट क्लासची तर हिंदी ही जनसामान्यांची भाषा होत गेली.

पुढे ब्रिटिशांनी अवलंबलेली फोडा आणि राज्य करा या नितीतून उर्दु आणि हिंदी ही फारकत धर्मावर आधारित केली. उर्दु ही मुसलमानांची तर हिंदी ही हिंदुंची भाषा असा समज पसरवला गेला. 

धार्मिक दुफळीत भाषाही ओढली गेली.

महाराष्ट्रातले मोडीचे उदाहरण काहीसे असे देता येईल. फक्त इथे धार्मिक दुफळी झाली नाही कारण बहुतांश सुशिक्षित लोकं हिंदुच होते. जशी मोडी सर्वसामान्यांची अन देवनागरी उच्चभ्रू, सरकारी नोकरवर्गाची होत गेली.

गंमत म्हणजे इंग्रजांनी केलेल्या भाषाफारकतीला येथील लोकांनीही हातभार लावला.  उर्दुमधे फारसी शब्दांचा वापर वाढत गेला अन त्याला प्रतिउत्तर म्हणून हिंदीमधे संस्कृत शब्दांचा वापर वाढत गेला.

अन एकच असलेली हिंदी भाषा(जिच्या फक्त दोन लिपी होत्या, त्या हळूहळू दोन वेगळ्या भाषा झाल्या. वेगवेगळ्या समुहांच्या भाषा झाल्या.

 नशीब मराठीमधे (मोडी अन देवनागरी लिपी) असून त्यांच्या दोन वेगळ्या भाषा झाल्या नाहीत


No comments:

Post a Comment