हॉलेविन सुरु झाला तो आयर्लंडमधे. 31 ऑक्टोबरच्या रात्री आपलं जग आणि मृत्यू नंतरच जग यातली सीमारेषा धूसर होते असं मानलं गेलं. आणि सगळे आत्मे आपल्याला भेटायला येतात असं मानलं जाई. या आत्म्यांकडून आशिर्वाद मिळवण्यासाठी बॉनफायर पेटवणे (थंडीतून आत्म्यांना उब मिळावी) आणि त्यांना गिफ्ट देणे सुरू झाले. पण आत्म्यांनी आपल्याला ओळखू नये (आपल्या मागे लागू नये, त्यांनी आपल्याला गप्पांमधे गुंतवू नये म्हणून) चित्रविचित्र पोषाख घातले जाऊ लागले. सुरुवातीली (शिकारी लोकं असल्याने) प्राण्यांची कातडी, मुखवटे, शिंगं वापरली जात. हजारो वर्ष आयर्लंडमधे हॉलोविन साजरा केला जाई.
पुढे कॅथॉलिक पंथाने याला वेगळे रूप दिले. याच काळात ट्रिक ऑर ट्रिटची प्रथाही सुरु झाला. गरीब, भुकेली लोकं अन्नाच्या बदल्यात लोकांच्या मृत नातेवाईकांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करू लागले. कालांतराने या ऐवजी मुलं ट्रिक ऑर ट्रिट मागत फिरू लागली.
18- 19 व्या शतकात हळूहळू ही प्रथा युरोपभर, अमेरिकेतही पसरली. त्यातही रॉबर्ट बर्न्स या कवीच्या कवितेमुळे ही प्रथा फारच प्रसिद्ध झाली. 19 व्या शतकाच्या शेवटी अनेक आयरिश लोकं अमेरिकेत स्थलांतरित झाले अन मग ही प्रथा अमेरिकेत फारच प्रसिद्ध झाली. पुढे काही काळ या प्रथेने विचित्र वळण घेतले. तोडफोड, मारामारी, गडबडगोंधळ घालणे सुरु झाले. अजूनही बऱ्याच प्रमाणात हे आहे. त्यामुळे काही लोक ही प्रथा रदबादल केली पाहिजे असे मत मांडतात.
1950 च्या सुमारास अमेरिकेत कँडी उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु झाले. त्यामुळे ट्रिट द्या अन मुलांचा हैदोस आवरा अशी वेगळी प्रथा सुरु झाली. म्हणूनच मग चित्रविचित्र कँडीज येऊ लागल्या. मुळात दंगेखोर, विध्वंसक मुलांना दंगे करण्यापासून लांब ठेवणं अन त्यांच्यातल्या चित्रविचित्र कल्पनांना खाद्य पुरवणं यातून या विचित्र कँडिज तयार केल्या जाऊ लागल्या. 1970 पासून मोठी माणसेही हॉलॉविनमधे भाग घेऊ लागली. विचित्र पार्ट्या, पोषाख, पेय, खाद्यपदार्थ अन काही प्रमाणाच सेक्सी गोष्टींचाही समावेश यात झाला.
अलिकडे या प्रथेत एक चांगला बदल झाला. तो म्हणजे आनंद साजरा करणे, आपल्या व्यक्तिमत्वामधे काय काय आहे याचा शोध घेण्यासाठी कौटुंबिक, सुरक्षित चौकटीत हा प्रयत्न होताना दिसतो आहे. अर्थात आर्थिक उलाढाल अन बाजारपेठेची मागणी यातून या नवनव्या प्रयोगांना चालना मिळतच रहाते अन राहील.
माणसातला बिभत्सपणा, वाईटपणा, राक्षसीपणा बाहेर पडू देण्याचा मार्ग म्हणून विसाव्या शतकात ही प्रथा जास्त प्रचलित झाली. सो ते वाईटच. पण आपल्यातल्या वेगवेगळ्या क्षमता, सुरक्षित वातावरणात जोखून पहाव्यात या दृष्टीने चांगली आहे, अन तशी ती वापरली गेली तर नक्कीच उपयोगी पडेल, आंधळेपणा मात्र नकोच.
No comments:
Post a Comment