आशा कर्दळे यांनी लिहिलेले "पर्ल बक" हे चरित्र वाचलं.
पर्ल बक ही अमेरिकन नोबेल विजेती लेखिका.
तिचे बालपण, तरुणपण सगळं बहुतांश चीनमधे गेलं. तिथला समाज, संस्कृृती, संस्कार याचा खूप प्रभाव. चिनमधील समाजावर तिने भरपूर लिखाण केलं. चिनमधील राजेशाही, लोकशाही क्रांती, साम्यवादी क्रांती सगळ्याची सजग साक्षीदार. त्याचे तिच्या लेखनात पडसाद दिसतात.
पुढे अमेरिकेत स्थाईक झाल्यावरही लिखाण केलं. अनाथ मुलांसाठी प्रचंड काम केलं. जगभर फिरली. जगभरातील मानवतावादी कार्याला हातभार लावला.
एक विचारी व्यक्तिमत्व! लेखिका, सामाजिक कार्यकर्ती अन एक समृद्ध व्यक्तिमत्व म्हणून पर्ल बक फार भावली.
No comments:
Post a Comment