आज एक केस वाचत होते. नाझी गेस्टोपा चिफ Lischka ची.
फ्रान्स जिंकल्यावर तिथल्या 30,000 ज्युंना मारणारा हा राक्षस.
युद्ध संपल्यावर त्याला गुन्हेगार म्हणून जाहिर केले गेले. पण जर्मनीत असलेल्या लिस्काला कोणतीच शिक्षा देता येत नव्हती. कारण जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध गुन्हेगारांबद्दल काहीच नियम ठरले नव्हते.
याच 30,000 तल्या एका मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या मुलाने - Serge Klarsfeld आणि त्याची बायको Beate Klasfeld
काही मित्रांच्या मदतीने लिस्काला पकडून, फ्रान्समधे आणण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
अनेक पातळ्यांवर प्रयत्न करून, प्रत्यक्ष लिस्काच्या कार्यालयात मोर्चा नेऊन या दोघांनी प्रयत्न केले. परंतु जर्मन सरकार बधत नव्हते.
अखेर सेरगे ने एकदा रस्त्यावर लिस्काला पकडून त्याच्या कपाळावर पिस्तुल धरले. लिस्काला मरणाची भिती म्हणजे काय दाखवले. पण शूट न करता हसत तो परत फिरला. तो म्हणाला की आम्हाला नाझींचा सूड घ्यायचा नाही तर त्यांनी मारलेल्या हजारो ज्युंना न्याय द्यायचा आहे.
या घटने नंतर दोघांनी अथक प्रयत्न करून , जर्मनीत राहून तेथील सरकारला आपला स्टँड बदलायला लावला. पुन्हा नव्याने लिस्काला अटक झाली, खटला चालवला गेला . आणि त्याला कारावास झाला.
त्याच बरोबर इतरही नाझी नराधमांवर खटले चालवले गेले.
हे सगळं मला फार ग्रेट वाटतं. सूड आणि न्याय यातली सीमा इतकी स्पष्ट समजणं, ती अंगिकारणं. त्यातून व्हिक्टिम ठरलेल्याच्या मुलाने हे पार पाडणं. संधी मिळूनही सूडाच्या वाटेवर न जाता, न्यायाचाच मार्ग स्विकारून वेळ लागला तरी चालेल पण योग्य मार्गच स्विकारणं! ग्रेट!!
No comments:
Post a Comment