Saturday, May 2, 2020

अध्यात्म, तत्वज्ञान, योग वगैरे

मानवी इतिहासामध्ये देव, अध्यात्म, तत्वज्ञान यांची सुरुवात कधी कुठे आणि का झाली असावी याचा माग घेण्याचा हा एक प्रयत्न!  पूर्णतः ही एक बौद्धिक कृती (अक्टिव्हिटी ) आहे. याला शोधूनही काही संदर्भ सापडतील/ न सापडतील. पण शक्य तितका तार्किक विचार करून लिहितेय. जोडिला ऐतिहासिक बंध ही जागता ठेवलाय 

अगदी आदिम समाजापासून निसर्गातील अनाकलनीय घडामोंबद्दल ( नैसर्गिक शक्तींबद्दल ) मानव साशंक होता. जे कळत नाही त्या बद्दल भितीची भावना ही प्राथमिक भावना असते. पण त्यापुढची पायरी एका कालानंतर येते. सर्वसाधारणतः जेव्हा भौतिक स्वस्थता येते तेव्हा हळुहळू मानसिकही स्वस्थता काही प्रमाणात येते. ( काही मानसिक अस्वस्थता याच काळात सुरूही होतात, पण तो विषय आता नाही. ) अशा वेळेस आजुबाजूला घडणार्‍या अनाकलनिय घटनांचा विचार सुरू होणे स्वाभाविक आसते. हे अगदी आदिम काळातही घडले असणार. 

जेव्हा मानव गुहेत राहू लागला, अंधार झाल्यानंतर उजेड होईपर्यंतचा काळ जेव्हा त्यामानाने सुरक्षित झाला. त्या काळात मानवी बुद्धीने आपल्या क्षमते नुरुप या अनाकलनीय गोष्टीण्चा अर्थ लावायला सुरुवात केली असावी. सुर्यास्तापासून सुर्योद्यापर्यंतच्या १०-१२ तासातला काही काळ झोपेत गेला असला तरी पहाटेचे ३-४ तास नक्की त्याचे मन, शरीर, बुद्धी ताजी तवानी पण करायला काही नाही असे घदले असावे. मग याच काळात त्याचा या अनाकलनीय गोष्टीम्बाबत विचार सुरु झाला असावा. (जाताजाता: यातूनच ब्राह्ममुहूर्त ही कल्पना रुजवली गेली असेल का? )
तर या निवांत वेळेत सुर्य, चंद्र,पाऊस, नदी, अन्न देणारी झाडं, डोंगर,अग्नी, जंगली श्वापद, अंधार या बद्दल्चा विचार झाला असेल. ज्यांचा उपयोग होतो, जे मदतीला येतात त्यांप्रति कृतज्ञता आणि ज्याचा त्रास होते, अदचण होते त्या बद्दल  भिती अशा भावना तयार होउ लागल्या असतील. या सर्वाण्चि मदत मिळावी म्हणून जे आपल्यला उपयोगाचे असते ते त्यांना देणे ( समर्पित करणे / नैवेद्य) सुरू झाले असावे. आपल्याला अंधारात उजेड हवा असतो , म्हणून तसाच मग या निसर्ग शक्तींनाही देणे ( दिवा लावणे ) आपल्याला एखादे उंचावरचे फळ तोडता आले की आपले जवळचे आरदाओरडा करतात, टाळ्या वाजवता. आणि आपल्याला छान वाटते. म्हणून मग नैवेद्य देताना, दिवा लावताना ओरडणे, टाळ्या वाजवणे ( आरती, टाळ्या) हे सुरु झाले असावे. 
काळानुसार जसजशी भाषा तयार होत गेली, चांगला सूर, ओरडायचा सूर यातला फरक जास्त स्पष्ट होत गेला यातही सुधारणा होत गेली असणार. 

शेती सुरू झाली, मानव एका ठिकाणी वास्तव करू लागला तसे त्याच्या गरजा, उपयोगी गोष्टी बदलत गेल्या. पूर्वी पाऊस त्याला भितीदायक वाटत असे. कारण त्या वेळि त्याला जंगलात जाणे अवघड व्हायचे. पण आता तोच पाऊस शेतीला उपयोगी बनला. जंगलातली आग भिती वाटे कारण तिच्या वणव्याची प्रचण्ड उष्ण्ता त्रासाची होती.  तोच अग्नी जंगली श्वापदांना दूर ठेवायला, कडक धान्य शिजवायला उपयोगी ठरू लागला. तशी त्याची आराध्य बदलत गेली. ज्या अग्नी पासून दूर रहात होतो त्या अग्नीला त्याने घारात सततचे वास्तव्य दिले इतकेच नव्हे तर मानाचे स्थान दिले.  (अग्निहोत्र)

शेतीमुळे मानवी जीवन अजून सुकर झाले. जीवनाला एकसूत्रता आली. नियमांची बांधणी आली. तशीच त्याच्या विचाराण्नाही एक नियम, बांधणि येऊ लागली असणार. याच काळात भौतिक जीवनातील गरजांप्रमाणेच निसर्गाच्या शोधाच्या भावनिक गरजांनाही एक्सुत्रता आली असावी. याच काळात खर्‍या अर्थाने तत्वज्ञान अध्यात्मिक विचार सुरू झाला असावा. 

ही सर्व प्रक्रिया विचारात घ्तल की एक लक्षात येते की तत्वज्ञान अध्यात्म हे प्रामुख्याने जे निर्गातील अनाकलनिय आहे त्याचा विचार यात केला जातो. ज्याची ठाम आणि सिद्ध करता येतील, कालातीत आणि वस्तुनिष्ठ असतील अशी उत्तरे ही शास्त्रिय माहितीचा भाग बनली. 

तर जी उत्तरे सिद्ध करता येणार नाहीत ( पण काहीच्या अनुभवांत ती प्रतित होतील), काळानुरुप त्यात बदल होऊ शकतात, व्यक्ती/ जागा यापरत्वे जी उत्तरे वेगवेगळि होऊ शकतात ती प्रामुख्याने तत्वज्ञान, अध्यात्म यात समाविष्ट झाली. 

त्यातही तार्किक बाबतीत जी सिद्ध होऊ शकतात, व्यक्ती-काळ- जागा नुरुप ज्यात बदल होत नाही त्यांचा समावेश तत्वज्ञानात केला गेला. 

तर जी केवळ अन केवळ काहींच्या अनुभूतीचा भाग आहे, अशा उत्तरांचा समावेश अध्यात्मात केला गेला. 
(पुढे चालू)

No comments:

Post a Comment