काळ परिस्थिती अवघड आहे. सर्वांनाच. तेव्हा हवं ते बडबडा, लिहा, चिडचिड वाहून जाऊ देत. डायरीत लिहा, ऑनलाईन साईट्सवर लिहा, ... कुठेही लिहा , पण लिहा.
आता मनस्वास्थ्य टिकवणं सगळ्यात अवघड आहे. त्यासाठी व्हेंट आऊट होणं गरजेचं आहे. सो डोन्ट स्टॉप युवरसेल्फ. इतरांनी समजावलं तर वाचा ऑर वाचू नका. पण व्हेट आऊट व्हा.
अनेकदा एकमेकींना समजावण्याच्या नादात आपण सीमा ओलांडून एकमेकीच्या दुखऱ्या जखमा उकलत नाही न या कडे लक्ष द्या. आज म्हटलं तर सगळ्यांचच काही न काही दुखतय. काही दुखलेलं सांगावं,वाटतय. तर सांगू देत. नुसतं वाचा. आज, आता मुल्यांकन नकोच. हा पण मनात, बॅक ऑफ द माईंड नोंदवत रहा सगळं. समजा याचाही भार वाटला तर तेही द्या सोडून.
पण एक नक्की करा, व्यक्त व्हा, होऊ द्या.कुठेतरी का होईना व्हा व्यक्त. आज ती गरज आहे.

आणखीन सध्या 2-4 ठिकाणी ऐकलं ते मांडावं वाटतय. ऐकू, वाचू पण...त्यावर "प्रतिक्रिया न देता त्याला प्रतिसाद" देऊ. जरा विचार करायला लावणारं वाक्य आहे न? थोडं थांबून जरूर विचार करा. मदतीला खाली एक व्हिडिओ लिंक देतेय जरूर बघा.
आता गरज आहे अनेक गोष्टींची.
सकारात्मकतेची,
एकीची,
सहृद्यतेची,
सहसंवेदनेची,
गाढ विश्वासाची
आणि हो,
काहींना अतिशय तटस्थ कारणमीमांसेचीही.
इतरही कितीतरी गरजा आहेतच. सगळं निभणं खरच अवघड आहे.

तर एक करुयात? ज्याला जी गरज आहे ती देऊ. एखाद्याच व्यक्त होणं नाही पटलं, पुढे जाऊ. कोणीतरी समानधर्मी सापडेल, त्याचा आधार घेऊ. चालेल?
कसय ना काहींना अडचणींच्या काळात फक्त भावनिक आधार हवा असतो तर काहींना सडेतोड बौद्धिक! ज्याला त्याला त्याचा आधार समर्पक योग्य वाटत असतो. ते बरोबरही आहे. सो होऊ दे सर्वांना व्यक्त !
टिकाटिपण्णी टाळूत, मुल्यांकन टाळूत. ज्यांना जादुची झप्पी हवी त्यांना; ज्यांना जादुची झप्पी द्यावी वाटते- देतील.
ज्यांना बौद्धिक पडताळणी करावी वाटेल त्यांच्याशी अशाच काहीजणी करतील बौद्धिक पडताळणी.
महत्वाचं आहे ते आपापला प्रवाह शोधणं. शेजारून जाणारा प्रवाह विरुद्ध दिशेला जात तर नाही ना, हे तपासणं थांबवूत. पण हे दोन्ही किंबहुना अनेक प्रवाह वाहू देत. कालांतराने शांतता आली की हे सगळे प्रवाह हवेच आहेत आपल्याला, अन्यथा स्थिरावलेलं डबकं होईल समाज.

तेव्हा एकच विनंती, प्रेमळ आग्रह;
सर्वांनीच थांबा, थोडा श्वास घ्या. मनात म्हणा, हँग इन देअर! काही काळात परिस्थिती बदलणार आहे, हो आहेच बदलणार! तोवर एकमेकांना समजून घेउ. जे समजून घेणार नाहीत त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करू. घरातलं वाभरं पोर म्हणून त्याच्याकडे पाहु(हे दोन्ही तिन्ही सगळ्याच तटांना हं ;) )
आपलं काम आपण शक्य तितक्या निकरानं करतो आहोत, यात समाधान मानूत. योग्य वेळी परिस्थिती आटोक्यात येईल. मग हे 30 दिवस आपण विसरूनही जाऊ. पण आताची एकी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे.
लव्ह यु ऑल  थांकु
लव्ह यु ऑल  थांकु
No comments:
Post a Comment