Wednesday, March 17, 2021

मानवी मेंदू

कालएक सिरिज बघताना काही मनात आलं ते डकवतेय


मेंदु - काय अदभूत निर्मिती आहे निसर्गाची। एखाद्या अपघाताने वा एखाद्या अंतर्गत बदलामुळे मेंदुचा एखादा भाग अती सक्रिय होतो अन ती व्यक्ती इतरांच्या भावना अधिक नीट समजू लागते, अधिक सहसंवेदनशील होते। तर कधी हीच घटना मेंदुच्या दुसऱ्या भागात घडली तर व्यक्ती अधिक स्वार्थी बनू शकते।

पण याहूनही मोठी अदभूत शक्ती आहे ती मानवाकडे। कोणत्याही बाह्य वा आंतरबदलाचा परिणाम म्हणून नाही तर समोरच्याला समजून घेण्याच्या मानवी भावनेतून समोरच्याबद्दल सहसंवेदना निर्माण होणं केवळ मानव करू शकतो। ही मानवी शक्ती मानवाचे मानवीपण अधोरेखित करणारी।  मानवातले दैवीपण दाखवणारी। यापुढे निसर्गही फिका पडते नाही?

No comments:

Post a Comment