असाच एक गोड चित्रपट म्हणजे मटिल्डा। रुढार्थाने आईमुलीचा नाही। पण वीण तीच। अतिशय हुषार मुलगी अगदी सामान्य आईबाबांच्या पोटी जन्माला आली। जमेल तिथून जमेल तसं वाचायला शिकत जाते। इवलुशी मटिल्डा लायब्ररीतून गाडाभर पुस्तकं घेऊन येत रहाते ...फार गोड चित्र आहे ते। अन मग तिच्या हट्टा मुळे तिला शाळा मिळते।
पण तिथली कजाग क्रूर मुख्याधापिका; तिचं वागणं तिचा इतिहास...
तिथलीच एक अतिशय गोड, सहृदय शिक्षिका। मिस हनी। मुलांबद्दल, शिक्षणाबद्दल कळवळा असणारी।
अन मग मटिल्डा अन मिस हनी मधलं गोड नातं। मिस हनीचा भूतकाळ। मटिल्डा आणि हनीचा छोटासाच पण साहसी लढा।
शेवटी त्या दोघी एकत्र येतात की नाही, कशा हे पाहण्याची उत्सुकता...
एखाद्या परिकथे सारखं हे सगळं उलगडत जातं।
Danny DeVito या दिग्दर्शकाने कमाल केली आहे। 5-6वर्षाच्या मुलीच्या नजरेतून त्याने हा चित्रपट आयोजला आहे। अन ते करताना त्या वयाचं निर्वाज्यपण इतकं म्हणून जपलय न😇 शिवाय अत्यंत सामान्य बाप असा काही उभा केवाय हॅटस ऑफ टु हिम। आणि Mara Wilson या धिटुकलीचा सगळा वावर आहाहा। मला अशी मुलगी हवीचचच होती😃
अन Embeth Davidtz हिने मिस हनी इतकी हनीसारखी गोड केलीय। या शिवाय Rhea Pelman हिने सादर केलेली आईही वेगळीच। Pam Ferris ची क्रुरकर्मा मुख्याध्यापिका धडकी भरवणारी
तर नक्की बघा Matilda नेटफ्लिक्सवर
मला चित्रपटांबद्दल नीट लिहिता येत नाही। पण मटिल्डाची आठवण झाली न रहावलच नाही। गोड मानून घ्या🙏🏻
No comments:
Post a Comment