Saturday, December 2, 2017

नातीसाठी बडबडगीत: निमित्त नातवाचे बारसे



गुंड्याभाऊंचा सारखा दंगा किती
स्वराताईशी खेळायची मज्जा किती

पायांनी किका मारतात किती
बाबासोबत बॉल खेळायताय किती

चुळबुळ चुळबुळ करतात किती
आईसारखे देश पाहु किती

डोळे लकलक करती किती
काकासारखा फोटो काढू किती

पाय तालावर हलवतो किती
काकी सारखे नाचू किती

हत्ती, घोडे खेळणी किती
मामाशी चेस खेळु किती

हाताची बोटं फिरवतो किती
आजीसारखी पेटी वाजवू किती

तंद्रीलावून विचार करतो किती
आजोबांसारखा अभ्यास करू किती

कुडकुड वाजते थंडी किती
पणजीचे स्वेटर घालु किती

टिपेचा स्वर लावतो किती
आत्याबरोबर गाणी म्हणू किती

डोळे भिरभिर फिरती किती
निखु काकाची काररेस बघु किती

गुंड्या गुंड्या म्हणता किती
नाव ठेवा ना आता तरी!






No comments:

Post a Comment