मला आवडला रुद्रमचा शेवट. ज्या पद्धतीने संपूर्ण सिरिज जात होती, तिचा शेवट असाच होणं मलातरी आवडलं. आणि सगळ्या अत्यावश्यक गोष्टींचा योग्य तो शेवट, उलगडा, पूर्ण विराम,... सगळच पटलं मला. इव्हन शेवट न्युज वगैरे दाखवताना दाखवली नाही तेही आवडलं. एकदम सटल एंड! आय लव्ह मुक्ता :) जगातल्या कितीही मोठ्या अडचणी समोर, शत्रू समोर एक सामान्य व्यक्तीने ठरवलं तर नाही मान झुकवत, हे खूप सुरेख मांडलं. माखिजा सारखी माणसं असतात जगात, प्रचंड ताकद, पैसा, सत्ता असणारी... गॉडफादर चित्रपट आठवला , जगातली अगदी भारतातलीही काही लोकं बघितली की लक्षात येतं , असतात अशी माणसं.अर्थात हेही एक प्रतिकच. मुळात जगातला, जीवनातला अशक्य वाटणारा शत्रु, त्यालाही तोंड देता येतं. हे फार छान दाखवलं. ही सकारात्मकता, ताकद देणारी सकारात्मकता भावलीच! मुळात हा रागिणीच्या उद्वस्त झालेल्या आयुष्याचा होम! त्याचमुळे स्वत:चा जीव ओवाळून टाकायला, उधळून द्यायला तयार असलेली रागिणी फार समर्पकपणे आली समोर. सस्पेन्स अन थ्रिलर करण्याच्या नादाला न लागतो एखादी रागिणीसारखी सामान्य व्यक्ती जशी वागेल सेम तसाच शेवट केला हे मला आवडलच. हो, काही गोष्टी खटकण्यासारख्या होत्या पण हे खटकणं व्यक्तिसापेक्ष म्हणून सोडून देता येण्याजोगं. रायटर्स लिबर्टी, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन म्हणून सहज मान्य व्हावा. एकुणातच, एक फार छान कलाकृती! मराठीत इतकी आव्हानात्मक आणि तरीही बॅलन्स्ड, तारतम्य पाळणारी, शेवटपर्यंत सनसनाटीचा मोह टाळलेली, उगाच भव्यदिव्य न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहिलेली मालिका म्हणून नक्की बराच काळ मनात राहील. पुन्हा बघायलाही नक्की आवडेल. शेवट अपेक्षित असला तरी त्याचं टेकिंग अतिशय समंजस, प्रगल्भ होतं, आणि म्हणूनच आवडला शेवटही!
कलावंत सगळेच, मुक्ता बर्वे, किरण करमरकर प्रामुख्याने, लेखक, दिग्दर्शक, संगीत, एडिटिंग, कास्टिंग, कॅमेरा( उगा ढँग ढँग ढँग न करणारा), संकलन, मेकअप, कॉश्च्युमस, सगळ्यांनीच एक स्टेटस ठेवलं पूर्ण वेळ. कधीही फोकस हलला नाही. ( आबा हे अतिशय महत्वाचे प्रकरण होते, रागिणीच्या दृष्टीने. कारण ज्या घटनेने तिचे सारे आयुष्यच पालटून गेले त्याचे धागेदोरे त्यातच अडकलेले. सो मला योग्य वाटलं तिचं आबासाठी पराकाष्ठा करणं)
एकुणातच संपूर्ण रुद्रम टीम, हॅट्स ऑफ ____/\___👍🏻

No comments:
Post a Comment