Tuesday, September 22, 2015

लॉजिकल थिंकिंग आणि रॅशनल बिहेविअर


कोणत्याही परिस्थितीला दोन प्रकारे सामोरं जाता येतं. सेम कोणत्याही व्यक्तीला दोन प्रकारे सामोरं जाता येतं.
एक काहीही विचार न करता, जसं समोर येईल तसं स्विकारणं
दोन, प्रत्येक बाबीचा नीट, साकल्याने, अभ्यासपूर्ण सामोरं,जाणं.
मला पहिला प्रकार कधीच जमला नाही.
अन दुसरा प्रकार स्वताला कितीही त्रासदायक, रादर कष्टदायक वाटला तरी तो सोडता आला नाही.
त्या घटना घडताना, व्यक्तींना हँडल करताना ही पद्धती खूप त्रासदायक वाटायची. पण नंतर होणारे परिणाम , जुळणारी नाती या दृष्टीने ते सगळे खरचच खुप खूप उपयोगी ठरले.
या स्वभावापोटी स्व:ताला आपण फार राबवतो, छळतो असं वाटायचं. कधीकधी शारीरिक त्रास  आणि बुद्धी, मन अगदी थकून जायचे. पण त्यातून ते घडायचे ते मात्र पूर्ण समाधान देणारे होते.
त्रास, कष्ट, कधीकधी येणारे होपलेसचे फिलिंग ही अगदी जीवघेणे, नैराश्य आणणारे असायचे.
पण ते नसते केले तर मी जगूच शकले नसते. ते केले नाही म्हणून मन खात राहिले असते, इतके की जीणेच मुश्किल झाले असते.
सो, हा आपला स्वभाव आहे, त्या नुसार करायचे. त्या क्षणी जे मनापासून वाटले ते केले, जे नाही करावेसे वाटले , नाही केले.
सगळ्या चांगल्यावाईटासोबत रात्री छान झोप लागते, हे महत्वाचे , है ना  :-) 

No comments:

Post a Comment