वेदकालीन तत्वज्ञानाने जेव्हा समाजावर नियंत्रण मिळवलं, त्यातून काही दुष्परिणाम दिसू लागले तेव्हा बौद्ध, जैन तत्वज्ञान आणि चार्वाक तत्वज्ञान पुढे आले. तिघांनी वेदकालीन तत्वज्ञानातील दोष, कमतरतांबद्दल बोलायला सुरुवात केली. बौद्ध अन जैन दोघांनी आपला वेगळा मार्ग मांडला अन त्यामुळे वैदिक धर्माहून आपली फारकत करून घेतली. चार्वाक तत्वज्ञान मात्र वैदिक तत्वज्ञानात राहूनच दोष दाखवत राहिले. वेदकालिन तत्वज्ञान न नाकारता त्यातील न पटणारे ते मांडत राहिले. स्वाभीविकच उत्तरकालीन वेद तत्वज्ञानींना आपल्या अस्तित्वाला ते आतून पोखरणारे नाटले. म्हणून मग त्यांना पूर्ण उखजूननटाकणं गरजेचं झालं.
यातून चार्वाक दर्शनची सर्व लिखित जाळून टाकले गेले. अन वेदांतील कर्मठ मतं मांडणारा ब्राह्मणधर्म जास्त कणखर होत गेला. ज्याला ब्रिटिश काळात हिंदु धर्म हे नाव पडलं.
एका अर्थाने चार्वाक दर्शनचे सर्व साहित्य नष्ट झाले ते बरेच झाले. त्यामुळेच चार्वाक दर्शन जास्त व्यापक झालं.
चार्वाक दर्शन काय सांगतं?
वेदांमधे मांडलेलं सर्व; केवळ ते वेदांत सांगितलय म्हणून मी स्विकारणार नाही.
एखादा गुरु काही सांगत असेल तर; केवळ गुरु सांगतो आहे म्हणून मी मानणार नाही.
एखादा तत्ववेत्ता/ विचारवंत/ नेता/ कोणीही व्यक्ती / पुस्तक काही सांगत असेल तर; केवळ ती व्यक्ती/ पुस्तक सांगतेय म्हणून ते मी स्विकारणार नाही.
एखादी तार्किक पद्धती, बुद्धिनिष्ठ विचार काही सांगत असेल तर; केवळ तो सांगतोय म्हणून मी ते स्विकारणार नाही.
तर; वरील पैकी कोणीही, काहीही सांगितलं तर; ते मी माझ्या बुद्धी, विचार, अनुभव आणि मतांवर घासून तपासेन. आणि जर पटलं तरच ते स्विकारेन. इतकच नाही तर तेच सगळे नेहमी मी तपासत राहिन अन पटेल तेव्हाच स्विकारेन अथवा नाकारेन.
ही सततची तपासणी मी चालू ठेवेन.
आता लक्षात येईल की बुद्धिनिष्ठता हिच्याही पुढे चार्वाक दर्शन तुम्हाला नेतं. अर्थातच हा मी चार्वाकदर्शनाचा लावलेला अर्थ आहे. अन हेही सांगू इच्छिते की हा अर्थ बदलण्याची शक्यताही मी मोकळी ठेवली आहे.
उदा दाखल जस्ट वाचलेली एक बातमी देते
https://www.indiatoday.in/amp/science/story/indian-scientists-break-a-century-old-limit-on-turning-heat-into-electricity-2985454-2026-09-02
याचमुळे बुद्धिनिष्ठेवर न पटणारं फ्लॉवर रेमिडी वा काही प्रमाणात रेकी हे चार्वाक तत्वज्ञानानुसार मी स्विकारते (काही प्रमाणात)
अन वर दिलेली बातमीही दर्शवते की जर बुद्धिप्रामाण्य अन शास्त्रीयतेचा निकष धरून ठेवला असता तर हा नवीन विचार मांडला गेला नसता. हेच कॉंटम थिअरीलाही लागू होतं
No comments:
Post a Comment