Saturday, January 6, 2024

माझी धर्मप्रतिज्ञा :)

मी हिंदू आहे आणि हिंदू धर्मात आहे त्यासाठी ऋणी आहे. 

या धर्मातली  सहिष्णुता, खुलेपणा, स्वातंत्र्य सजाकता, वैविध्य या सर्वांची मी ऋणी आहे; अभिमानी आहे .

 

विचारांच्या  पातळीवरती आस्तिक - नास्तिक दोघांनाही तो सामावून घेतो. 

रामापासून अगदी बौद्ध महावीरापर्यंत सर्व देवतांना तो सामावून घेऊ इच्छितो. देऊळ गुहांमधल्या अनेक मूर्ती या धर्माला स्वीकारता येतात. 

समाजातील विविध सामाजिक ,आर्थिक स्तर तो सामावून घेतो . 

विविध विषयांनाही हा धर्म सामावून घेतो. अगदी तत्त्वज्ञानापासून कर्मकांडापर्यंत. 

पूजा विधी पासून लैंगिकतेपर्यंत .

जन्मापासून मृत्यूपर्यंत. 

शाकाहारापासून मांसाहारापर्यंत .

नमस्कार पासून चमत्कारापर्यंत. 

भल्या मोठ्या उत्सवांपासून साध्या नुसत्या एका नमस्कारापर्यंत .

शेंदूर फासलेल्या दगडापासून गर्भश्रीमंत मंदिरापर्यंत .

पुरुष देवांपासून स्त्री देवता; इतकेच नव्हे तर बालरूप ,प्राणीरूप, निसर्ग रूपापर्यंत दैवत  मानणारा. 

गुहांपासून माळरानापर्यंत मंदीरे असणारा. 

56 भोगांपासून खडीसाखरेच्या दाण्यापर्यंत प्रसाद मानणारा. 

निर्वस्त्र रुपापासून सालंकृत मढलेल्या रुपापर्यंत सर्वांना समान मानणारा. 

फकिरांपासून राजवेषापर्यंत सर्वांना मान देणारा.  

राजापासून रंकापर्यंत सर्वांना  समान भक्त मानणारा.  अनेकेश्वरापासून एकेश्वर वादापर्यंत अशी भली मोठी यादी अत्यंत सहजतेने सामावून घेणारा हा धर्म . 

कालपरत्वे अत्यंत सहजपणे बदलणारा, होणारे बदल अतिशय संयमितपणे स्वीकारणारा .

भाषा -आचार -विचार- कृती -कर्म या मधला बदल स्वीकारणारा. 

विविध इतर धर्मांची आक्रमणे, न लढता त्यांना समावून घेत स्वत: जास्तीत जास्त व्यापक बनत जाणारा. 

सर्वात प्राचीन असून सर्वात प्रगत (नवीन स्वीकारत जाणारा म्हणून) असा हा धर्म.  


कोणताही अभिनवेष न पाळणारा . 

कोणताही एकच एक ग्रंथ न मानणारा. 

कोणताही एकच एक देव न मानणारा .

कोणतीही एकच एक आचारसंहिता न मानणारा.

कोणतीच स्थितीशील रचना न मानणारा . 

असा हा अत्यंत सुलभ ,सर्वसामावेशक ,मोकळा ,सर्वांचे स्वागत करणारा , सनातन- म्हणजेच काळ आणि परिस्थितीनुसार बदलत जाणारा धर्म मला लाभला याबद्दल मी अतिशय ऋणी आहे .


आणि या धर्माचे हेच स्वरूप टिकून राहावे अशी मनोमन इच्छा मनात बाळगून आहे . कारण याच स्वरूपामुळे हा धर्म  हजारो वर्ष हजारो टिकून राहिला आहे  याचे भान मला आहे. 

- आरती

No comments:

Post a Comment