Sunday, February 18, 2018

आपलाची संवादु आपणासी : मैत्र


खूप दिवस जाणवतय.
मी ज्या टिप्स इथे लिहिते, काही फोटो शेअर करते ते काही माझा ग्रेटपणा दाखवण्यासाठी नाही. उलट मला माझ्या यंग एजमधे कोणी गाईड करायला फार नव्हतं, स्पेसिफिकली नोकरी संसार करताना डुज अँड नॉटडुज सांगणारं कोणी अनुभवी नव्हतं. माझ्या आधीची पिढी घरी असणाऱ्या बायकांची होती... माझ्या आसपासची. सो मला खूप ट्रायल एरर करत झगडावं लागलं. तो अनुभव फारच जिकिरीचा होता. तरुण मुलींची आजची धावपळ पहाताना ते सगळं आठवतं. मग काही टिप्स ज्या ट्रायलएररने मला कळल्या त्या शेअर कराव्या वाटतात. मेबी त्यांना  उपयोगी पडतील, मेबी नाही. पण खरच त्यात माझा फक्त मोठा अनुभव असतो, बाकी कोणताही शहाणपणा नसतो.
तशात स्वयंपाकघर हा माझा जिव्हाळ्याचा प्रांत आहे. सो त्यातले प्रयोग जरा हटके असतात. त्यातही वेळ वाचवण्याचे अन मुलांना आवडतील अशा प्रकारचे प्रयोग असतात. कधी आधीचे कधी आताचे...
माझी ही पॅशन आहे. याचा अर्थ असा नाही की मला हे जमतं म्हणजे मी काही ग्रेट. अरे मला हे जमतं बसं. जस एखादीला लेकाला ड्राईव्ह करायला घेऊन जाणं जमतं तसं मला कधीच जमलं नाही. दुसरीला जसा बिझनेस जमला तसा मला कधीच जमला नाही. तिसरीला जसं अॅक्टिंग जमलं तसं मला कधीच जमलं नाही. बट इट इज परफेक्टली ओके. प्रत्येकालाच सगळं कसं जमेल?
मलाही आज जे काही जमतय ते हाती असलेल्या मोठ्या वेळामुळे. सो माझ्या अशा प्रयोगांनी " मला जमेल का" असंही म्हणू नका अन " ही ॲट पार काहीतरी करते" असंही म्हणू नका प्लिज ___/\___ थोडी अधिक सहज दृष्टी ठेऊत. आपल्यात
फरक फक्त इतकाच आहे की अनुभव ( वयाचा आणि लिखाणाचा) कमी जास्त आहे.
सो चिल मारा की. वुई ऑल आर सेम बोट. कुणाचं काही जास्त कुणाचं काही कमी. पण समान धागा मैत्रीचा आहे न? दॅट मॅटर्स. त्या मैत्रीत हेवाही नको अन टिकाटिपण्णीही नको. काही लोकंतरी, राहू दे की या सगळ्या परे  😃
काय म्हणता?

No comments:

Post a Comment