कोणताही निर्णय घेताना जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते तेव्हा लक्षात घ्या की आपला निर्णय झालेलाच नाही. मग जर आपला निर्णयच झालेला नाही तर आपण तो इतरांना तरी कसा पटवणार आहोेत? अशा परिस्थितीत आपलं मत बाजुला ठेऊन इतरांबरोबर जाणं हाच मार्ग असतो. कितीही पटत नसलं तरी. जोवर तुमचा ठाम निर्णय होत नाही, तो इतरांना पटवता येईल इतपर्यंत तो तुम्हाला पटला नाही तो वर तुम्हाला इतरांबरोबरच जावं लागतं. परिस्थिती बदलायची तर आधी स्वत: पूर्ण विचार करायला हवा, त्या विचाराला तार्किक पातळीवर घासायला हवे. आणि ज्यांना हा निर्णय सांगायचा, त्यांना तो मान्य येईल अशा पद्धतीने मांडायची तयारी करायला हवी.
No comments:
Post a Comment