Saturday, March 28, 2015

"सेल्फ अरेस्ट"

आज एका मैत्रिणीने सुचवले म्हणून  जॉर्जिया ओ'किफ ची चित्र पाहिली. फारच आवडली आणि तिचा विचारही फार भावला.
एके ठिकाणी तिने म्हटलय..“NOTHING IS LESS REAL THAN REALISM. IT IS ONLY BY SELECTION, BY ELIMINATION, BY EMPHASIS THAT WE GET AT THE REAL MEANING…”
किती खरय ना? खूपच पटलं मला.
विषय निघालाय तर या डान्सरबद्दल थोडं लिहिते.
मी ॲनिमेशन शिकत होते तेव्हा एका सेशनमधे काढलेले हे चित्र. आम्हाला थिम दिली होती की सिलाऊट ची. म्हणजे एखाद्या गोष्टीची सावली दिसेल तसे चित्र, ज्यात खूप डिटेल्स दिसणार नाहीत पण चित्राला स्वत:ची काही गोष्ट असेल.
ही डान्सर काढताना माझ्या मनात विचार होता की, स्त्री मुळात एक कमनीय, नाजूक पण खूप सुंदर निसर्गकृती आहे. कोणत्याही कोनातून तिची लवचिकता दिसते.
बहुतांशी स्त्रिया ही लवचिकता आयुष्यभर प्रत्यक्ष जगतात. बालपण, पौगंडावस्था, तारुण्य, लग्न, बाळंतपण, मोनोपॉज,... कितीतरी शारिर बदलांना ती किती सहजपणे स्विकारत जाते. ही लवचिकता मला चित्रात आणायची होती. म्हणून मग डान्सर मनात नक्की झाली.
तिची लवचिकता मांडण्यासाठी मग तिची पोज ठरली. हे सगळं व्यक्त होताना तिची कलेप्रती असणारी सजगताही मला हवी होती अन जोडीने तिचे वेगवेगळ्या भूमिकेत होणारे जखडणेही दाखवायचे होते. त्यासाठी मग मी त्या दोरीला चितारले. आपल्या हातातल्या दोरीला वेगवेगळ्या आकारात फिरवणारी डान्सर !
अन मग त्यातून मला नाव सुचले,"सेल्फ अरेस्ट" !
सेल्फ अरेस्ट म्हणजे बर्फावरून ट्रेकिंग करताना जर घसरलात तर आपले आपणच स्वताला एखाद्या ठिकाणी कसे अडकवून घ्यायचे, ज्यातून तुमची घसरण थांबेल अन स्वत:ला वाचवणे शक्य होणे.
या चित्रात त्या दोरीच्या आधारे ती एकीकडे आपली कलात्मकताही जपतेय त्यातूनच ती दुसरीकडे तयार होणाऱ्या वलयांमधे अडकतेही आहे. अन त्या अडकण्याचाच उपयोग ती आपले व्यक्तित्व समृद्ध करण्यासाठी वापरतेय. आणि म्हणून ती नुसती स्त्री नाही, नुसती डान्सर नाही तर एक "सेल्फ अरेस्ट" आहे. वर वर पाहता थोडे निगेटिव्ह नाव वाटेल पण गर्भित अर्थ मला जास्त पॉझिटिव्ह वाटला, सो, "सेल्फ अरेस्ट"
खरे तर असे म्हणतात की कला उलगडून सांगण्यात काय मजा? ती तशीच भावली पाहिजे. पण कधी कधी त्या मागचा विचार मांडणं ही ही कला असेल तर  










No comments:

Post a Comment