अॅन्थनी गोन्साल्व्हिस : हिंदी चित्रपट संगीतातील जादूगार
जुन्या हिंदी चित्रपट गीतांची मी, आमच्या पिढीतल्या सगळ्यांसारखीच वेडी. मला आठवतं तेव्हापासून अभ्यास करताना शेजारी रेडिओ नाही अशी आठवण नाहीच. तशात आईलाही गाणी आवडत असल्याने दुपारच्या तिच्या निवांत वेळेत अन रात्री झोपताना तिने बारीक आवाजात, इतरांना त्रास होउ नये अशा आवाजात लावलेल्या गाण्यांची मोहिनी अजून रुणझुणतेय कानात. नेहमी वाटायचं की या जुन्या गाण्यात असं काय आहे की ज्याने आपण इतके त्यात हरवून जातो ? इतका 'सुकुन' मिळतो या गाण्यांनी ? इतके हळवे होतो आपण ? इतकी मन असण्याची जाणीव होते ? हळुवारपणा, मन उचंबळुन येणं, डोळ्यात पाणी येणं, मन भरून येणं, अगदी धो धो रडावसं वाटणं, प्रफुल्लित होणं, या आणि अशा सगळ्याच भावना कशा बरं मनात निर्माण होतात?
बरं संगीतकारांचे हे गारुड म्हणावं तर त्याच संगीतकारांची काही गाणी अगदी नेमके पणाने सांगायचं तर त्यांची १९६५ नंतरची गाणी का बरं अपील होत नाहीत, तेव्हढी ? मी आपलं मानून घ्यायची की बहुदा हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत, किंवा आपल्या त्या "स्वप्नील" वयाचा तो परिणाम असावा. पण मग कधी तरी या विषयावर माझ्याहून ८ वर्षांनी मोठ्या मैत्रिणीशी अन माझ्याहून १५ -१६ वर्षांनी मोठ्या मैत्रिणीशी बोलणे झाले तेव्हा त्या दोघींचाही असाच काहीसा अनुभव होता. अन मग मनात हे प्रश्न चिन्ह ठेऊन हा विषय तसाच मनात राहून गेला.
परवा एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सर्वाचे उत्तर अचानक मिळाले. सत्तावीस डिसेंबरला आधीच्या दोन अन नंतरच्या एका चित्रपटामध्ये मला रस होता. त्यांच्या मध्ये काही डॉक्युमेंट्रीज होत्या. मुळात मला अशा डॉक्युमेंट्रीज पहायला खुप आवडतात. कधी कधी अगदी वेगळे विषय, वेगळी माहिती, काही छान, अचानक मिळून जाते. त्यामुळे या डॉक्युमेंट्रीज पहायच्या हे ठरवल होतं. फक्त नाव मात्र मला न आवडणारे होते, रादर मला मिस गाईड करणारे होते. "अॅन्थनी गोन्साल्व्हिस". अमिताभचे ते गाणे आता पर्यंत माझ्या अगदी डोक्यात जायचे. त्यामुळे मी जरा साशंकच होते. अन मग मिळाला तो एक सुखद धक्का ! माझी सगळी मतच बदलून गेली
अॅन्थनी गोन्साल्व्हिस, गोव्यातला एक संगीतप्रेमी. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच का मुलगा गोव्यातल्या चर्चेसमध्ये संगीताचे संयोजन करायला लागला. संगीताच्या प्रेमाने तो पंधराव्या वर्षी मुंबईत आला. अन सुरू झाले एक मॅजिकल युग ! आपल्या व्हॉयोलिनच्या स्वरांनी सगळ्यांना त्यांनी वेड लावले. अवघ्या सोळाव्या वर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व मोठ्या संगीतकारांकडे त्यांनी आपले व्हॉयोलिन छेडले. अनिल विश्वास, शाम सुंदर, नौशाद, खय्याम, मदन मोहन, अशा दिग्गजांनी त्यांच्यातल्या कलाकाराला दाद दिली.
चर्चमधला संगीत संयोजनाचा अनुभव पाठीशी असल्याने अॅन्थनी गोन्साल्व्हिस लवकरच म्युझिक अॅरेंजर म्हणून पुढे आले. हिंदी चित्रपट गीतांचे पहिले म्युझिक अॅरेंजर म्हणून त्यांना मानले जाते. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ऑर्केस्ट्रा प्रथम आणला तोही त्यांनीच, अन तबल्याचा पहिला वापरही त्यांनीच हिंदी चित्रपट संगीतात केला. जवळजवळ २०० चित्रपटांमध्ये हजारों गाणी त्यांनी अॅरेंजर म्हणून कंडक्ट केली.
१९६५ मध्ये अमेरिकेतून बोलावणे आल्यामुळे तेथे ते संगीताचे शिक्षण देण्यासाठी गेले. अन हिंदी चित्रपट संगीताची मेलडी विस्कटलली.
अशा या 'द म्युझिकल लिजंड ' वरची ही डॉक्युमेंट्री ! १९४२ ते १९६५ या काळातले हिंदी चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान स्पष्ट करणारी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे अशोक राणे यांनी. ही फिल्म घेताना अशोकजींनी खरच खुप मेहनत घेतली आहे. त्यात लाईटचा केलेला उपयोग वाखाणण्यासारखा. ही सगळी माहिती ऐकताना, अॅन्थनी गोन्साल्हिसना बघताना एकी कडे आपण चकीत होत जातो, विषण्ण होतो, मनात हूरहूर वाटत राहते, एक काहीतरी हुकलं अशी चुटपूट लागून राहते. त्यांनी अॅरेंज केलेली गाणी ऐकताना एक नॉस्टाल्जिक फिल येत राहतो. खरच फार फार सुंदर केली आहे ही डॉक्युमेंट्री अशोक राणेंनी ! धन्यवाद अशोकजी !
जेव्हा केव्हा ही फिल्म बघायला मिळेल अजिबात चुकवू नका. त्या स्वप्निल काळाची ज्यांना ज्यांना भूल पडली होती, आहे त्यांनी या लिजंडला मानाचा मुजरा करायसाठी तरी नक्की बघा.
खरं तर एशियन फिल्म फेस्टिव्हल झाल्यावर लगेचच हे लिहायचं होतं. पण दुसर्या कामात अडकले. अन याला उशीर झाला. पण आज पेपरमध्ये वाचलं, ते गेले. अन मग राहावलं नाही. माझी ही त्यांना मनापासून श्रद्धांजली ! ज्यांनी आमच्या अनेक भावना जोपासल्या त्या महान संगीत अॅरेंजरला प्रणाम !
(मला इथे एक प्रामुख्याने नमुद करायचे आहे की या सर्व लिखाणाचा उद्देश त्या त्या संगीतकारांना कमी लेखण्याचा नाही उलट त्यांच्या संगीतातली ताकद ओळखण्याचे श्रेय योग्य त्या व्यक्तीला मला द्यावे वाटतेय. त्या महान व्यक्तीची मला ओळख नव्हती, तशी ज्यांना नसेल त्यांना ती व्हावी, केवळ हाच उद्देश या लेखनाचा आहे. )

No comments:
Post a Comment