लेकाचं पॅशन आहे कार्स आणि कार रेसिंग. अर्थातच छंद या पातळीवर. तर काल निखिलच्या कार रेसिंगला गेलो होतो. खूप सुंदर, वेगळा अन खूप समाधान देणारा दिवस/ अनुभव होता आजचा!😇🥰☺️
रेसिंगचा माहौल, संपूर्ण गृपची सकारात्मक आणि एकमेकांना मदत करणारी उर्जा. एक झिंग - वेगाचीही अन पॅशनचीही.या गृपबद्दल खूप ऐकून होते, बऱ्याच जणांची नावं- त्याची पदं, वयं बरचसं निखिलकडून गेली काही वर्ष ऐकत होते. आज ते सगळं अनुभवायला मिळालं.
एका वेगळ्याच विश्वात त्याने कशी माणसं जोडलीत, किती विविध प्रकारचे कष्ट करून कौशल्यं मिळवलीत ते प्रत्यक्ष बघता आलं.
भेटलेल्यांपैकी सर्व सिनियर(अगदी काही मलाही सिनियर) लोकांकडून निखिलचं कौतुक ऐकताना फार समाधान वाटत गेलं. त्याचं स्किल, काम करणं या बद्दल तर बोललेच पण प्रत्येकानी 'ही हॅज अ गुड हार्ट' हे प्रत्येकानं आवर्जून सांगितलं. आणि तुम्ही छान वाढवलयत हेही.
पूर्ण अनोळखी अन वेगळ्या जगातल्या लोकांनी मुद्दाहून थांबवून हे सांगावं या परतं सुख अन समाधान ते काय!☺️
फार कौतुक झालं.
ह्याला सोलो रेस असंही म्हटलं जातं. त्यामानाने हे सेफ रेसिंग. एका वेळी एकच कार ट्रॅकवर. प्रत्येकीचा टाईम रेकॉर्ड करतात. शिवाय कोन पाडले नाहीत न? किती पाडले? या दोन्हीचं कॅलक्युलेशन करून नंबर ठरतो. (कोन - ट्रॅक डिझाईन करतात. त्यानुरुप प्लॅस्टिक कोन रस्यावर ठेवतात मार्क करून)
स्पोर्टस कार क्लब ऑफ अमेरिका scca मार्फत संपूर्ण अमेरिकाभर अनेक ठिकाणी रेसेस घेतल्या जातात. त्याच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. त्यातली एक कोलंबस.
जनरली जुन्या एअरपोर्ट्सवर या रेसेस घेतल्या जातात. कोलंबसमधे विमानतळ नाही. पण कमिन्सच्या ट्रक्स च्या टेस्टिंगसाठी जो ट्रॅक आहे तो इतका मोठा आहे की scca ने तिथे रेसिंगला मान्यता दिली अन कमिन्सनेही.
यातून कोलंबस स्पोर्ट्स कार क्लब cscc सुरु झाला.
निखिल सध्या या क्लबचा एक बोर्ड मेंबर आहे अन फेबुवरच्या या गृपचा को अॅडमिनही.
तर रेस बाबत.
सर्वात आधी scca ची परवानगी घेऊन रेस डेट ठरते. कोर्स डिफाईन करून तोही मान्य करून घेतला जातो. प्रत्यक्ष ट्रॅक अन रेसिंग सगळ्याचे रेकॉर्ड scca ला द्यावे लागते. त्याचे इन्सपेक्शनही होते. सो कुठेही हलगर्जिपणा होत नाही. सुरक्षितता अतिशय लक्षपूर्वक पाहिली जाते.
रेसच्या आधल्या दिवशी ऑर्गनायझर्स सगळी व्यवस्था पार पाडतात. यात ट्रॅक तयार करण्यापासून सर्व रेकॉर्डस ठेवणे, सर्व डाटा cscc व scca सर्व्हरवर कनेक्ट करणे, रेसकार्सच्या तपासणीसाठी सर्व सोय करणे या पासून टॉयलेटची सोय पहाण्यापर्यंत सर्व येतं.
कॅपसमधे आत येताना तुमचे नाव, फोननंबर, गाडी नाव नं सगळं लिस्ट केलं जातं. अन एक scca चा बँड दिला जातो तो मनगटावर पूर्ण वेळ ठेवावा लागतो. मग आत आल्यावर जी कार रेस करणार आहे तिची तपासणी. इंजिन, ब्रेक्स, टायर्स, लिकेज कुठलं नाही ना... ही होते.
मग कार्स पार्क करून रेसर्स पायी चालत जाऊन ट्रॅक कसा आहे याची पाहणी करतात. कुठला टर्न अवघड आहे, ट्रिकी आहे वगैरे.
मग गाड्यांना रेसिंग नंबर देणे. त्या कधी धावणार, कोण पहिला दुसरा तिसरा वगैरे ठरते. त्यानुरुप आपापली गाडी घेऊन रेसर ट्रॅकवरून गोल जाऊन स्टार्टिंग पॉईंटला लाईन करून थांबतात.
ऑर्गनायझर्य ट्रॅक तपासणी करून येतात. सिग्नल्स, ट्रॅक, कोन्स, तितले व्हॉलेंटियर्स सगळं नीट आहे न बघतात. वॉकीटॉकीवर एकमेकांशी संपर्क असतो.
प्रत्येक टर्न वर सेन्सर्स असतात. त्यानुरुप कोन हलला तर गुण कमी होतात. त्या टर्नवर ५-६ व्हॉलेंटियर्स असतात. कोन अर्धा सेंटिमिटर जरी हलला तर तो पूर्ववत ठेवणं त्यांचं काम. त्यासाठी प्रत्येक कोनची जागा मार्कही केलेली असते.
एक गाडी पूर्ण ट्रॅकवरून फिरून बाहेर पडत नाही तोवर पुढची कार ट्रॅकवर येत नाही.
तसच एक बाहेर पडली की लगेचच दुसरी सुरु😅
किमान ३० ते ५० कार्स तर असतातच. त्यामुळे वेळ पाळणं आवश्यकच.
मधेच काही अडचण आली - उदा एखादा सिग्नल काम करत नसेल तर ऑरिगनायझर आपली गाडी ट्रॅकवर नेतात अडचण दूर करतात.
प्रत्येक कारच्या राउंडचे सगळे तपशील - स्पिड, कोनांची परिस्थिती रेकॉर्ड होतात. अन ड्रायव्हरच्या फोनवर ते तपशील जातात.
प्रत्येक ड्रायव्हर दर राऊंड नंतर चारही टायर्सवर पाणी फवारतो, प्रेषर चेक करतो. अन पुढच्या राऊंडसाठी तयार होतो.
आता ऑब्झर्व्हर काय करतो?
ट्रॅकवरचे सगले सिग्नलवर लक्ष टेवतो. काही हललं असेल तर त्या जवळच्या व्हॉलेंटिअरला ते सांगून दुरुस्त करवतो.
प्रत्येक गाडीचे प्रत्येक राऊंडचे रेकॉर्ड नीट मेन्टेन होतेय न पहातो( सगलं कॉम्प्युटराईज्ड असतं. तर ते धड चालतय न यावर लक्ष ठेवणं) (त्यात आपल्याकडच्यापेक्षा तिकडे कॉप्युटर लिटरसी फार कमी आहे.)
पुढची कार रेडी नसेल तर नंतर कोण हे ठरवून योग्य ते बदल करणे.
सर्व व्हॉलेंटिययर्सशी कॉऑर्डिनेट करणे
नंतर सर्व डाटा एकत्र करून निकाल देणे. तो योग्य त्या सर्व ठिकाणी पाठवणे.
हे सगळे मुव्हेबल असतं. त्या ट्रेलरमधून करणं हा एक स्किलफुल जॉब असतो. दरवेळी सगळं सेटिंग करणं अन नंतर ते आवरणं.
एकूणच रेस नीट पार पाडणे.
---
काही फोटो आणि व्हिडिओ:
रेसिंग मॅप
![]() |
| आप कतार में हो 😄 |
तात्पुरती ट्रेलरमधली केबीन.
कॉप्युटर्स सेटअप.
खाली फायरएर्झोस्ट, वाळूचं पोतं,
वायर्स, दोऱ्या वगैरे दिसेल
![]() |
| कार अशी कोन न पाडता झिगझॅग न्यायची |
लाल केबीन सारखं दिसतय तिथे ऑर्गनायझर असतात. समोर निळ्या टिशर्टमधला एक व्हॉलेंटियर. कारने कुठे थांबायचं अन गोsss सांगायचं क्याचं काम.
![]() |
| ट्रॅकजवळ उभे असलेले व्हॉलेंटियर्स |
रेसिंगच्या एका लॅपचा व्हिडिओ







No comments:
Post a Comment