श्याम सुंदर या संगितकाराचं अजून एक गोड गाणं -"क्या रात सुहानी है." चित्रपट अलिफ लैला 1953मधला. साहिर लुधियानवींचे शब्द. महम्मद रफी अन लता. आशा माथूर आणि विजय कुमार वर चित्रित. दोघेही तसे फारसे माहित नसतील. पण जोडी म्हमून फार छान शोभलेत. विजयची जुल्फ देवानंदची जरूर आठवण करून देतील ;)
खरे तर निम्मी ही पण आहे चित्रपटात. पण हे सुंदर गाणं मिळालं आशा माथूरला. आशा माथूर ही हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या काही सुक्षिशित नायिकांमधली एक. तिचं अजून एक प्रसिद्ध गाणं " हम सें ना पुछो कोई प्यार क्या है"
आता गाण्याबद्दल. या गाण्यात प्रश्न पडतो की रफी आहे की तलत :) त्याची "जमाने " मधली मुरकी आहाहा.
लता चे "फुरसत" आपली मान वळवल्याशिवाय रहात नाही.
म्हटलं तर साधी सरळ चाल पण गुंगवून टाकणारी, मधाळ!
दोघांच्या आवाजाचा मुलायम पोत वेगळाच माहौल तयार करतो एव्हढं नक्की!
जरा अॅबरप्टली संपलय यात गाणं. पण दुसरी लिंक सापडली नाही
No comments:
Post a Comment