नुकताच बघितला सरदार उधम
आवडला. मु़ख्य म्हणजे ऑथेंटिक घेतलाय. डायरेक्शन, कलाकार बेस्टच
जालियनवालाचं जरा अंगावर येतं पण कथेची गरज म्हणून. म्हणजे गांधीमधले शॉट्स एकदम सटल होते कारण पुन्हा कथेची गरज. पण यात ती घटना हीच उधमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट तर तो सटल घेऊन कसा चालेल न?
क्रांतीकारकाचे पैलू काही संवादांत खूप छान मांडलेच(भगतसिंगच्या तोंडचे) खरे क्रांतिकारक आणि संभावित यातला फरक एकदम हायलाईट होतो.
सो खरच आवडला
जरा डॉक्यु-मुव्ही या मधला झालाय पण ठिक.
शिवाय अनावश्यक स्पिड दिला नाही, मूळ घटनांनुरुप योग्य वेग ठेवून केलाय.
काहींना स्लो वाटू शकतो. पण ते तसच जास्त अंगावर येतं न?
इतिहासातल्या सनसनाटी घटनाही तारतम्य अन योग्य तो आदर ठेवून दाखवता येऊ शकतात याचं उत्तम उदाहरण ठरावा चित्रपट!
No comments:
Post a Comment