Friday, October 14, 2016

माझे कामांचे बदलते वेळापत्रक आणि काही टिप्स

हे दिवस या अशा गडबडींतूनच एंजॉय करायते, आणि नंतर 15-20 वर्षांनी आठवत तेव्हाचा निवांतवेळ अनुभवायचा, सध्या मी त्या फेज मधे smile
मागे वळून पाहाताना वाटतं की खरच कसं केलं बरं आपण तेव्हा? पण तेव्हा इट वॉज द पार्ट ऑफ लाईफ असतो.
आठवेल तसं लिहिते.
लेकाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी मी विद्यापीठात पुन्हा जाऊ लागले. एक बरं होतं आमची वेळ 11-5 होती. सुरुवातीला वर्षभर लेक दिवसभर आईकडे असायचा. नवऱ्याचा नवीन बिझनेस असल्याने त्याला खरच फार कमी वेळ असे. सकाळी 8.30/9 ला बाहेर पडायचा. कधी 6 कधी 7 तर कधी 10 ही वाजायचे. त्याची इतकी फिरफिर असायची, दिवसाला 50-60 किमी स्कुटर. सो मी त्याला घरातल्या कामातून मनापासून सुटका दिलेली. सासरे बाजारहाट बघत. सासुबाई मात्र काही करत नसत, त्यांचा तो स्वभावच होता.
तर दिवसाची अशी सुरुवात असे :
5-6 : पहाटे बरोब्बर पाच वाजता लेक उठायचा, मग पहिलं फिडिंग व्हायचं, थोडे लाड थोडं खेळणं झालं की सहाला ते झोपायचा पुन्हा.
6-7 : आम्हा चौघांचा चहा, ब्रेफाची तयारी.
7-7.30: कुकर लावून, एकीकडे ब्रेफा करत भाजीची तयारी. कणीक मळणं
7-30-8.30: ब्रेफा सगळ्यांना देऊन,भाजी फोडणीस टाकून चपात्या करता करता ब्रेफा खाणे. चपात्या झाल्यावर कुकर काढून वरण/ आमटी करणे. दोघांचे डबे भरणं. आंघोळीचे पाणी लावणे. साबुसाबा च्या जेवणाची तयारी करून ठेवणं. नवऱ्याला डबा देणं
8.30-9.30: एव्हाना लेक उठायचा, मग त्याची आंघोळ, फॅरेक्स खाणं. त्याची आजीकडे जायची बॅग भरणं, माझी साडी ठरवून बाहेर काढणे,पर्स, डबा भरणं.
9.30-10: लेक आजोबांबरोबर खाली फिरायला जाई. मग स्वयंपाकघरातली राहिलेली आवरा आवर, माझी आंघोळ, आवरणं.
10-10.30: लेक, त्याची बॅग, माझी पर्स, डबा सगळं काखोटीला मारून धावतपळत, धापा टाकत आईकडे 15 मिनिटं चालत जाणं. ढसाढसा पाणि पिऊन दुसरं फिडिंग,तोवर लेक झोपेला आलेला असे, त्याला झोळीत ठेवणं,आई झोका देई. आणि मी बाहेर पडे. ( दुपारी फॅरेक्स,मउ वरणभात, वरचं दूध, केळं हे लेक खात असे)
10.30-11 स्कुटर आईकडेच ठेवलेली असे. तिने विद्यापीठात
11-5 विद्यापीठ
5-5.45: आई कडे स्कुटरने
5.45-6.30: आईकडे लेकाशी खेळणे, चहा, तिसरे फिडिंग. सगळं चंबुगबाळं उचलून वापस घर. कधीमधी नवरा लवकर आला तर तो आईकडे येई, मग चश्कित स्कुटरने घरी
6.30-7: दिवसभरची वास्तपुुस्त. साबु नी आणलेली भाजी निवडणं
7- 7.30: लेकाचा कुकर, रात्रीचीभाजी करणे, जेवणाची इतर तयारी.
7.30-8.30: लेकाला भरवणं, नवऱ्याशी गप्पा, दिवसभराची वास्तपुस्त
8.30- 9.30: लेकाला नवऱ्याकडे/ सासऱ्यांकडे सोपवून भाकऱ्या करणे, साबासाबु चे जेवण
9.30-10: आमचं जेवण, मागचं आवरणं
10-10.30: नवरा, मी, लेक आमचा फॅमिली टाईम
10.30: रात्रीचे पहिले फिडिंग, झोपणं
सुरुवातीला 2 वााजता लेक पुन्हा फिडिंगसाठी उठायचा, पण लगेच झोपायचा.
हुश्य.... लिहिताना आठवत गेले आणि दमायला झालं मलाच whew पण तेव्हा मस्त चाललेलं आमचं thumbs up
काहींना यात वाटेल की कोणाचीच मदत का घेतली नाही? एक तर साबा चा स्वभाव कळला असल्याने त्यांना काम करायला लावायचं, त्यांनी धड करायचं नाही, मग आपली चिडचिड या पेक्षा ते सगळं मी टाळलं.
नवऱा खरोखर प्रचंड अडकलेला होता, आणि त्याची प्रगती व्हावी ही माझीपण हौस होती.
मदतीला कोणी ठेवावे अशी आर्थिक परिस्थिती उत्तम नव्हती.
नोकरी सोडणं हेही मानसिक आणि आर्थिक दृष्टीने परवडणारे नव्हते.
सो प्रत्येक गोष्टीला नेहमीच काही कारण असते. प्रत्येक वेळेस ते सांगितले जातेच असे नाही, याचा अर्थ काही कारणच नसते असे नाही किंवा स्त्रीमुक्तीचा विचार नसतो असही नाही.
माझ्या या सगळ्या धावपळीतून उलट माझा आत्मविश्वास आणि माझी स्वतंत्रबुद्धी जोपासली गेली असच मला वाटतं.
एरवी हे लिहिले नसते, पण "मैत्रीण" वर हक्काने लिहावं वाटलं. अनेक मुलींना आपण हे असे करतो, इतर मुलींसारखे करू शकत नाही याचा न्युनगंड असलेला दिसतो, तो दूर होऊन हे असे जीवन जगणे हेही एक चॅलेंज आहे, ते आपण उचलतोय हा विश्वास त्यांना मिळावा म्हणून हे सारे लिहिले.
अर्थात हे करणे म्हणजेच चॅलेंज असेही नाही. या उलट सगळी कामे आऊटसोर्स करून आपली करियर घडवणे हेही चॅलेंज आहेच. फक्त आऊटसोर्स करता येण्यासारखी परिस्थिती नेहमी, सगळ्यांची असतेच असे नाही.
सो, जे करता आहात ते आत्मविश्वासाने करा, आनंद घेत करा. बस इतकंच ( इतकं सारं लिहून पुन्हा इतकच म्हणतेय biggrin tongue )

शाळा स्टेप
मुलगा शाळेत जाऊ लागला तोवर सगळ्यांच्या विचारविनिमया नंतर मी, नवरा, लेक आम्ही टिमविच्या कॉर्टर्समधे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझी धावपळ कमी होणार होती, नवऱ्यालाही ऑफिस जवळ होणार होतं, लेकासाठी वेळ काढणं आता मला गरजेचं होतं. साबुसाबा ना मात्र आमच्या फ्लॅटवर राहणं बरं होतं. एकतर तिथे सेट अप तयार होता, तिथे त्यांचे गृप तयार झालेले आणि टिमवि क्वार्टर्स मधे बाकी सोशल लाईफ कमी असणार होतं.
सो आम्ही तिघं लेकाच्या शाळे दरम्यान टिमवि क्वॉर्टर्समधे होतो.( काही मधले तपशील गाळले आहेत... हे इन्नासाठी, तिला माहिती आहेत:) )
सो शाळा स्टेप:
6.30-7: चहा, ब्रेफाची तयारी
7-8: लेकाला उठवून दूध पिऊन स्वयंपाकघरात डायनिंग टेबल खुर्चीवर अभ्यासाला बसवणे आणि ब्रेफा तयार करत काय अभ्यास आहे, कसा करायचा याची चर्चा
8-9: स्वयंपाक,अभ्यासात मदत
9-9.30: लेकाची आंघोळ, आमचा ब्रेफा, नवऱ्याचा डबा भरणे आणि त्याला सी ऑफ
9.30- 10: मी आणि लेक टाईम. या वेळेस दिवसभर त्याने काय करायचे याचे प्लानिंग
10-10.30: लेकाचे वरणभात खाणे, त्याचा चपातीभाजीचा डबा भरणे, लेकाला सी ऑफ
10.30-11: स्वयंपाकघरातली आवरा आवर,माझी आंघोळ, आवरणे, लेक शाळेतून आल्यावर साठीची बेगमी( खाऊ, खेळ इ)
11-5: विद्यापीठ ( पावणेचारला लेक विद्यापीठात येऊन किल्ली आणि क्ल्यु असेल तर तो घेऊन घरी जाई)
5-5.30: लेकाचे दूध, खाणे, दिवसभराची वास्तपुस्त, सांगितलेल्या क्ल्यु वरून शोधलेली गंमत, केलेला अभ्यास इ
5-6: लेका सोबत बाजारहाट, त्याची काही खरेदी असेल तर ती ( एक वर्षी त्याची चार महिने सतत आणलेली पाच रु ची कॅडबरी ;) )
6-7: लेकाचे कँपसमधे सायकल चालवणे, मित्रांशी खेळणे आणि माझी स्वयंपाकाची तयारी/विद्यापीठाचे पेपर चेकिंग, टिव्ही पाहणे
7-8: लेकाचे एखादे फळ खाणे, माझे स्वयंपाक करणे आणि लेकाचा अभ्यास
8-8.30: लेकाचा कॉम्प खेळण्याचा वेळ, माझी मी टाईम- वाचन
8.30-9: लेकाचे जेवण, नवऱ्याचे येणे, दिवसभराची वास्तपुस्त
9-9.30: बापलेकांचा दंगा, माझा मी टाईम
9.30-10: जेवण
10-10.30 फॅमिली टाईम
10.30: झोप


वर्क फ्रॉम होम स्टेप
6.30-7: चहा, पेपर,
7-7.30: व्हॉअ, नेट, भाजी निवडणे चिरणे
7.30-8.30: ब्रेफा तयार करणे, स्वयंपाक
8.30-9: ब्रेफा
9-9.30: आंघोळ, स्वयंपाकघर आवरणे
9.30- 12.30: काम: लेखन ऑर विणकाम
12.30-1.30: जेवण, घर आवरणे
1.30-6.30: काम ( मधे अर्धा तास टी ब्रेक)
6.30- 7.30 स्वयंपाक
7.30-8.30 मी टाईम ऑर बाजारहाट
8.30-9.30 जेवण
9.30-12: काम + टिपी

आता मेन पार्ट, टिप्स
1. पहिली सर्वात महत्वावाची टीप ही की कसलही लोड घेऊ नका. जे काम करताय ते त्या वेळेस महत्वाचे आहे, म्हणूनच करताय यावर विश्वास ठेवा.
2. जे काम करत असाल ते 80% लक्ष देऊन करा, म्हणजे ते पटकन होईल, वेळेत होईल, नीट होईल.
3. काहींना एका वेळेस 2-3 कामं करायची सवय असते. अशा वेळेस प्रायॉरिटी मनात ठरवा, 70+20+10%. कोणतेतरी एक काम किमान 70% दिल्याशिवाय नीट पूर्ण होत नाही. आणि याची प्रॅक्टिसच व्हावी लागते. तोवर शक्यतो दोनच 80%+20% कामं करावीत.
4. नेहमीच टाईट शेड्युल वेळापत्रक जमत नाही, पण मनात टेन्टेटिव्ह असू दे. वाटल्यास सोबतच्या लोकांनाही ते सांगत रहा. याचा दुहेरी फायदा होतो. सोबतचे लोक ते समजून घेतात, आपणही थोडे काटेकोर होतो. अगदी लहान मुलांनाही याची सवय करवता येते. जसे आता ममाचा मी टाईम आहे तर तू दहा मिनिटांनी सांगशील का? असं म्हटलं की मुलं ही मान्य करतात.या निमित्ताने मुलांनाही वेळ पाळणं अंगवळणी पडतं
5. सोबतच्या लोकांचं शेड्युल विचारत जा, त्यानुरुप तुमचं वा तुमच्यानुरुप त्यांचं शेड्युल रि अॅरेंज करा. जसं मी 9 ला आंघोळ ठरवली आहे अन नवऱ्याची पण तीच वेळ आहे तर ( फार रोमाॅंटिक नसाल तर... winking )आपले शेड्युल डिस्टर्ब होईल, चिडचिड होईल.
6. ज्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की फारच गडबड होतेय, धावपळ होतेय, त्या क्षणी चक्क थांबा. दोन दिर्घ श्वास घ्या. मन स्थिर होईल. मग ठरवा आता पहिलं काय, मग काय? आणि हो जाव शुरू smile
7. सोमवारी आणि शुक्रवारी जरा अलर्ट रहा. हे दोन घातवार असतात biggrinसोमवार कारण आपल्या सकट सगळे घर रविवारमधून बाहेर यायचे असतात, शुक्रवार कारण सगळे सुट्टीवर जायच्या मूडमधे असतात.
8. फारच गडबड होत असेल तर : आधी ठरवा की कोणती कामं कोणाला सोपवता येतील? अगदी घरातलं लहान मूलही. उदा. जेव्हा तुम्ही खूप त्रासला आहात, रागावला आहात तेव्हा आई पाणी पी जरा. हे वाक्य लेका कडून आलं तर केव्हढा रिलिफ मिळतो, हे अनुभवण्यासारखे. किंवा कपड्यांच्या घड्या घालणे घरातल्या वृद्धांकडे सोपवणे आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या स्पिडने त्यांना करू देणे.
ही यादी मनात तयार झाली की शनिवार रात्री घरातले सारे निवांत बसलेले असताना विषय काढा. की मी सकाळी/ अमूकअमूक वेळेस फारच चिडले ना? घरातले जरा चकित होतील tongue मग म्हणा की, मला असं वाटतं की माझी फार धावपळ होतेय, एकाच वेळेस चार गोष्टी आल्या की चिडचिड होते, एक वैैतागला की सगळ्यांचच काम बिनसतं. तर मला 1-2-3 या कामात कोण मदत करू शकतं का? आणि मग मनातली यादी सांगणं. अर्थात एका वेळेस दोन फार तर तीनच कामं ट्रान्स्फर करणे. अन्यथा आपल्यातले आळशी मूळ भारंभार पाढे वाचत सुटतंbiggrin
( अगदी लेकाला पाणी देत जा रे असंही सांगायला काहीच हरकत नाही. मोठ्यांना नमस्कार कर, हा जसा संस्कार तसाच हाही. पुढे बायकोसाठी उपयोगी पडेल त्यालाही)
10. शेवटचं आणि खूप महत्वाचे: मनातला गिल्ट काढा. एखादी गोष्ट मी करू शकले नाही, तर इट्स ओके. मी पण माणूस आहे, नाही जमली ती गोष्ट. असं म्हणून स्वत: ला माफ करा, पुढे व्हा. वेळ आली तर इतरांची माफी मागा, पुढे व्हा.
यामुळे दोन गोष्टी होतात. एक आपल्या मनावरचं दडपण कमी होतं. आणि दोन मोकळे पणामुळे आपण पुढची कामं उत्साहाने करतो.
ओके बास झाली माझी पुस्तकी बडबड biggrin
आता हे सारं मी नेहमी केलं का आज पर्यंत? तर याचं उत्तर नाही हे आहे. मग? तर जसं समजत गेलं, उलगडत गेलं तसं तसं कधी केलं, कधी हुकलं, कधी जमलं, कधी चिडचिडत केली, कधी भांडलेसुद्धा, चिडले सुद्धा! पण मग दहावा मुद्दा ज्या क्षणी माझ्या मनात आला तेव्हा ही परिस्थिती हळूहळू पालटत गेली. नेहमीच हे जमलं असं नाही, पण बॅक ऑफ द माईंड हे मनात ठसत गेलं. आज वळून पाहाताना वाटतं की हो, फार काही वाईट मुलगी, वाईट सून, वाईट बायको, वाईट आई, वाईट प्राध्यापक, वाईट अॅडमिनिस्टेट्र, वाईट सहकारी, वाईट लेखक, वाईट मैत्रीण, नाही मी lol रात्री झोप छान लागते.
मला अनेकदा अनेकजणी म्हणतात की अग किती काय काय करतेस? तुझे क्लोन आहेत नक्की घरी. तुस्सी ग्रेट हो. वगैरे वगैरे त्यांचे कौतुक मी अॅक्सेप्ट करते पण त्यामागची मी मला बजावत असते, बायो, हे काय खरं नाही, फार काही उत्तम मुलगी, उत्तम सून, उत्तम बायको, उत्तम..... नाहीस बरं तू!
पण एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. माझ्या मनाला पटेल, बुद्धीला पटेल ते आणि ते सगळं केलं. आणि त्याहून महत्वाचे, जे जे केले त्याबद्दल आनंदी आहे. अन जे जे चुकले आणि ते समजले तेव्हा त्याची माफीपण मागितली आहे त्या बद्दल समाधानी आहे.
सो लाईफ इज ब्युटिफुल! जस्ट एंजॉॉय thumbs up

No comments:

Post a Comment