आमची सोसायटी म्हणजे एक छोटे गावच जणू. त्यात आमचा एक सांस्कृतिक मंचही आहे. या महिन्याच्या सुरवातीला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलाकार मा. डॉ. अनिल अवचट यांना आमच्या सोसायटीतील या सांस्कृतिक मंचातर्फे बोलावले होते. इतक्या चटकन त्यांनी यायचे मान्य केले. आणि आल्यावर इतक्या छान, मोकळ्या आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्यांनी... खुप खुप छान झाला कार्यक्रम. आमच्यातल्या अनेकांना वाटलं ही मुलाखत परत परत ऐकावी. मग हा व्हिडिओ नेटवर टाकायचा विचार केला. यालाही बाबांनी इतक्या चटकन मान्यता दिली... अतिशय सरळ, स्वच्छ, निर्लेप मनाचे, अतिशय प्रगल्भ असे हे व्यक्तिमत्व... आमचा इलेक्ट्रिशीयन एका अडचणीत अडकला त्यामुळे लाईटची सोय करता आली नव्हती.त्यामुळे हा व्हिडिओही छान नाहीये याची मला कल्पना आहे. पण बाबांशी झालेल्या गप्पा सगळ्यांशी शेअर कराव्यात म्हणून तो इथे टाकतेय.
No comments:
Post a Comment