अनारकली चित्रपटातील हे गाणं, साल 1953. गायिका लता, संगीतकार सी रामचंद्र. नायिका बीना रॉय
सी रामचंद्र, हिंदी चित्रपटातील नावाजलेले एक मराठी नाव. अतिशय सुरेल, तीन पट्यांमधे सरसर फिरणारे सूर, गायकाला मोठं चॅलेंज असणारी चाल, वाद्यांची नेमकी निवड अन नेमका वापर, ही काही वैशिष्ट्य.
अनारकली गाजला तो गाण्यांसाठी. 14 गाणी आहेत यात😃अन प्रत्येक गाणं बंदा रुपया. ज्यांना गाणी, संगीत आवडतं जरूर बघा हा चित्रपट. संथ वाटू शकेल, प्रदिपकुमार असल्याने जरा डोळ्यांवर अत्याचार होतील😂पण गाणी, बीना रॉय 💞
हे गाणं माझं फार आवडीचं. काय एक एक जागा आहेत. गंमत म्हणजे एखादा शब्द रिपीट होताना दरवेळी वेगळी सुरावट. सी रामचंद्र🙏🏻 नहींऽऽ, जातीऽऽ, सजदे,... दर वेळी वेगवेगळं.
No comments:
Post a Comment