Wednesday, November 14, 2012

चँपियन्स चित्रपटातील शंतनुशी गप्पा

आज बालदिन ! त्या निमित्ताने या दोन बाल कलाकाराच्या मुलाखती!

चँपियन्स च्या निमित्ताने शंतनु रांगणेकर या बालकलाकाराशी बोलायला मिळालं. त्याचा हा वृतांत.

आय इ एस, व्हि एन सुळे,दादर,हिंदू कॉलनी शाळेत दहावीत शंतनु शिकतो आहे. शाळेत वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच "कलाविकास" सारख्या स्पर्धांमध्येही त्याने भाग घेतला आहे.
ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक, रमेश मोरे यांच्या पत्नी, ........ या अनेक शाळेत नाटकाची शिबीरं घेतात. अशाच एका शिबीरातही शंतनुने सहभाग घेतला होता. सौ. मोरे यांना त्यानी त्याची अभिनय क्षमता ओळखली आणि त्यांनीच या चित्रपताच्या ऑडिशनची माहिती शंतनुला दिली. अन खूप मुलांमधून शंतनुची निवड झाली याचा त्याला खूप आनंद झाला.

हा त्याचा पहिलाच चित्रपट. इतक्या मोठ्या बॅनरचा चित्रपट आणि अविनाश सर आणि ऐश्वर्या मॅडम ह्यांचा ह्या चित्रपतात सहभाग असल्याने त्याझ्या दॄष्टीने शिकण्याची ही मोठी संधी होती. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश मोरे यांनी त्याला चित्रपटाचे आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे खूप बारकावे समजावले.
प्रत्यक्ष चित्रिकरण सुरु झाल्यावर थोडं टेंशन त्याला आलं होतं. कारण हा थोडा गंभीर विषयावरचा चित्रपट आहे.पण सगळ्या सहकलाकारांनी खूप समजून घेतल्या मुळे त्याला छान काम करता आलं हे त्याने आवर्जून सांगितलं. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर,रमेश मोरे प्रत्येक सीनबद्दल त्याच्या बरोबर चर्चा केली, कसं काम क्र याचे मार्गदर्शन केलं. त्यामुळेच काम करणे सोपे झाले हे त्याने नमुद केलं.

चित्रपटातील दुसरा बालकलाकार मछिंद्रबद्दल विचारल्यावर शंतनु विषेश खुलला. त्याने ह्या चित्रपटात शंतनुच्या धाकट्या भावाचे काम केले आहे. दोघांनी सेटवर धमाल केल्याचे त्याने सांगितले. .मछिंद्र अगदी फ्रेंडली असल्याने त्या दोघांची छान गट्टी जमली होती.सेटवर सीन चालू असताना दोघे अगदी गंभीरपणे काम करत पण एकदा का शॉट झाला कि ग्रीन रुममध्ये दोघे खूप दंगा करायचे, WWF वगैरे खेळायचे. प्रत्यक्ष आयुष्यात शंतनुला मोठा भाऊ आहे.पण चित्रपटाच्या निमित्ताने त्याला मछिंद्रचा दादा व्हायला मिळाले हे त्याला खुप आवडले.त्याने ही भूमिका खूप एंजॉय केली. मछिंद्र बरोबर काम करताना त्याला एकदम छान वाटलं. दोघं एकमेकांबरोबर खूप इझी वागायचे. एक दोन सीन्स केल्यानंतर दोघे एकदम सख्ख्या भावांसारखेच झालो, असं शंतनुने सांगीतले. मछिंद्रची शाळा शंतनुच्या घराजवळच आहे. त्यामुळे मछिंद्र कधी कधी शंतनुच्या घरी येतो.

या चित्रपटात काम करण्यापूर्वी पैसे मिळवण्यासाठी काही लहान मुलांना काम करावे लागते याची थोडी जाणीव होती. रस्त्यावर सिग्नलला लहान मुलांना वस्तू विकताना किंवा गाड्या स्वच्छ करताना त्याने पाहिली होती. शिवाय काही चित्रपटांमध्ये ह्या संदर्भात प्रसंग पाहिले होते.त्यामुळे बालकामगार हा काय विषय आहे ह्याची पुसट कल्पना त्याला होती. परंतु या बालकामगारांचे जीवन, धारावीतले जीवन याबद्दल त्याला फारसं माहित नव्हतं .तिकडे जाऊन आल्यावर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली कि आपल्याला बर्‍याचशा गोष्टी खूप सहज मिळतात,पण त्या मुलांना त्यासाठी बरेच कष्ट करायला लागतात. याचं त्याला खुप वाईट वातलं. सगळ्या लहान मुलांना शिकायला मिळालं पाहिजे असं त्याला वाटतं.
ह्या चित्रपतासाठी बक्षिस मिळालं तेव्हा खूप मोठी मोठी माणसं आली होती; दिल्लीला गेल्यावर ज्युरी आणि इतर खूप लोकांनी छान काम केलं आहे म्हणून शंतनुचे आणि मच्छींद्रचं खूप कौतुक केलं. हे सर्व सांगताना; या सा-याचा सार्थ अभिमान शंतनुच्या सांगण्यात होता. आपल्या देशाच्या 'प्रेसिडेंट'च्या हस्ते पुरस्कार घेण्याचा आनंद खूप वेगळा होता हे त्याने आवर्जून सांगितले. पहिल्याच चित्रपटात इतकं छान मार्गदर्शन मिळालं आणि बक्षिसही याचा त्याला आनंद वाटत होता.

शंतनुने मोठेपणी कोण व्हायचे आहे हे अजून नक्की ठरवलं नाहीये . पण हॉटेल मॅनेजमेंट करायचा त्याचा विचार आहे. त्यासाठी खूप शिकावं लागेल,खूप अभ्यास करावा लागेल. याची त्याला जाणीव आहे अन त्याची तशी तयारीही आहे. त्याच्या भावी आयुष्यासाठी मायबोलीतर्फे शुभेच्छा दिल्या. आणि त्याचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.

त्याच्या आईने चॅम्पियन चित्रपटाचा अनुभव खूप छान होता हे सांगितले. त्यांच्यासाठी हे फिल्ड नविन होतं. त्यांच्या घरातले कोणीच ह्या फिल्डमध्ये नाही. शंतनुने या क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना खुप आनंद झाला होता.

ह्या चित्रपटाचा शंतनुवर प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले. तो आता जास्ती मॅच्युअर झाला आहे असे त्या म्हणाल्या. शंतनु आणि मछिंद्र हे दोघं अरुण नलावडेंची 'वारसा' नावाची अजून एक फिल्म करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शंतनु आणि सर्व रांगणेकर परिवाराचे मायबोली तर्फे हार्दिक अभिनंदन!

1 comment:

  1. या दोन्ही मुलाखती घेण्यासाठी माझी मैत्रीण स्वाती नाचनोलकर हिची खुप मदत झाली :-)

    ReplyDelete