Wednesday, September 12, 2018

" मी कसा" व्यक्तिमत्व विकास - दहावी परीक्षेनंतर मुलांचे वर्कशॉप - आराखडा



"मी; दिसतो, राहतो, बसतो, बोलतो, उभा रहातो, चालतो, वागतो, हसतो, शेकहँड करतो, एेकतो, विचार करतो, कृती करतो" कसा?

*पहिला दिवस*

1. स्मरणशक्तीचा खेळ -  हॅरी लॉरेन यांचा, खेळणे, अभ्यासात उपयोग कसा करता येईल सांगणे, शिकवणे

2. अॅपिअरन्स
* चालणे - ताठ, खांदे सरळ मागे, मान सरळ, पावले सरळ

* उभे रहाणे - दोन्ही पायांवर, हातांना काही निश्चित ठिकाण

*  बसणे -  पाय न फाकवता, न हलवता, सरळ, रेलुन नाही, ताठ, हातांना निश्चित ठिकाण, हनुवटी सरळ, डोकं आधाराशिवाय सरळ

* शेकहँड  - कोणा बरोबर यावर पद्धत, दाब, वेळ, आय टू आय कॉंटॅक्ट

* फोन करताना  - नमस्कार, नाव सांगा, कोण हवय सांगा, रेफरन्स सांगा, काम सांगा, वेळ आहे का विचारा, काम टू द पॉींट सांगा, बी स्पेसिफिक, स्पिक देन लिसन, शेवटी समिंग अप करा दोन वाक्यात, आवश्यक तर भावी संपर्क ठरवा, धन्यवाद द्या, समोरच्याचे बोलणे एेकून मग फोन बंद करा.

* फोन घेताना  -  नमस्कार, कोणाशी बोलायचय विचारा, थांबा हं, बोलावतो म्हणणे, त्या व्यक्तीला देणे, तुमच्यासाठीच असेल तर ओळख, संदर्भ मागणे, काय काम विचारणे, समोरच्याला बोलू देणे, योग्य उत्तरं थोडक्यात देणे, बी स्पेसिफिक, टू द पॉईंट, लिसन देन स्पिक, शेवटी धन्यवाद म्हणून बंद करणे

*दुसरा दिवस*
कालची रिव्हिजन...

* कोणाकडे गेल्यावर -  नमस्कार, मी ..., कोणाकडे आलोय, काम काय आहे, दारातून आत जाताना चपला बूट काढून नीट ठेवणे, बसा म्हटल्यावरच बसणे, पाणी दिल्यावर थँक्यु म्हणणे, हळू आवाजात पण स्पष्ट उच्चार, काम झाल्यावर थँक्यु म्हणून निघणे.

* कोणी घरी आल्यास  - आपले नाव काय, कोणाला भेटायचेय, योग्य ओळख मिळाल्यास दार उघडून आत बसावयास सांगणे, पाणी देणे, संबंदित व्यक्तीला बोलावणे, ती व्यक्ती घरात नसेल तर काही निरोप आहे का विचारणे, फोन नं घेऊन ठेवणे, मी त्यांना सांगतो म्हणून निरोप द्यावा. 

* जेवताना, खाताना, पिताना - हात पाय धुवून येणे, जेवणाची तयारी - ताटवाटीपेलापाणी घेणे, कोणी कोठे बसायचे ते विचारणे, ताटात कोठे काय वाढून घ्यायचे विचारणे.
जेवताना ताट स्वच्छ ठेवावे, बोटं चाटू नयेत, खाताना आवाज नको, हातवारे नको, उष्टा हात इतर कुठे लावू नका, कमी बोला, हळू बोला, वाद भांडणाचे विषय टाळा, पदार्थ नीट मागून घ्यावा, संपल्यावरच मागावे, ताटातले सगळे संपवावे, मिरच्या कढिपत्ता वगैरे राहिलेले वाटीत एकत्र करावे, ताटवाटीपेला सिंक मधे ठेवावे, हात तोंड धुवून पुसणे, वस्तू ठेवायला मदत करणे.

* सामाजिक, कौटुंबिक समारोहात  -
गेल्यावर ज्यांनी अॅरेंज केले आहे त्यांच्याशी प्रथम बोला. आपल्या नात्यातील, ओळखीतील सर्वांना भेटा बोला*, आपल्या वयातली मुले शोधून गप्पा मारा. परत निघताना मोठ्यांना येतो म्हणा, आजीआजोबा वयाच्या लोकांना वाकून नमस्कार करा.

* काय बोलायचे  - कसे आहात, त्यांच्या मुलांची भाऊबहिणींची चौकशी करा, आजीआजोबा मंडळीच्या तब्येतीची चौकशी करा, आपण सध्या काय करतो आहोत सांगा ( शाळा, इयत्ता, आवड, खेळ, वाचन, चित्रपट यावर बोला )

* ड्रेस कोड - ऑपिशिअल, फंक्शनल, मित्रांबरोबर, खेळायला, फिरायला यातला फरक सांगणे.
स्वच्छ, बिना चुरगळलेले, इस्त्रीचे, नीटनेटरे, रंगसंगती यांचे भान हवे.
चपल, बूट, फ्लोटर्स, स्पोर्ट शूज, स्लिपर्स... कधी काय
इतर अॅक्सेसरीज किती, कधी, कोणते
केस विंचरणे, भांग पाडणे, दाढी करणे, नीट ठेवणे

*या सर्व गोष्टी प्रत्यक्ष करवून घेणे. आवश्यक तिथे सिच्युएशन क्रिएट करणे*

*तिसरा दिवस*
रिव्हिजन...

3. प्राणायाम
महत्व, प्रकार - साधा, भस्त्रिका, अनुलोमविलोम, 1- 4, 5-8, 9-12

4. ओंकार- महत्व. अ्+ऊ+ म्
स्वष्टोच्चार

5 . बोलणे - हळू, मध्यम, मोठ्यांने.
कधी, कोठे, कोणाबरोबर, सिच्युएशन काय आहे यावर.
स्पष्ट स्वच्छ उच्चार. टू द पॉईंट, बी स्पेसिफिक, आय टू आय कॉन्टॅक्ट, आत्मविश्वास, उर्मटपणा नको, फार भरभरही नको फार संथही नको, समोरच्यांचा अंदाज घेत जा, समोरच्याला बोलण्यात सामिल करून घ्या.

* एेकणे -  लक्ष देऊन एेकणे, आय टू आय कॉन्टॅक्ट, न बोलता हावभावांनी प्रतिसाद द्या, फारही नाही संयमित, पूर्ण एेकल्या नंतरच प्रश्न विचारा, उगाचच प्रश्न नकोत, शॉर्टनोट्स काढा, बोलणाऱ्याला कंफर्टेबल करा.

* हसणे  - कधी, कोठे, कोणाबरोबर, कोणत्या ठिकाणी, सिच्युएशन काय, सोबत कोण आहे, कशावर हसतो आहोत... या सगळ्याचे भान हवे.

* चवथा दिवस*
रिव्हिजन...

6. बोलणे एेकणे सुधारण्यासाठी संज्ञापन हवे. ते कसे मिळवायचे?

कनव्हिन्स व्हायला हवे.
*स्वत:चे स्वत:ला
*स्वत:चे दुसऱ्याला
*दुसऱ्याचे स्वत:ला
*दुसऱ्याचे तिसऱ्याला.
त्यासाठी काय पटवायचे, त्याचे मुद्दे लिहून काढा. ते फॅक्ट्स मधून तपासून घ्या. कसे पटवायचे ठरवा. आवश्यक उदाहरणे शोधा. मित्र, बहिण, भाऊ यांच्याबरोबर तालीम करा.

*पाचवा दिवस*

7.  लॉजिकल थिंकिंग -
गृहितक - थिसिस, पाहणी - ऑब्झर्व्हेशन, मांडणी - प्रोसिजर किंवा अॅरेंजमेंट, निष्कर्ष - कनक्ल्युजन, प्रयोग - एक्सपरिमेंट, सिद्धान्त - सिंथसिस.
या पूर्ण प्रक्रियेतून विचार करा.
उदाहरणे घेऊन प्रत्यक्ष करायला लावणे.

No comments:

Post a Comment