Saturday, December 2, 2017

फ्रॉम कोलंबस - ...

आज शिकागो एअरपोर्टला  विमानात बसले आणि सहज खाली लक्ष गेलं. आणि इतकं छान वाटलं न  :) दोन मस्त तगड्या पोरी, साधारण  तिशीच्या असतील, बॅगेजचे भले मोठे कंटेनर विमानात लोड करत होत्या. प्रत्येकीची चार पाच ट्रॉलीजची गाडी होती. पहिली ट्रॉली विमानाच्या कार्गो दारापाशी बरोब्बर उभी राहील अशी पार्क केली. मग झटक्यात खाली उतरून कार्गो शिफ्टवर ट्रटलीवरचं भलं मोठं कंटेनरचे धूड शिफ्ट केलं. आधी एक लिव्हर ओढलं अन मग शब्दश: हातांनी ढकलून मोशन दिली कंटेनरला. मग कंटेनर शिफ्टने आपल्यावर घेतला. मग शिफ्ट वर झाला. कंटेनर विमानाचत लेड झाला. अन शिफ्ट पुन्हा खाली आला. तोवर मॅडम गाडीत बसून गाडी बरोब्बर पुढची ट्रॉली शिफ्ट समोर आणून झटकन उतरून पुन्हा लिव्हर खेचायला उभ्या.
एकीने आपले पाच कंटेनर अपलोड केले, तशी झर्रकन गाडी न पाच ट्रॉल्या घेऊन मॅडम दुसऱ्या फेरीवर गेल्या. अन दुसऱ्या मॅडमनी आपले कंटेनर लोड केले.
बरं हे सगळं करताना कुठेही कमकुवतपणा नाबी, नाजूकपणा नाबी पण रानटी धसमुसळेपणाही नाही. जणुकाही ह्या कामासाठीच त्या तयार झाल्यात. अतिशय सफाईदारपणे, नजाकतीने, सिस्टिमॅटिकली! फार छान वाटलं. आजुबाजूला इतरही कामहार होते, पण तेही अनावश्यक मदतीला धावले नाहीत अन या दोघींनीही अगा नाजूकपणा, कमकुवतपणा दाखवला नाही. लव्ह बोथ द गर्ल्स  :)

हेच मला कमिन्समधे पण दिसलं. एक प्रिंटआऊट घ्यायचा म्हणून मी निखिलबरोबर कमिन्स मधे गेलेले. अर्थातच मी लाऊंजमधे थांबलेले. शनिवार असल्याने फक्त कामगार मंडळींच्या शिफ्ट्स चालू होत्या. पण त्यातही भेदभाव नव्हता. स्त्रिया, पुरुष दोघेही कामगार होते. शिवाय वयाचाही फरक नव्हता. अगदी 50+ च्या बायकाही कामगार म्हणून मस्त वावरत होत्या. कोणताही अभिनिवेष नाही, पूर्णत: समानता, अन कामाबद्दलची प्रतिष्ठा अन आदर हे प्रकर्षाने जाणवले.

No comments:

Post a Comment