Monday, April 24, 2017

घट घट पंछी बोलता...

"घट घट में पंछी बोलता" हे विणाताईंनी गायलेलं कबीरांचं भजन...

घट घट पंछी बोलता
प्रत्येकाच्या शरिरात अडकलेला आत्मा बोलत रहातो. मी अडकलोय, मला सुटायचय, उडायचय, स्वच्छंद उडायचय. पण मी अडकून पडलोय या शरिराच्या बंधनात. शरिरातला आत्मा सारखा बोलतेय, तडफडतोय, सुटायच मला, स्वच्छंद उडायचय....

आपही दंडी आपही तराजु, आपही बैठा तोलता
स्वत:चेच वागणे, स्वत:चेच नियम ठरवतोय आणि स्वत:च बसलाय तपासत.... आपणच अडकून बसला संसारात. कोणतीच व्यवधानं सुटत नाहीत, सगळ्या जबाबदाऱ्या एक एक करत तपासून पहातोय... आणि आतून सारखा तो बोलतोय, यातून सुटायचय, उडायचय, स्वच्छंद उडायचय

सब बन में सब आप बिराजे, जड़ चेतनामें डोलता
सगळ्या जगातल्या सगळ्या  गोष्टी करायच्यात. प्रत्येक गोष्ट करायचीय, अनुभवायचीय, भोगायचीय...या जड जगात अडकून पडतोय आणि तरीही त्याला सुटायचय, स्वच्छंद उडायचय...

आपही माली, आप बगिचा, आपही कलियाँ तोडता
मीच वाढवली सगळी नातीगोती, अन माझेच कुटुंब. आपणच वाढवलेली सगळी नाती, सगळे संबंध. वाढवलेल्या संसाराचा ताटवा... अन त्यातून फुललेल्या बंधांना सोडायचय.... सुटायचय, स्वच्छंद उडायचय...

कहत कबिरा सुनो भाई साधो, मनकी घुंडी खोलता
अरे कबिरा, एेक ही हाक,  साधका ही हाक एेक....  तुझ्या मनाची कवाडं  तूच उघडू शकणार आहेस... तुझी बंधनं तूच सोडवू शकणार आहेस.  उघड ती कवाडं, बाहेर पड,  उड, हो स्वच्छंद .....

No comments:

Post a Comment