Saturday, April 1, 2017

आपलाचि संवादु आपणासि : तणावमुक्तीसाठीचा व्हिडिओ ( रिलॅक्सेशन)

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक ताणतणाव घेऊन आपण वावरत असतो. अनेकदा मन, शरीर यांना म्हणावा तसा आराम मिळत नाही. कळतं पण वळत नाही अशी काहीशी परिस्थिती होते. मग कधीतरी नैराश्य येतं. बीपी हलू लागतं. काही आजार, आयुष्यातले काही धक्के अजूनच परिस्थिती वाईट बनवतात. नेहमीच आपल्याला योग्य मदत मिळते, घेता येते असं नाही. कधी कधी अगदी तातपुरती मदत गरजेची असते. जेव्हा प्रोफेशनल मदत गरजेची असेल तेव्हा मात्र न संकोचता ती घ्या.

पण सामान्य दमणुकीतून शांतता मिळावं म्हणून , सामान्य ताण मोकळा व्हावा या साठी अनेक रिलॅक्सिंगचे व्हिडिओज नेटवर उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग होतो.

आपली मैत्रीण वंदना हिला वाटलं की असे व्हिडिओज मराठीत असतील तर मराठी मैत्रिणींना जास्त आवडतील. मग तिने मला विचारले. की तू असे तणावमुक्तीचे लिखाण, वाचन करू शकशील का?
खरं तर हा काही माझा प्रांत नाही. पण वंदनाने माझ्या लेखन आणि सादरीकरणावर इतका विश्वास दाखवला की एकदा प्रयत्न करून बघायला मी होकार दिला.

हा असा मला काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे खूप जपून सगळे लिखाण केले, वाचनही.
वंदना, नलिनी, अकु या साऱ्या मैत्रिणींनी हवी तेव्हा सगळी मदत अगदी चटकन आणि मनापासून केली. सानीचे प्रोत्साहनही दिलासा देऊन गेले. काही मैत्रिणींचा फर्स्ट हँड अनुभवही उपयोगी पडला.़ तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.कोणाला याची फक्त ऑडिओ हवी असेल तर मला कळवा. मी पाठवेन. ( व्हॉ अ +91 9890971443) तुमच्या सहृदयांनाही ही लिंक शेअर करायला, पाठवायला हरकत नाही.

मैत्रीणवरती हा नवीन प्रयोग टाकण्यासाठी मान्यता दिली त्या बद्दल बस्केचेही आभार!

तुमचा अनुभव जरूर शेअर करा. भावी काळात इतरही काही असे तणावमुक्ती साठी, विषयानुरुप काही करता येईल.
धन्यवाद!
---

काही टीप्स:
व्हिडिओ एेकताना शक्यतो आरामात बसा/ आडवे पडा. डिस्टर्ब करणारी सर्व गॅझेट्स बंद करा. अशी वेळ निवडा जेव्हा पुढील किमान 15 मिनिटं तुम्हाला इतर कोणतेही व्यवधान नसेल.  शक्यतो डोळे मिटून, हेडफोन लावून एेका. कोणताही प्रयत्न मुद्दाहून नको.  शक्यता आहे की हे एेकताना झोपही लागेल. काही हरकत नाही. मनाला शांत वाटणेच अपेक्षित आहे.

---

डिसक्लेमर: मी यातली तज्ञ नाही. केवळ मैत्रिणींच्या आग्रहावरून हे केले आहे.


No comments:

Post a Comment