Tuesday, September 1, 2015

जंगलसफारी वरील रसिकांचे प्रतिसाद :२

प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आसावरी काकडे यांचा प्रतिसाद. मनापासून धन्यवाद आसावरीताई ___/\___

प्रिय आरती खोपकर,

‘जंगलसफारी बांधवगड’- तुमच्या शब्दांसोबतची बांधवगड सफर आताच संपली. तुम्ही अनुभवलेला थरार फोटोंमधून, तुमच्या शब्दांमधून अनुभवता आला...

‘सर्वांच्या नजरा दाखवत होत्या वाघीण कोठे बसली होती ते. ये बल्लू  रहा है”...अशी जिवंत शैली, वर्णनात घातलेल्या तेव्हाच्या त्या त्या वेळा आणि साक्ष देणारे फोटो यामुळं वर्णनं वाचतानाही तुम्ही अनुभवलेली उत्कंठा जाणवत राहिली.

मोर, हरणं, निथळणारी वाघीण, कल्लू आणि बल्लू दोघांचे फोटो.., थिंकर पोज फोटो.. हे फोटो तुम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन काढलेत याचा हेवा वाटला.. फोटो स्वतः काढण्यातला आनंद वर्णन करता येण्यासारखा नाही..!

      ईसाहित्यने पुस्तक छान काढले आहे. सुरुवातीला तुमची माहिती दिलीय ती वाचून आपण अशा बहूआयामी व्यक्तीशी रोज संवाद साधू शकतो याचा आनंद वाटला. तुमच्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे
२२ ऑगस्ट १५

No comments:

Post a Comment