Wednesday, August 12, 2015

जंगलसफारी वरील रसिकांचे प्रतिसाद

 माझे जंगलसफारीचे ईपुस्तक प्रकाशित झाले आणि अनेक रसिकांचे प्रतिसाद यायला लागले. अगदी पहिला प्रतिसाद आला तो मा. श्री. सुरेश पुरोहित यांचा. प्रत्यक्ष ओळख नसतानाही आवर्जुन प्रतिसाद अनेकांनी दिला. पुरोहितांचा प्रतिसाद विषेश आवडला. म्हणून आपणा सर्वांसोबत शेअर करतेय. त्यासाठी त्यांची परवानगी मागितली, तर ती ही त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने दिली :-)  तीही देतेय. मनापासून धन्यवाद पुरोहितजी  ___/\___

श्री. सुरेश पुरोहित यांचा प्रतिसाद :

तुझी नाळ जंगलाशी जणू काही जुळली आहे
म्हणून सा-या जंगलाचा मोह तुला पडला आहे
           मेघ सोडून मोर तुला बघून पिसारा फुलवतात
           भित्री हरणे तुझ्या चाहुलीत तुला भेटण्यास थबकतात
वाघांचे तर काय सांगू? त्यांची सर्कस तू मास्टर
बाप,माय,पिल्लेही sign करतात तुझे muster
            ताडोबात फिरलो पण वाघ एकही दिसला नाही
            एक दोन छान पक्षी त्यांचीच घेतली छबी बाई!
जंगलाचे भव्यपण तुला ऊमजून चुकले आहे
म्हणूनच नाते तुझे-त्याचे छान जुळले आहे
            असेच मोठे मन तुझे घेऊन जग बघत रहा
            पृथ्वीवर मानवासाथ ईतर मागोवा घेत रहा
तुझ्या त्या शोधामध्ये नवनवे सदा दिसो
आणि त्यांच्या चित्रांतून समाधान माझे होत राहो
                                         
हा प्रतिसाद शेअर करण्याची परवानगी मागितल्यावर तितक्याच सुंदर पद्धतीने दिलेली ही परवानगीही बघा :-)

देव दयेने सौंदर्य, मनांत माझ्या भरले आहे
त्यामुळेच तुझे ते, आनंद माझे, झाले आहेत
             आनंद हा असाच ऊमजून आणि वाटून वाढत असतो
             आणि तो असाच वाढून परमानंद बनत असतो
कधी कधी कळत नाही, नाळ कशी जुळुन् जाते  
पण ती जुळण्यावर जीवन खुप निर्भर असते
            चला आनंद या क्षणाचा तू, मी, दोघे घेऊ
            जमले  तर तो वाटून जग हे आनंदी करू
                                         - सुरेश पुरोहित

पुन्हा एकवार धन्यवाद पुरोहितजी.
तसेच आवर्जून ईमेल पाठवून कळवणाऱ्या डॉ. राजा दीक्षित, डॉ. शोभना तीर्थळी, श्री. अनिल राऊत, श्री. देवेंद्र इनामदार, श्री. शरदकुमार, श्री. शेखर प्रधान, श्री. गुंजम मळेकर, श्री. पी. बी. पाटील आणि फेसबुक वरील अनेक स्नेही, या सर्वच रसिकांचे मनापासून आभार ___/\___ अशा शाबासकीमुळे अजून काही लिहावासं वाटत :-)

No comments:

Post a Comment