Monday, June 10, 2013

मराठीतून लिहिण्यासाठी गुगल इनपुट

प्रथम   http://www.google.com/inputtools/windows/index.html  हे डाऊनलोड करून घ्या.

जसे बोलतो, तसे टाइप करत जावे.  सुरुवातीला थोडा लागेल पण जमेल हळू हळू.
अगदी शक्य नाही तर इंग्रजीतून मराठी टाइप केलेत तरी चालेल. हि आपली एक फक्त सोय :)

गुगलचे मराठी अ‍ॅप  डाउनलोड केल्या नंतर खालील प्रमाणे करा.


१. start --> control panel --> regional and language options
२. मग एक डायलॉग उघडेल. त्यात language टॅबवर जा. प्रथम supplemental language support मध्ये जाऊन install files for complex scripts and right-to-left... या पर्यायावर टीक नसेल तर टीक करा.
३. मग details वर क्लिक करा.


reg_lang.JPG

४. मग text services and input language असा दुसरा डायलॉग उघडेल.
text_serv_ip_lang1.JPG

५. या ठिकाणी मराठी कीबोर्ड दिसतोय का? दिसत नसल्यास add चे बटण दाबा आणि मराठी कीबोर्ड एड करा..
६. या text services and input language डायलॉगाच्या advanced टॅबवर जाऊन Turn off advanced text services या पर्यायावरटीक नाही असं करा.
६. ok दाबून दोन्ही डायलॉग बंद करा.
७. हे सगळं झालं की तुम्हाला संगणक  रिस्टार्ट करावा लागेल.

आता  खालच्या पट्टीवर EN आहे त्यावर क्लिक करा आणि  MA निवडा. आता तुम्हाला मराठी लिहिता येईल. काही अक्षर त्रास देतात पण ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही वर्ड, एक्सेल, इ-मेल, फेसबुक  सगळी कडे लिहू शकाल.फक्त वर्ड, एक्सेल मध्ये फैल सेव्ह करताना युनिकोड मध्ये सेव्ह करा.

No comments:

Post a Comment