Tuesday, October 22, 2013

शांकलीची गुरुदक्षिणा

शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी स्मित

घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.

हे सारे अपारंपारिक अशा ऑन लाईन शिकण्यातून हे विशेष.. अशा पद्धतीने शिकणे खरोखरीच अतिशय अवघड प्रकार. शिकवण्यासाठी लिहिलेले, दाखवलेले नीट अभ्यासणे, त्यावर प्रॅक्टिस करणे, काही शंका असतील तर लगेच स्ंपर्क साधून अतिशय ऋजूतेने शंकानिरसन करून घेणे; सांगितलेले, सांगितलेल्या पद्धतीने अन तेव्हढ्या वेळा करणे हे सगळेच या पद्धतीत अतिशय आवश्यक असते. हे सारे तिने केलेय. आता तर ती दोन सुयांवरचे विणकाम करते आहे.

इतकी छान गुरुदक्षिणा देणारी विद्यार्थिनी सगळ्यांनाच लाभो स्मित

शांकलीने केलेला बारीक दो-याचा अतिशय नाजूक अन सुबक टेबल टॉप :

IMG_4497[1] copy.jpg

No comments:

Post a Comment