Monday, March 18, 2013

अननसाचा व्हि नेक/ बोट नेक पोंचू

वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा एक फोटो दाखवला आणि विचारले असे करता येईल का?

आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात :)

नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते. मग जरा स्वतःचेच डोके चालवले. थोडे प्रयोग केले, थोडी उसवाउसव झाली पण प्रयत्न सोडला नाही. जमलेले डिझाईन मग वंदनाला बक्षिस म्हणुन पाठवले.

मला त्या फोटोसाठी घरात मॉडेल मिळाले नाही. मग मी आपले ते सोफ्यावरच चढवले.या डिझाईनची गंमत अशी की हे दोन पद्धतीने घालता येते. वर दाखवलेय तसे व्हि नेक चे
किंवा  बोट नेक चे


 पूर्ण उलगडले की पोंचू असा दिसतोकिंमत : ३५०/- फक्त

No comments:

Post a Comment