Saturday, December 29, 2012

"शिकाशिकवा" एक नवा प्रयोग, संकल्पना आणि स्वरुप

 "शिकाशिकवा": www.shikashikava.blogspot.com हा माझा, एक नवा प्रयोग.
"शिकाशिकवा" या ब्लॉगमध्ये सुरुवातीला मी दोन सुयांवरचे विणकाम ( उदा. लोकरीचे विणकाम), एका सुईचे विणकाम ( क्रोशा), आणि भरतकाम या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करणार आहे. ही सुरुवात अगदी बेसिक गोष्टींपासून करणार आहे.काही माहिती लेखी स्वरुपात, काही चित्रांमधून, काही फोटोंतून तर काही व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
शक्यता आहे की काहींना ही बेसिक माहिती आधीपासून माहिती असेल परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की बेसिकपासून शिकत गेले की चांगले पक्के होते. उत्साहाने मोठा स्वेटर घेतला, मग कालांतराने कंटाळा आला, अवघड वाटायला लागले अशा कारणांनी ती गोष्ट सुटून जाते. त्या ऐवजी छोट्या छोट्या गोष्टी जमू लागल्या की आनंद होतो, उत्साह वाढतो. सवयीने हळुहळू मोठ्या गोष्टीही सहज जमू लागतात. त्यामुळे छोट्या गोष्टींपासून सुरूवात करू, बघू काय काय जमतय आपल्याला :)


साधारण १५ जानेवारी २०१३ पासून ह्या ब्लॉगद्वारे विणकाम - दोन सुयांवरचे, एका सुईचे आणि भरतकाम " शिकवण्याचा क्लास " सुरू होईल. या क्लासच्या- ब्लॉगच्या सदस्यत्वाची प्रक्रिया १ जानेवारी २०१३ पासून सुरू होतेय.

वेगवेगळे टाके, डिझाईन्स, प्रकार आणि नमुने यात शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिकणा-यांना आपली कला इथे टाकण्याचीही सोय राहील.

१५ जानेवारी २०१३ पासून प्रत्यक्ष शिकवण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे शिकवणे सुरू झाले की हा ब्लॉग केवळ "सदस्यां"साठीच खुला राहील, याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे ज्यांना या ब्लॉगचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृपया मला इ-मेल करावी (उजवी कडचे "Contact Me" हे गॅजेट पहा.)
"सदस्यत्व"साठीचे तपशीलवार उत्तर मी त्यांना पाठवेन.


 "शिकाशिकवा" ब्लॉग : संकल्पना आणि स्वरुप 


आता हा ब्लॉग कसा काम करेल हे बघू.
सर्व  प्रथम हा ब्लॉग सशुल्क असेल हे नोंदवते.
या ब्लॉगवर मी हळूहळू काही गोष्टी टाकत जाईन. त्याची माहिती तुम्ही हा ब्लॉग वाचून, पाहून घेत जाल. त्या त्या गोष्टी करताना काही अडचण आली की तुम्ही त्या मला याच ब्लॉगवर विचारा. मी त्या त्या गोष्टी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करेन.

कधी तुमच्या अडचणी तुम्ही लिहून सांगू शकाल. परंतु हे नेहमीच शक्य नाही. शेवटी ही कला असल्याने प्रत्यक्ष तुमचे कामही पहावे लागेल. तुम्हालाही तुमचे काम दाखवावेसे वाटेलच ना :) तर तशीही सोय मी इथे करतेय. तुम्हाला तुमचे म्हणणे लेखी / फोटो/ चित्र/ व्हिडिओ द्वारे इथे टाकता येई. कसे ते त्या त्या वेळेस सांगेन.

तसेच ज्यांना स्काईपची सोय शक्य आहे त्यांचा आपण स्काईपवर एक गृप करू, वेळा साधारण ठरवू अन त्या वेळेस स्काईपवरही आपल्याला संवाद साधता येईल.

हे शक्य नसेल त्यांना याहू चॅट, जी टोक, व्होट्स अप  किंवा फेसबुकवरही माझ्याशी संपर्क साधता येईल. आपल्या सर्वांच्या सोईच्या काही वेळाही आपण निश्चित करू. ज्यान्वये आपल्याला चटकन अडचणी सोडवता येतील.

अर्थात तुम्हाला जेव्हा वेळ मोकळा असेल तेव्हा तुम्ही ब्लॉग बघून तुम्हाला हवे असलेले शिकू शकाल. वर जे सांगितले ते अडचणीं संदर्भात :)

No comments:

Post a Comment