Wednesday, August 31, 2011

"वन बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे"

सध्या माझी बाग छान फुलतेय.


सोनटक्याचा एक सीझन येऊन गेला, दुसरा उंबरठ्यावर उभा आहे






मधुमालती मस्त फुलून गेली.









लिली बहरून गेली.

















रातराणीही सुवासून गेली.



















साध्या बहरलीय ती मुकी जास्वंद !



लाल गुलाब ४-४, ५-५ फुलांनी लगडलाय.






अन कळ्यांनी वाकलाय कुंद.













रंगाबिरंगी पानंही सजलीत.


परवा इंद्रधनुष्यानेही कमान केली माझ्या बागेवर.


अन मग येऊ लागले काही नवखे लोक. फुलपाखरं, छोट्या मधमाशा, किडे, चिमण्या, बुलबुल अन चक्क सनबर्डही :)








काल दोन-तीनदा एक बुलबुलाचे दांपत्य अन एक सनबर्डचे दांपत्य पाहणी करून गेले.







मग मला कंबर कसायलाच लागली. सकाळी सगळे आवरले अन मग लागले कामाला. अन त्यातून तयार झाला हा वन बीएचके फ्लॅट :)




इस्त्रीचे एक खोके, जुन्या वह्यांची कव्हरं, काही चिकटपट्या अन वायरीचे तुकडे, अन थोडे कष्ट अन थोड्या आयडिया. बस झाले.




बघा कोण कोण इंट्रेस्टेड आहेत? आताच दोघे बुलबुल प्राथमिक पाहणी करून गेले. कॅमेरा रेडी नव्हता, नाही तर सप्रमाण सिद्ध केलं असतं ;) आता नवे जोडपे राहायला आले तर टाकेनच त्यांचे फोटो :)

No comments:

Post a Comment